Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

खारघर टोल नाका येथे जनावरांच्या मांसाने भरलेला टेम्पो जप्त

फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची कत्तल करुन टेम्पोमधून सुमारे 350 किलो वजनाचे मुंबईमध्ये नेले जाणारे जनावरांचे मांस पकडण्याची कारवाई खारघर पोलिसांनी सायन-पनवेल मार्गावरील खारघर टोल नाका येथे केली. या कारवाईत पोलिसांनी जनावरांचे मांस घेऊन जाणार्‍या टेम्पोसह मांस जप्त केले आहे. या वेळी टेम्पोचालक पळून गेल्याने …

Read More »

चिंचवणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यातून पनवेल तालुक्यातील आणि उरण मतदारसंघातील चिंचवण गावात सुमारे एक कोटी 23 लाख रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 20) झाले. पनवेल …

Read More »

ग्रामस्थांच्या हिताचे निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही कार्यवाही नको -आमदार महेश बालदी

पनवेल : रामप्रहर वृत्त जोपर्यंत पुनाडे, वशेणी व सारडे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हिताचे सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू नये, अशी ठाम भूमिका आमदार महेश बालदी यांनी प्रांताधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मांडली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिकीकरणासाठी उरणमधील पुनाडे, वशेणी व सारडे या तीन गावातील …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारपासून युवा वॉरियर्स फुटबॉल स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने 20 व 21 मे रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर युवा वॉरियर्स फुटबॉल भव्य …

Read More »

युवा वॉरियर्स कबड्डी लीगचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा वॉरियर्स कबड्डी लीग स्पर्धेच्या निमित्ताने जपान विरुद्ध पनवेल असा प्रेक्षणीय सामना रसिकांना अनुभवयास मिळाला. समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता …

Read More »

कामोठे येथील बांगलादेशींवर कारवाई

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील एका चाळीत बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या आठ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चार महिला आणि चार पुरुषांचा समावेश असून ते 22 ते 48 वयोगटातील आरोपी आहेत. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली आहे. इरशाद मुल्ली, जनुअल इस्लम, अनिउल आलम, कोकन शेख, पिंकी …

Read More »

पावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदीकडे कल

पनवेल : वार्ताहर पावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यासाठी सुकी मच्छी साठवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. प्रजनन काळात ओल्या मच्छीला बंदी असते अशावेळी ओली मच्छी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मांसाहारी वर्ग …

Read More »

मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध -केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला

उरण : रामप्रहर वृत्त आपल्या देशाला लांबच लांब समुद्रकिनारे लाभले आहेत. या सामुद्रिक संपत्तीवर उपजीविका करणार्‍या आमच्या मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासन कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री परषोत्तम रूपाला यांनी येथे दिली. सागर परिक्रमा कार्यक्रम 2023 अंतर्गत पाचव्या …

Read More »

नैना परिक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका -पालकमंत्री उदय सामंत

पनवेल : रामप्रहर वृत्त नैना परिक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार प्रशांत ठाकूर व शिष्टमंडळाला दिले. नैना क्षेत्रातील शेतकर्‍यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. त्या अनुषंगाने व त्यांच्या मागणीनुसार …

Read More »

यंदा मान्सून उशिराने; ‘स्कायमेट’चा अंदाज

मुंबई : प्रतिनिधी यंदा मान्सून अंदमानमध्ये उशिराने दाखल होण्याचा अंदाज हवामानाची माहिती देणार्‍या स्कायमेट वेदर या खासगी संस्थेने वर्तविला आहे तसेच केरळात नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र नैऋत्य मान्सूनसंदर्भात आताच सांगणे कठीण असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. मान्सून अंदमानमध्ये साधारणत: 22 मे रोजी दाखल …

Read More »