Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत गोवरचे घरोघरी सर्वेक्षण

शहरात 160 संशयित, तर सहा पॉझिटिव्ह रुग्ण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई सह ठाणे शहरात गोवर बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत रुग्णसंख्या 156 वर पोहचली आहे . त्याचबरोबर नवी मुंबईतही गोवरचे 160 संशयित रुग्ण असून 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने सतर्क बाळगण्यासाठी प्रतिबंधात्मक …

Read More »

अर्जून पुरस्कारप्राप्त नेमबाज सुमा शिरूर यांचा पनवेलमध्ये सन्मान

अलिबाग : रामप्रहर वृत्त जिल्ह्यातील अर्जून पुरस्कारप्राप्त नेमबाज सुमा सिद्धार्थ शिरूर यांना केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा नुकताच पनवेलमध्ये सन्मान करण्यात आला. पनवेल येथील लक्ष शूटिंग क्लब येथे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी जिल्हाधिकारी रायगड तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र …

Read More »

‘सीकेटी’च्या श्रावणीला ज्युडो स्पर्धेत सुवर्णपदक

पनवेल : रामप्रहर वृत्त सी. के. ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमात इ. 10वीत शिकणार्‍या श्रावणी दिनेश ठाकूर या विद्यार्थिनीने पनवेल महानगर पालिकेतर्फे आयोजित ज्युडो स्पर्धेत 52 किलोखालील वजन गटात, 17 वर्षाखालील मुलींच्या विभागात सुवर्ण पदक प्राप्त केले आहे, तसेच तिची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्रावणी हिला क्रिडा शिक्षक भरत …

Read More »

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत साहिल जाधवची सुवर्ण कामगिरी

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त पंजाब येथे झालेल्या स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रास सुवर्ण पदक मिळवून देत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार्‍या तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आलेल्या रोहा तालुक्यातील पोफळघर संघाचा स्टार खेळाडू महाराष्ट्र संघाचा उपकर्णधार साहिल संतोष जाधव याचे …

Read More »

अभिमानास्पद! जी-20 गटाचे भारताकडे अध्यक्षपद

बाली : इंडोनेशियातील बाली येथे आयोजित जी-20 गटाच्या दोन दिवसीय शिखर परिषदेची बुधवारी (दि. 16) सांगता झाली. सदस्य देशांनी संयुक्त जाहीरनाम्याला अंतिम रूप दिल्यानंतर इंडोनेशियाकडून आगामी वर्षासाठी जी-20चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द करण्यात आले. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुढील वर्षाच्या जी-20 परिषदेचे अध्यक्षपद सोपविलेे. यानंतर पंतप्रधान …

Read More »

सीकेटी मराठी प्राथमिक विद्यालयात बाल दिनानिमित्त बालसभा उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बाल सभेचे आयोजन केले होते. सर्वप्रथम स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत झाले. बाल सभेस अथर्व टिंगरे हा प्रमुख पाहुणा व वरिष्ठ शिक्षक युवराज …

Read More »

भाजपच्या अशोक विखारेंवर समाज कंटकांकडून प्राणघातक हल्ला

पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मंगेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध विकासकामे या विभागात करीत आहेत. त्याअंतर्गत भाजपचे अशोक विखारे यांनी काही दिवसांपूर्वी सेक्टर 6 येथे रिक्षा स्टँन्डचे सुशोभीकरण केले होते हाच राग मनात धरून काही समाज कंटकांनी अशोक विखारे यांच्यावर प्रणघातक हल्ला केला. यामध्ये …

Read More »

जेएनपीएचा अद्ययावतीकरण व सुसज्जीकरणावर भर

शॅलो वॉटर बर्थ आणि कोस्टल बर्थचे जेएम बक्षीसोबत हस्तांतरण उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अर्थात जेएनपीए हे भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर असून जेएनपीएने 15 नोव्हेंबर 2022 रोजी जेएम बक्षी पोर्ट्स एंड लॉजिस्टिक लिमिटेड सोबत शॅलो वॉटर बर्थचे अपग्रेडेशन सुसज्जीकरण आणि ऑपरेशन व देखभाल करण्यासाठी तसेच कोस्टल …

Read More »

पालीत माकडांचा उच्छाद; नागरिक त्रस्त

सुधागड : प्रतिनिधी अष्टविनायकांपैकी एक क्षेत्र आणि सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीमध्ये माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून या माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पालीकर करीत आहेत. पाली बाजारपेठ, मधली आळी, खडक आळी, कासार आळी, सोनार आळी, आगर आळी, बेगर आळी अशा सर्वच गजबजलेल्या भागात माकडे …

Read More »

पनवेलमध्ये व्यवसाय परवाना धोरणासंदर्भात व्यापार्‍यांची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेने व्यवसाय परवाना धोरण जाहीर केले आहे. हे धोरण काय आहे याची माहिती महापालिका क्षेत्रातील व्यापार्‍यांना व्हावी यासाठी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये मंगळवारी (दि. 15) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, …

Read More »