Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये उद्या ‘मेरी आवाज ही पहचान है’

स्व. लतादिदींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सुमधूर गीतांचा कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरेल आणि सोनेरी आठवणींना उजाळा देण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी (दि. 24) रात्री 8 वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’मेरी आवाज ही पहचान है’ या सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री. …

Read More »

आता मोबाइलवरूनही भरता येणार पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर

पीएमसी टॅक्स अ‍ॅपचे उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका करदात्यांना आता घर बसल्या आपल्या महापालिका करांचा भरणा करता येणार आहे. त्याचप्रमाणो नावातील फेरफार किंवा तक्रारीबाबत आक्षेप, मालमत्ता उतारा व थकबाकीदार नसल्याचा दाखला महापालिका कार्यालयात न जाता मोबाइलवरून भरता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या नवीन अ‍ॅपचे उद्घाटन पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या …

Read More »

उलवे नोडमध्ये हळदीकुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका भारतीय जनता पक्ष आणि उलवे नोड 2 महिला मोर्चा कमिटीतर्फे हळदीकुंकू समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी (दि. 21) झाला या समारंभाचे भाजप नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाकडे शिवसेनेच्या आमदारांनी फिरवली पाठ

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 22) ऑनलाइन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या दोघांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाकडे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे या तीनही आमदारांनी …

Read More »

सिडकोकडून 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तांतरण

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोकडून  सोमवारी (दि. 21) दुसर्‍या टप्प्यात पनवेल तालुक्यातील, सिडको अधिकारक्षेत्रातील 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाला करण्यात आले. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते मुंबई कांदळवन संधारण घटक  विभागीय वन अधिकारी एम आदर्श रेड्डी यांना हे कांदळवन क्षेत्राचे …

Read More »

बेलपाडा मार्केटमध्ये शौचालय बांधून द्या

भाजप नेते प्रभाकर घरत यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील सेक्टर 4च्या भूखंड क्र. 19ए मधील मार्केटमध्ये सार्वजनिक मुतारी तसेच शौचालय बांधून देण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी सिडको व महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. खारघर सेक्टर 4च्या भूखंड क्र. 19ए मधील मार्केटमध्ये मुतारी तसेच शौचालयाची …

Read More »

उरण पोलीस ठाण्यात हळदीकुंकू

उरण : वार्ताहर उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पोलीस ठाण्यात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दंडाधिकारी उरण कोर्ट जज्ज प्रियंका पठाडे, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी नगरसेवक अफशा मुकरी, माजी उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, सीमा घरत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. भारतरत्न गाणंसम्राज्ञी लता मंगेशकर यांना …

Read More »

कळंबोलीत ई श्रम महा नोंदणी अभियान

कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर अरुण पाटील यांनी कळंबोली प्रभाग क्र. 7 मध्ये मोफत ई श्रम महा नोंदणी अभियान शनिवार (दि. 19) व रविवार (दि. 20) आयोजित केले होते. या कार्यक्रमात 270 नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती …

Read More »

मोबाइल चोरटा अटकेत

साडेचार लाखांचा माल हस्तगत पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांच्याकडून घरातील उघडे दरवाजे, तसेच शटर आणि गर्दीच्या ठिकाणाहून मोबाइल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चार लाख 50 हजार रूपये किमतीचे एकुण 28 मोबाइल हस्तगत करून नवी मुंबई, पुणे आयुक्तालयातील एकुण 10 गुन्हे उघडकीस …

Read More »

खारघर डोंगरावर मोठी पर्यावरण हानी?

सिडकोला नेचर पार्क प्रकल्पाचा विसर; भविष्यात टेकडीच्या सपाटीकरणाचा वन विभागाचा अंदाज पनवेल : वार्ताहर खारघर डोंगरावर होणारी वृक्ष तोड, नागरिकांनी पाटर्यामुळे पसरणारी अस्वच्छता यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खारघर टेकडीवर सिडकोने पाच वर्षांपूर्वी दहा कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च करून नेचर पार्क उभारण्याचा संकल्प केला होता. …

Read More »