Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाडच्या प्रशांत जाधवची पॅराऑलिम्पिकसाठी निवड

महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील वेटलिफ्टर प्रशांत चायाजी जाधव याची कोलकाता येथे होणार्‍या पॅराऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या संघात प्रशांतचा समावेश करण्यात आला आहे. प्रशांत जाधव या दिव्यांग तरुणाने आपल्या दिव्यांगत्वावर मात करीत वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात नाव उंचावले आहे. गेल्या अनेक वर्षांत मुंबईसह विविध ठिकाणच्या स्पर्धांमधून …

Read More »

राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र उपविजेता; अनुज सरनाईकला सुवर्णपदक

सुधागड ः रामप्रहर वृत्त पंजाबमधील लुधियाना येथील जीएसजी खालसा कॉलेज या ठिकाणी इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनने आयोजित केलेल्या वरिष्ठ गटातील राष्ट्रीय स्पर्धेत अनुज सरनाईकने नेत्रदीपक कामगिरी केली. अनुजने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना 85 ते 90 वजनी गटात पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीर (स्टेट पोलीस), कर्नाटक आणि अंतिम सामन्यात हरियाणाच्या खेळाडूला हरवून …

Read More »

मायनॉरिटी उर्दू कन्याशाळेत निरोप समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पीपल्स अ‍ॅन्ड पेरेन्टस् असोसिएशन पनवेल या संस्थेचा मायनॉरिटी उर्दु कन्या शाळेचा इयत्ता दहावीचा निरोप समारंभ नुकताच झाला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष वाहिद हुसेन शेख साहेब व उपाध्यक्ष जुबेर पिटटू तसेच सेक्रेटरी अजीम शब्बीर मुल्ला उर्दु कमिटीचे चेअरमन अब्दुल हमीद धुरू असलम पठाण, वहाब दाखवे, डॉ. आमीना कच्छी …

Read More »

हायवेवरून टँकर 20 फूट खाली कोसळला; चालकाचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर पुण्याहून मुंबईला निघालेल्या केमिकल भरलेला टँकर एक्सप्रेस हायवेवरील पनवेलजवळील नेवाळी ब्रिजजवळ आला असता रस्तासोडून 20 फूट खाली कोसळल्याने टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात चालक अरविंद यादव याला आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात टँकरची पुढील चाके निखळली असून बाजूला फेकली गेली आहेत. यावरून …

Read More »

भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासींना धान्यवाटप

आज विविध कार्यक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे ओबीसी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त करंबेली आदिवासीवाडी येथे शनिवारी (दि. 19) धान्याचे वाटप करण्यात आले. येथील नागरिकांनी देशेकर यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. दरम्यान, रविवारी (दि. 20) होणार्‍या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार …

Read More »

कळंबुसरे गावातील भात गिरण धुळखात

राज्य सरकारचे शेतकर्‍यांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष उरण : वार्ताहर, प्रतिनिधी एकीकडे केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी विविध उपाययोजना करीत असताना राज्यातील सरकार मात्र शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यातील शेती संबंधित विभाग मरगळलेल्या स्थितीत असल्याचे पहावयास मिळत आहे. अशीच एक उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील सहकारी भात गिरण पडिक अवस्थेत असल्याने येथील शेतकर्‍यांची भात …

Read More »

कोरोनाचा पुन्हा धोका?

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संसर्ग ओसरल्यानंतर सर्वांना दिलासा मिळाला असतानाच आता पुन्हा एकदा कोविड विषाणूने उगमस्थान असलेल्या चीन तसेच अन्य देशांमध्ये डोके वर काढले आहे. दक्षिण कोरियातही कोरोनाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी परत लॉकडाऊनची वेळ आली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे. गेली दोन वर्षे पाठशिवणीचा खेळ …

Read More »

उमरोली येथे लागलेल्या आगीत वखार जळून खाक

कर्जत : बातमीदार कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील उमरोली गावासमोर असलेल्या वखारीला शुक्रवारी (दि. 18) दुपारी आग लागली. त्यात एक टेम्पो तसेच दुचाकी जळून खाक झाली. वखारीमधील सिमेंट पत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वखारीच्या मागे असलेल्या माळरानावर प्रथम आग लगली. ही आग नंतर वखारीपर्यंत पोहचल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला जात आहे. कर्जत तालुक्यातील …

Read More »

पनवेलमध्ये आज ’गीतांजली’; देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त संस्कार भारती, उत्तर रायगड जिल्हा, पनवेल समिती आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 19) सायंकाळी 4.30 वाजता गीतांजली हा देशभक्तीपर गीतांचा सुरमयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम …

Read More »

कर्जतमध्ये धुळवड खेळून पोहायला गेलेल्याचा बुडून मृत्यू

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या डोहात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे धुलिवंदनच्या उत्साहाला गालबोट लागले. कर्जत दहिवली भागात राहणारे काही तरुण शुक्रवारी (दि. 18) धुलिवंदन साजरा करून अंघोळ करण्यासाठी सांगावी-खांडपे येथील उल्हास नदीच्या डोहामध्ये दुपारी 1 वाजता गेले होते. त्या 10 जणांच्या ग्रुपमधील दोन तरुण करण धर्मसिंह …

Read More »