Breaking News

महत्वाच्या बातम्या

जांभिवलीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता कोंडीलकर

मान्यवरांकडून अभिनंदन! पनवेल : रामप्रहर वृत्त जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिनंदन केले. पनवेल तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांनी राष्ट्रवादी-शेकाप आघाडीकडून वेदीका विनोद जाईलकर …

Read More »

विविध दिवाळी अंकांचे प्रकाशन

धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्या अनुषंगाने यंदाचा रायगड शिव सम्राट दिवाळी अंक आरोग्य विषयक असून त्याचा फायदा वाचकांना होईल, असे प्रतिपादन  भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. पनवेल येथून प्रकाशित होणार्‍या …

Read More »

राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेली ट्रॉफी शिवरायचरणी

खेळाडूंचा किल्ले रायगडावर मानाचा मुजरा अलिबाग : प्रतिनिधी जिद्द, आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर 36व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील गुणवंत युवा खेळाडूंनी सोनेरी यश संपादन केले. 140 विक्रमी पदकांची कमाई करीत महाराष्ट्र संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. मिळालेली बहुमानाची ट्रॉफी घेऊन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने धनत्रयोदशीच्या दिवशी रायगड किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा केला. …

Read More »

नेरळ-माथेरानदरम्यान पुन्हा धावली मिनीट्रेन!

स्थानिकांकडून जल्लोषात स्वागत माथेरान : रामप्रहर वृत्त पर्यटनाचा दिवाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी नेरळ-माथेरान मिनीट्रेन शनिवारी (दि. 22) तब्बल तीन वर्षांनंतर धावली. माथेरान स्थानकात या गाडीचे माथेरानकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. 2019मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरानदरम्यानच्या डोंगर भागातून जाणार्‍या मिनीट्रेनच्या रूळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसामुळे खाडीसह रूळही वाहून …

Read More »

टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत-पाक महामुकाबला

मेलबर्न : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 23) लढत होणार आहे. चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी मानली जात आहे. सुपर 12 फेरीसाठी भारत आणि पाकिस्तान संघ थेट पात्र ठरले असून त्यांचा दुसर्‍या गटात समावेश आहे. यापूर्वी उभय संघ विश्वचषक स्पर्धेत एकूण 13 …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे 22वी राज्य आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा

प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; बक्षिसांच्या रकमेत वाढ पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 22वी राज्यस्तरीय …

Read More »

सिडको वसाहतींमधील पाणीपुरवठ्याबाबत ठराविक मुदतीत उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधी सिडको वसाहतींमधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी ठोस उपाययोजना ठराविक मुदतीत कराव्यात; अन्यथा आमचे सरकार असले तरी आम्ही आंदोलन करू, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 21) सिडकोच्या बैठकीत दिला. दिवाळीत गरज असेल तिथे सिडकोने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी या …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी दिवाळी पहाट सांगीतिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी (दि. 23) सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे होणार आहे. दरवर्षी …

Read More »

‘रामप्रहर’ने दिवाळी अंकांची परंपरा जपली -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त दै. रामप्रहरच्या वतीने दरवर्षी दीपावलीनिमित्त विशेषांक प्रसिद्ध करण्यात येतो. अगदी कोरोना काळातही त्यात खंड पडला नाही. ‘रामप्रहर’ने दिवाळी अंकांची परंपरा जपली आहे. यंदा पर्यटनावर आधारित अंक काढून छान माहिती देण्यात आली आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 22) येथे काढले. ‘रामप्रहर’च्या …

Read More »

आरोग्य विभागात होणार महाभरती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आरोग्य विभागामध्ये 10 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात येत्या 1 ते 7 जानेवारीदरम्यान जाहिरात निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री महाजन म्हणाले की, मार्च 2018मध्ये आरोग्य विभागात 13 हजार जागांची भरती निघाली होती, …

Read More »