Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगडात हापूस आंब्यांच्या उत्पादनात वाढ

उरण : प्रतिनिधी मागील 25 वर्षांपासून उरण तालुका, रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागात हापूस आंब्याच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असलेल्या आसिफ शाबाजकार यांच्या रानसई फार्म्सच्या हापूस आंब्यांची आवक यंदा मोठ्या प्रमाणात वाढली असून, 15 फेब्रुवारी 2019 पासून हा रानसई फार्म्सचा हापूस आंबा नवी मुंबई वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाला …

Read More »

रोटरी क्लबची अविस्मरणीय रोटरी फॅमिली नाईट

पनवेल : वार्ताहर रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीयल टाऊन या सामाजिक सेवा करणार्‍या क्लबच्या 30व्या यशस्वी वाटचालीच्या वाढदिवसानिमित्ताने क्लबतर्फे एक अविस्मरणीय अशी रोटरी फॅमिली नाईट खांदा वसाहतीमधील अतिशय सुंदर अशा बेलेझा बँकेट हॉलमध्ये साजरी करण्यात आली. या अविस्मरणीय रोटरी फॅमिली नाईटला पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, तसेच शहरातील नामवंत …

Read More »

पनवेल परिसरात वीट व्यवसायाला घरघर

पनवेल : वार्ताहर सध्या सुरू असलेली आर्थिक मंदी. त्यातच बांधकाम व्यवसायावर आलेले मंदीचे सावट, रेती उत्खननावर असलेली बंदी, कामगारांची कमतरता, हवामानाची अनिश्चितता यामुळे अतिशय गर्मीच्या काळात आपले घर थंड ठेवणार्‍या वीट व्यवसायाला अखेरची घरघर पाहायला मिळत आहे. या मंदीमुळे पनवेल परिसरातील 75 टक्के व्यावसायिकांनी व त्यावर आधारित कारागिरांनी उदरनिर्वाहाचा दुसरा …

Read More »

आगरी-कोळी समाजात लग्नसोहळेही होताहेत स्मार्ट

उरण : जीवन केणी  : उ0रण तालुका विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना या परिसरात साजर्‍या होणार्‍या यात्रा उत्सव सोहळ्याचे स्वरूपही बदलत चालले आहे. आगरी कोळी समाजातील लग्न सोहळा म्हणजे पर्वणी समजली जात होती, परंतु आज या समाजातील लग्न सोहळ्याची पारंपरिक पद्धत पूर्णपणे बदलून गेली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. आगरी-कोळी …

Read More »

खारघरमध्ये सुशोभीकरणासाठी तलाव घेतले दत्तक

खारघर : प्रतिनिधी  : खारघर सेक्टर 35 मधील तलावाच्या सुशोभीकरणासाठी येथील रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. खारघर शहराला नैसर्गिक साधनसंपदा लाभली आहे. एकीकडे विशालकाय पर्वतरांगा, त्याचबरोबर शहरातील तलाव, विहिरी, लेक आदींचा समावेश आहे. या सर्व गोष्टीच्या संगोपनासाठी खारघर शहरातील अडोप्ट लेक, अडोप्ट ट्री या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. वर्षभरात खारघर शहरातील …

Read More »

कोपरा गावात दूषित पाणी शिरले मत्स्यशेतीत

खारघर : प्रतिनिधी  : तळोजा औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी मत्स्यशेतीत शिरल्यामुळे शेतकर्‍यांचे शेकडो मासे मेल्याची घटना कोपरा गावाजवळ घडली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडल्यामुळे भरती दरम्यान प्रदूषित पाणी शेतात शिरल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. तळोजा एमआयडीसी परिसरात जवळपास लहान मोठे असे 850 कारखाने आहेत. तळोजा एमआयडीसीमधील …

Read More »

गेटवे ते घारापुरी सागरी परिक्रमा; ज्ञानेश्वरी वाचन व हरिपाठ पठण

उरण : प्रतिनिधी  : सालाबादप्रमाणे घारापुरी बेटावर पाच दिवसांचा सत्संग सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. बालयोगी अद्भुतानंंद महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रविवारपासून ते बुधवारपर्यंत असे सलग पाच दिवस सुरू असलेल्या सोहळ्यात सोमवारी बेटावरील हजारो भाविकांनी  गेटवे  ऑफ इंडिया मुंबई ते घारापुरी दरम्यान सागरी परिक्रमेतून भाविकांनी ज्ञानेश्वरी वाचन …

Read More »

कॅरमपटू जान्हवी मोरेचे अपघाती निधन

कल्याण : प्रतिनिधी महाराष्ट्राची राज्यस्तरीय कॅरमपटू जान्हवी मोरे हिचं रविवारी अपघाती निधन झालं. डोंबिवलीच्या पलावा सर्कल इथे भरधाव टँकरच्या धडकेत जान्हवीचा मृत्यू झाला. 19 वर्षीय जान्हवी ही डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये वास्तव्याला होती. रविवारी आपल्या सहकारी खेळाडूसह सराव करून ती पलावा सर्कलच्या बसस्टॉपकडे जात होती. याच वेळी भरधाव वेगात आलेल्या टँकरने …

Read More »

पेणची श्वेता केणी खेळ पुरस्काराची मानकरी

पेण : रामप्रहर वृत्त पेणमधील म्हैसबाड (खारपाले) गावातील कुमारी श्वेता रवींद्र केणी हिने नुकत्याच झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करून महाराष्ट्र खेळ पुरस्कार पटकाविला. नवी मुंबई येथील पृथ्वी हॉलमध्ये इंडियन अ‍ॅलिम्पिक संघटनेचे व्हॉईस प्रेसिडेंट कुलदीप पँटस, दिल्ली अ‍ॅलिम्पिक असोसिएशनचे दीपक अग्रवाल, डायरेक्टर ऑफ इंडियन स्पोर्ट्स रिलेशनचे सुशील कुमार, राजकुमार …

Read More »

‘तो’ रक्तबंबाळ झाल्यानंतरही खेळत राहिला

मुंबई : प्रतिनिधी आयपीएलच्या शेवटच्या मॅचमध्ये रविवारी मुंबईनं चेन्नर्ईला पराभूत केलं. या मॅचमध्ये चेन्नईसाठी ओपनर शेन वॉटसननं 80 रनांची खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये तो रनआऊट झाला. मॅचनंतर चेन्नईचा ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं शेन वॉटसनच्या खेळीबद्दल मोठा खुलासा केला. या खुलाशानंतर प्रेक्षक शेन वॉटसनचं कौतुक करताना थकत नाहीत. बॅटिंग करताना शेन …

Read More »