Breaking News

महत्वाच्या बातम्या

खालापूर सेतुला दलालांचा विळखा

नागरिकांची दिशाभूल, खापर अधिकार्‍यांवर खोपोली : प्रतिनिधी खालापूर तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्राबाहेर दलालांचा उपद्रव वाढला असून, त्यांचा त्रास विद्यार्थी, नागरिकांबरोबर अधिकार्‍यांनादेखील होत आहे. सध्या शैक्षणिक प्रवेश, पोलीस भरती प्रक्रिया आणि निवडणुकीसाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने खालापूरला येताहेत. दाखले प्रक्रियेबद्दल अनेक जणांना असलेला अज्ञानाचा …

Read More »

रायगडात थेट सरपंचपदासह सदस्यपदाचे अर्ज दाखल

गोरठण ग्रामस्थांनी रचला इतिहास; ग्रामपंचायत बिनविरोध खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात चौदा ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे. सरपंच थेट निवड असल्याने हौशेनवशांनादेखील सरपंचपदाची स्वप्न पडत आहे. खुर्चीसाठी साठमारी सुरू असताना तालुक्यातील गोरठण ग्रामस्थांनी थेट सरपंचासह नऊ सदस्यांची बिनविरोध निवड करित एक आदर्श घालून दिला आहे. – बिनविरोध निवड झालेले उमेदवार किशोर …

Read More »

राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन

दोन हजारहून अधिक पदे भरणार -मुख्यमंत्री मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. 3) स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयात 2063 पदे भरली जाणार आहेत, शिवाय यासाठी 1143 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा पुरविता येतील, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी जिल्हा परिषदेने विविध ऑनलाइन सुविधा सुरू केल्या असून, त्यासोबतच नागरिकांना एखादी योजना राबविताना किंवा एखादी समस्या दिसल्यास ती मांडण्यासाठी आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना सुचविण्याची सोयही उपलब्ध करून …

Read More »

महाडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रिल

अलिबाग : जिमाका कोएसोच्या महाड येथील वि. ह. परांजपे विद्यामंदिर येथे बुधवारी (दि. 30) सकाळी नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्यामार्फत राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत मॉकड्रिल करण्यात आले.राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शाळांमध्ये आपत्तीचे मॉकड्रिल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभाग व युएनडीपी तसेच महाराष्ट्र आपत्ती विभाग …

Read More »

खोपोलीत स्वच्छतेचा बोजवारा; नगरपालिकेचा उदासीन कारभार

खोपोली : प्रतिनिधी एकीकडे स्वच्छता अभियान अंतर्गत दरवर्षी स्वच्छता सर्वेक्षणसाठी खोपोली नगरपालिकेचा करोडो रुपयांचा निधी खर्च होत आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे शहरातील विविध भागात फेरफटका मारल्यावर दिसते. खोपोलीतील अनेक प्रभागात सार्वजनिक स्वच्छता अबाधित राखण्यासाठी नगरपालिका प्रशासन व संबंधित विभागातील अधिकारी प्रचंड उदासीन असल्याचा आरोप माजी नगरसेवकांसह नागरिकांकडून करण्यात …

Read More »

तळोजात तलाव सुशोभीकरणाचा शुभारंभ

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन तळोजा : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका हद्दीत विविध विकासाची कामे सुरू आहेत. या अंतर्गत माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक हरेश केणी आणि पापा पटेल यांच्या पाठपुराव्याने तळोजा येथे तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या …

Read More »

अटल करंडकासाठी एकांकिकांमध्ये चुरस

राज्यस्तरीय स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण समारंभ विजेतेपदासाठी एक लाख रुपये आणि मानाचा करंडक पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत एकाहून एक सरस एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा मानाचा अटल करंडक कोण पटकविणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल …

Read More »

रायगडात सरपंचपदासाठी 901,सदस्यपदासाठी 4386 अर्ज दाखल

अलिबाग : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सरपंचपदाच्या 240 जागांसाठी 901, तर 1940 सदस्यपदांसाठी 4382 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी (दि. 3) संपली. शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. ऑनलाइन पद्धतीने …

Read More »

ब्रेवरीज कंपनीत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

तळोजा : रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनीत काम करणार्‍या कामगारांच्या हितासाठी कटिबद्ध असून कामगारवर्गाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमदार म्हणून पूर्ण प्रयत्न करेन, अशी ग्वाही संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. तळोजा एमआयडीसीतील युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड कंपनीत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे …

Read More »