Breaking News

महत्वाच्या बातम्या

पॉवर लिफ्टिंगमध्ये दिव्यांग प्रशांत जाधवचे ‘सुवर्ण’ यश

महाड : प्रतिनिधी मुंबई येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग महापौर चषक स्पर्धेत महाड तालुक्यातील नांदगाव बु. येथील प्रशांत जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 60 किलो वजनी गटात त्याने हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे प्रशांत जाधव हा दिव्यांग असूनदेखील हे यश मिळवले आहे. सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदके प्रशांतने …

Read More »

भारताची ‘स्विंग’समोर शरणागती ; सराव सामन्यात न्यूझीलंडसमोर टाकली नांगी

लंडन : वृत्तसंस्था कागदावर भारतीय क्रिकेट संघाची फलंदाजी भक्कम वाटत असली, तरी द ओव्हलच्या वेगवान खेळपट्टीवर स्विंग चेंडूंचा सामना करताना फलंदाजांची त्रेधातिरपिट उडाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून शनिवारी झालेल्या सराव सामन्यात भारताचा डाव अवघ्या 39.2 षटकांत 179 धावांत गुंडाळला. यानंतर विजयी लक्ष्य 37.1 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. …

Read More »

राजीव कुमार यांच्याविरोधात सीबीआयची लूक आऊट नोटीस

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधात सीबीआयने लूक आऊट नोटीस जारी केली आहे. यानुसार राजीव कुमार यांना परदेश दौरा करायचा असल्यास विमानतळ प्राधिकरण त्याची माहिती सीबीआयला देणार आहे. 23 मे रोजी त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून ती एका वर्षासाठी वैध असेल. राजीव …

Read More »

प्रगती एक्स्प्रेसचे इंजीन बंद; प्रवाशांचा खोळंबा

ठाणे ः प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात काल प्रगती एक्स्प्रेसचे इंजीन बंद पडल्यामुळे पुण्याहून मुंबईला येणार्‍या शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला. अर्ध्या तासापासून प्रगती एक्स्प्रेस स्थानकात उभी होती.  गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे वेळापत्रक ’रुळावर’च आले नाही. रेल्वे रुळांना तडे, ओव्हरहेड वायर तुटणे, इतर तांत्रिक बिघाड आदी कारणांमुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत …

Read More »

तीन चिमुकल्यांची निर्घृण हत्या

इफ्तार पार्टीला न बोलावल्याचा राग बुलंदशहर ः वृत्तसंस्था रोजा इफ्तार पार्टीचे निमंत्रण न दिल्याच्या रागातून विशीतल्या तीन तरुणांनी तीन लहान बालकांचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे घडली. अपहरण करून बालकांचा गोळी घालून निर्घूण खून करण्यात आला. त्यानंतर या तीन बालकांचा मृतदेह पाण्याच्या हौदात टाकण्यात आला होता. या …

Read More »

शपथविधीसाठी जगनमोहन रेड्डींचे मोदींना आमंत्रण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आंध्र प्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्तास्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेसप्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले. जगनमोहन 30 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. जगनमोहन …

Read More »

केरळमध्ये हाय अलर्ट

दहशतवाद्यांच्या घुसखोरीची शक्यता   तटरक्षक दलही दक्ष नवी दिल्ली ः वृत्तसंस्था श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर दहशतवाद्यांनी आणखी एक मोठा कट रचल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रीलंकेच्या अधिकार्‍यांनी इसिसचे 15 दहशतवादी लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली आहे. यानंतर भारताच्या किनारपट्टींची सुरक्षा वाढवण्यात आली असून केरळ किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. …

Read More »

झुकू झुकू झुकू झुकू आगीनगाडी, पडती काँग्रेस पाहूया, पाहूया!

झुकू झुकू झुकू झुकू आगीनगाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, हे गाणे मे महिन्यात सुटी पडली की बालगोपाळांच्या तोंडी हमखास असणारच, पण यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने अनेकांना मामाच्या गावाला जायला मिळाले नाही. त्यामुळे एका नाराज झालेल्या कवीने तयार केलेले झुकू झुकू झुकू झुकू आगीनगाडी, तोंडाच्या …

Read More »

पुस्तकातून समाधीकडे…

अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला. असो, हा विषय वेगळा..!!) काही …

Read More »

मनसेचा फटका कुणाला..?

चार दिवसांपूर्वी संपलेल्या लोकसभा निवडणूकीचे निकाल समोर आल्यावर नुसती राजकीय पक्षांचीच झोप उडालेली नाही, तर आपल्याला राजकीय पंडित समजून वावरणार्‍या अनेकांची भंबेरी उडाली आहे. कारण राज्यात पुन्हा तितक्याच ताकदीने भाजपा शिवसेना युती जिंकण्याची अपेक्षा कोणी केलेली नव्हती. त्याहीपेक्षा नुसत्या देखाव्याला भुलून राजकीय आकलन व विश्लेषण करणार्‍यांना; या निकालांनी तोंडघशी पाडलेले …

Read More »