Breaking News

महत्वाच्या बातम्या

सोनारी गावात महायुतीतर्फे प्रचारपत्रक वाटप

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी उरण तालुक्यात शिवसेना, भाजप व मित्रपक्षांच्या वतीने सर्वत्र मोठ्या प्रमाणात पत्रके वाटून प्रचार केला जात आहे. याच पद्धतीने सोनारी गावात पत्रके वाटण्यात आली. या वेळी भाजप उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, महालण विभाग अध्यक्ष तथा सोनारी ग्रामपंचायतीचे …

Read More »

शेकापला झटका; सारडे येथील कार्यकर्ते शिवसेनेत

उरण : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नुकतीच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उरण महापालिका शाळेच्या प्रांगणात सभा झाली. या वेळी उरण तालुक्यातील सारडे येथील शेकाप कार्यकर्त्यांनी शिवसेनेेत जाहीर प्रवेश केला. या सभेस आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त व भाजप …

Read More »

उरणमध्ये महायुतीचा जोर वाढला ; थेट जनसंपर्कावर कार्यकर्त्यांचा भर

उरण : वार्ताहर शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी थेट जनसंपर्कावर भर दिला असून, घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे. शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते ठिकठिकाणी फिरून खासदार …

Read More »

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड निवडणुकीनेच व्हावी -अशोक शिरसाट

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाची मराठी भाषा व साहित्याशी निगडित विविध महामंडळे कार्यरत आहेत, पण त्या मंडळांवर करोडो रुपयांचा खर्च होऊनही कोणतेही भरीव कार्य झालेले दिसत नाही, त्याचे कारण म्हणजे जवळच्या लोकांची ओळखीने झालेली निवड; त्यामुळे ही मंडळे निर्जीव बनत चालली आहेत, म्हणून ही निवड व अ.भा.म. साहित्य संमेलनाच्या …

Read More »

रोहित शेखर हत्येप्रकरणी पत्नीला अटक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था माजी केंद्रीय मंत्री एन. डी. तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने रोहित शेखर यांची पत्नी अपूर्वाला अटक केली आहे. फॉरेन्सिक तपासणीतील पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. रोहित शेखर हे दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत राहत होते. रोहित यांचा 16 एप्रिल रोजी …

Read More »

देशी कट्ट्यासह काडतुसे हस्तगत

मुंबई ः प्रतिनिधी खार रेल्वेस्थानक परिसरातून काल देशी कट्टे आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. खारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. चेतन चंदू पटेल (29) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन देशी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली …

Read More »

ए. के. शेख यांच्या ‘छंदाक्षरी’ला साहित्यरत्न पुरस्कार

अलिबाग : रामप्रहर वृत्त साहित्यसंपदा समूह अलिबाग या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘साहित्यरत्न पुरस्कार’ पनवेलचे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांच्या ‘छंदाक्षरी’ या ग्रंथाला प्रदान करण्यात आला. मराठी गजलचे शास्त्र व तंत्र शिकण्यास उपयुक्त असणारा हा ग्रंथ अल्पावधीतच वाचकप्रिय ठरला आहे. त्याबरोबर रमेश धनावडे यांच्या ‘जीवन गाणे’, श्रीकांत पेटकर यांच्या  ‘कल्याण’ …

Read More »

…म्हणून मोदी घालतात उलटं घड्याळ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आजपर्यंत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय मुद्द्यांवर अनेक भाषणे आणि मुलाखती देताना पाहिले आहे, पण पहिल्यांदाच मोदींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न अभिनेता अक्षय कुमारने केला आहे. अक्षयने मोदींची मुलाखत घेतली असून, यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बर्‍याच छोट्या-मोठ्या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून मोदींच्या …

Read More »

टीसीएस, इन्फोसिसमधील मेगाभरतीत वाढ; नोकर्‍यांचा सुकाळ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था वेगवेगळ्या क्षेत्रात नोकर्‍यांमध्ये आलेल्या कपातीनंतर आता आयटी सेक्टरमधून चांगली बातमी आली आहे. आर्थिक वर्ष 2018-19मध्ये प्रमुख आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज (टीसीएस) आणि इन्फोसिसने गेल्या वित्त वर्षाच्या तुलनेत 42000हून अधिक नोकरदारांना कामावर रुजू करून घेतले आहे. अशा प्रकारे या दोन मोठ्या कंपन्यांमधील भरतीमध्ये 350 टक्क्यांहून अधिकची …

Read More »

रायगडात सरासरी 60 टक्के मतदान

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. 23) मतदानप्रक्रिया शांततेत झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 58.06 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेचे अनंत गीते, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासह 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्य तिसर्‍या टप्प्यातील निवडणुकीत मतदान यंत्रात बंद झाले आहे. रायगडात भरघोस मतदानाची परंपरा याही वेळी जपली गेली. सकाळपासूनच …

Read More »