Breaking News

महत्वाच्या बातम्या

पेणमधील खारबंदिस्ती पूर्ववत करण्याची शेतकर्‍यांची मागणी

पाली ः प्रतिनिधी तालुक्यातील खारमाचेला, खारचिर्बी, व जुईअब्बास विभागातील साधारणतः 2700 एकर शेतीत खारे पाणी शिरून सुपीक शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खारलँड विभागाने शेतीचा बचाव करणारी खारबंदिस्ती खारबंदिस्ती पूर्ववत करावी, अशी मागणी खारमाचेला विभागातील शेकडो शेतकर्‍यांनी केली आहे. या संदर्भात खारलँड विभागाला सोमवारी (दि. 26) निवेदन देण्यात आले. …

Read More »

याला म्हणतात हिंमत

कर्नाटक सरकारचा निषेध करणारा ऐतिहासिक ठराव सर्वपक्षाच्या सदस्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित केला हा एक ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक गावांमध्ये गेली तीन-चार दशके जो अन्याय सुरू आहे, त्याला जोरदार प्रत्युत्तर महाराष्ट्र सरकारने दिले आहे. अशी हिंमत दाखवणारे शिंदे-फडणवीस सरकार हे पहिलेच सरकार आहे. बेळगाव, कारवार, निपाणी आणि …

Read More »

गव्हाण विद्यालयात दहावीच्या वर्गांची पालक सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यी, पालक, शिक्षक व स्थानिक शाळा समितीच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ …

Read More »

भाजपचा अवैध वाहतूकदारांना दणका

आरटीओकडून दोन लाख 78 हजारांचा दंड वसूल नवभारतीय शिववाहतूक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा पनवेल : वार्ताहर भारतीय जनता पक्ष ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेने अवैध वाहतूक करणान्या विरोधात आरटीओ कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय कामाला लागले असून …

Read More »

खोपोली शहरातील नागरी समस्या सोडवा

भाजप आक्रमक; मुख्याधिकार्‍यांना निवेदन खोपोली ः प्रतिनिधी खोपोली शहरातील विविध नागरी समस्यांबाबत भारतीय जनता पक्ष शहर आक्रमक झाली असून, शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी मुख्याधिकारी अनुप दुरे यांना निवेदन देण्यात आले. या समस्या तातडीने सोडविण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. शहरातील पाणी समस्या, स्वच्छता, बंद नाट्यगृह, उद्यानांची दुर्दशा, मुख्य …

Read More »

पनवेलमध्ये भाजप महिला मोर्चाची बैठक उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच करण्यात येणार्‍या कामांचा आढावा घेण्याकरिता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकार्‍यांची आढावा बैठक सर्वत्र घेण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल तालुका महिला मोर्चाची आढावा बैठक मंगळवारी (दि. 27) दक्षिण रायगड सरचिटणीस डॉ. मंजुषा …

Read More »

सुषमा अंधारेंविरोधात श्रीवर्धनमध्ये निषेध रॅली

श्रीवर्धन ः प्रतिनिधी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवतांबद्दल तसेच संतांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात त्यांचा हिंदू एकता मंचातर्फे श्रीवर्धनमध्ये निषेध रॅली काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदनही पोलीस ठाण्यात देण्यात आले. या निषेध रॅलीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी हातामध्ये टाळ, चिपळ्या, भगव्या पताका, …

Read More »

अंबा नदी होतेय दूषित

प्लास्टिक पिशव्यांसह निर्माल्याचा खच पाली ः प्रतिनिधी अंबा नदी सुधागडवासियांबरोबरच पालीकरांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. संपूर्ण पालीसह बाजूच्या गावांना अंबा नदीतून पाणी पुरवठा होतो, मात्र सध्या या नदीला प्लास्टिकच्या पिशवीतून टाकलेल्या निर्माल्याच्या कचर्‍याने घेरले आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. घरात देवपुजेसाठी वापरलेली फुले, हार दुसर्‍या दिवशी शिळे होतात. …

Read More »

अमली पदार्थ तस्करीला आळा घालणार -भारंबे

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसंदर्भातील गुन्हे, सायबर तसेच अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे. त्याशिवाय पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढीवर भर देण्याचे …

Read More »

गोवर रूबेला लसीकरणाला वेग

नवी मुंबईमध्ये पहिल्या फेरीत 10,568 बालकांना डोस नवी मुंबई : बातमीदार नमुंमपा टास्क फोर्सच्या 30 नोव्हेंबर व 13 डिसेंबरच्या विशेष बैठकीत महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने नवीन उद्रेक सुरू झाल्यास नऊ महिने ते ते पाच वर्ष वयाच्या बालकांना गोवर रुबेलो लसीचा एक अतिरिक्त डोस तसेच सहा महिने …

Read More »