Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

बेकायदेशीर कंटेनरयार्ड चालवणार्‍या भूमाफियावर कारवाई करा -आमदार महेश बालदी

तातडीने कारवाई करण्याचे विधानसभा अध्यक्षांकडून निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोच्या जागेवर बेकायदेशीर कंटेनरयार्ड चालवणार्‍या भूमाफियावर कारवाई करा, अशी मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 24) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली. त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सिडकोला दिले. …

Read More »

अवकाळीने वीटभट्टींचे कोट्यवधींचे नुकसान

कच्चा माल तुटला; भट्ट्या कोलमडल्या मोहोपाडा ः प्रतिनिधी गेले काही दिवस अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असतानाच दोन-तीन तास मुसळधार पडलेल्या पावसामुळे वीटभट्टी चालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. पावसामुळे वीटभट्टीवरील कच्चा माल तुटून पडला आहे, तर लावलेल्या भट्ट्या कोलमडल्या आहेत.एकीकडे रॉयल्टीसाठी शासन तगादा लावत असताना दुसरीकडे सिमेंट ब्लॉकमुळे पारंपरिक मातीवीट व्यवसाय …

Read More »

गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

टोळीने लाखो लुबाडले; पोलिसांकडून शोध सुरू पनवेल ः वार्ताहर क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून त्या बदल्यात जास्त पैसे मिळवून देतो, असे सांगून एका टोळीने कामोठे येथील नागरिकाची एक लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे येथील बाळासाहेब दुरगुडे हे बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्यावरून एलआयसीच्या हप्त्याचे पैसे भरत …

Read More »

पनवेल मनपा ज्युनिअर केजीच्या वर्गासाठी 27 मार्चपासून प्रवेश अर्ज

पनवेल : वार्ताहर सर्वसामान्य घटकातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या हेतूने पनवेल महापालिकेमार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23पासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक 2023-24साठी ज्युनियर केजीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मागील वर्षी महापालिकेच्या या शाळेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या शाळेचे पनवेलकरांकडून स्वागत होत …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता करामध्ये दिलासा देण्यासाठी कायद्यात काही बदल करावा लागला तरी तो करून पनवेलकरांना मदत करावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील विशेषतः सिडको वसाहतीमधील मालमत्ता …

Read More »

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, तरुण-तरुणी, जेष्ठ नागरिक, राजकीय मंडळींनी उत्साहाने सहभाग घेतला होता. गेले दोन दिवस पनवेलमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे शोभायात्रेच्या आनंदावर विरजण पडण्याची भीती होती, मात्र बुधवारी अवकाळी पावसाने माघार घेतल्यामुळे दरवर्षीप्रमाणे पनवेलमधील शोभायात्रा मोठ्या …

Read More »

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मंगळसूत्र खेचून मोटारसायकलवरून पसार होणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना अखेरीस खारघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व एक मोटार सायकल असा मिळून जवळपास 4 लाख 75 हजार रुपये …

Read More »

नैना प्राधिकरणाने जनहिताबाबतची भूमिका स्पष्ट करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिवेशनात मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त नैना प्राधिकरण जर जनतेच्या हिताचा आहे, तर सरकारच्या माध्यमातून सिडको नैना प्राधिकरणाने पुढे येऊन स्पष्टपणे भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. आमदार प्रशांत …

Read More »

पनवेल परिसरात तीन वेगवगेळ्या अपघातात एक ठार

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना घडली असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे-मुंबई लेनवर बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव टाटा टेम्पोने धडक दिल्याने टेम्पोमधील प्रवाश्याचा यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पोचालकाने रस्त्याच्या बाजूला बंद पडलेल्या …

Read More »

रायगडात पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याच्या काही भागांत मंगळवारी (दि. 21) पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडला. या जोरदार पावसामुळे सकाळी कामावर जाणारे कामगार आणि शाळेकडे निघालेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. वरुणराजाने सकाळीच हजेरी लावली. या पावसाचा प्रामुख्याने जोर उत्तर रायगडात दिसून आला. पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, अलिबाग, रोहा अशा अनेक तालुक्यांमध्ये …

Read More »