Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाडमध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन

महसूल विभागाची दोन ठिकाणी कारवाई; महसूल विभागाची दोन ठिकाणी कारवाई   महाड : प्रतिनिधी परवाना नसताना महाड तालुक्यातील सावित्री नदीतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. महसूल विभागाने एका आठवड्यात तालुक्यातील दोन ठिकाणी धाडी टाकून बेकायदेशीरित्या वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई केली. या कारवाईत एक होडी व वाळू मिळून एकूण …

Read More »

नागोठण्याजवळ महिलेची निर्घृण हत्या करून जाळले; चार तासांत आरोपी गजाआड

पाली, नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करकरणी देवी मंदिर परिसरात जंगलात रविवारी (दि.3) महिलेला ठार मारून पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  शिहू विभागातील दोन तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यास मदत झाली. मोटारसायकल क्रमांकावरून नागोठणे पोलिसांनी चार तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. फिर्यादी जयेश यशवंत घासे व …

Read More »

महसूल कर्मचारी बेमुदत संपावर; कार्यालयांतील कामकाज ठप्प

अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील महसुल कर्मचारी सोमवार (दि. 4)पासून बेमुदत संपावर गेले आहेत. रायगड जिल्ह्यातील शिपाई पदापासून ते पदोन्नत नायब तहसीलदारपर्यंत 540 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे महसूल कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. संपकरी कर्मचा़र्‍यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. …

Read More »

वृक्षतोडीमुळे कोकणातील तापमानात होतेय वाढ

वातानुकूलित कक्षात बसून अधिकारी घेत असलेल्या निर्णयामुळे कोकणातील अस्तित्वात असणारे डांबरी रस्ते उखडून नव्याने काँक्रिटीकरण होणार्‍या रस्त्यांसाठी वृक्षतोड होत आहे. कोकणातील पूर्वीचे 36 अंश असणारे तापमान आता वाढत आहे. रस्त्यांच्या कामात आडवी येणारी लाखो वृक्षसंपदा नष्ट झाल्याने कोकणातील तापमान खर्‍या अर्थाने वाढल्याचे चित्र कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहण्यास …

Read More »

मुजोरीला अटकाव हवाच

गेल्या वर्षीच्या अखेरीपासून हळूहळू शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या. बहुतेक शाळांमध्ये वार्षिक परीक्षाही ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या. आता या परीक्षांचे निकाल विद्यार्थ्यांच्या हातात देण्याची वेळ आल्यावर मात्र शाळांच्या फीच्या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे. फीच्या प्रकरणावरून पुण्यात लागोपाठ दोन शाळांमध्ये शाळा व पालक यांच्यात संघर्ष दिसून आला आहे.  साथरोग …

Read More »

धाकटा खांदा येथे आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ बिझनेस एमराल्ड, मानसरोवर यांच्या विद्यमाने पनवेलमधील श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक-6 धाकटा खांदा येथे रविवारी (दि. 3) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ई.सी.जी., बी.एम.डी.फॉर बोन डेन्सिटी, रँडम ब्लड शुगर या सर्व …

Read More »

वळवली येथे ई-श्रम महानोंदणी अभियान

भाजपच्या सचिन चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे वार्ड क्रमांक 9 अध्यक्ष सचिन चौधरी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी सोमवारी (दि. 4) साजरा झाला. त्यानिमित्त वळवली येथे असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम महानोंदणी अभियान राबवले. या शिबिराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत श्रम कार्डचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत

उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयात उपक्रम परिवहन सेवेचाही शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालय कार्यान्वीत झाले असून, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त विद्यालयामध्ये सोमवारी (दि. 4) स्वागत समारंभाचे आयोजन रयतचे मॅनेजिंग कौंन्सिल …

Read More »

पनवेल महानगरपालिका हद्दीतील  विकासकामांसंदर्भात पाहणी दौरा

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून अधिकार्‍यांना सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका हद्दीत विविध विकासकामे सुरू आहेत. त्यानुसार या सुरू असणार्‍या विकासकामांची व पुढील काळात करण्यात येणार्‍या विकासकामांच्या अनुषंगाने त्या त्या समस्यांची सभागृह नेते परेश ठाकूर पाहणी …

Read More »

नागोठण्याजवळ महिलेची हत्या करून जाळले; आरोपी गजाआड

नागोठणे, पाली : प्रतिनिधी पेण तालुक्यातील शिहू बेणसे येथील घनदाट जंगलात एका महिलेला अनैतिक संबंधातून ठार मारून पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 3) घडली. या निर्घृण हत्येने एकच खळबळ उडाली. दरम्यान, नागोठणे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिला ही आरोपी विजय लक्ष्मण शिद (वय …

Read More »