पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन पनवेल : वार्ताहर मराठी अस्मिता जपण्यासाठी दुकाने व आस्थापनांच्या नामफलकांवर मराठी भाषेत नाव असलेच पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह शिष्टमंडळाने केली आहे. या संदर्भात शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. पनवेल महापालिका …
Read More »सीकेटी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यम माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीचा शुभेच्छा चिंतनपर कार्यक्रम सोमवारी (दि. 20) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन …
Read More »पिसाळलेल्या श्वानाची दहशत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरामध्ये एका पिसाळलेल्या श्वानाने दहशत पसरवली आहे. या श्वानाने दोन दिवसांत अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. महापालिकेचे पथक या श्वानाचा शोध घेत आहेत. पनवेल शहरामध्ये सोमवारी लाईन आळी परिसरात तसेच टपाल नाका परिसरातील युनियन हॉटेल येथे अनेक नागरिकांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला. तर मंगळवारी (दि. …
Read More »मोहोपाडा तलावाला मद्यपींचा विळखा
मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा परिसरातील वासांबे देवी ही ग्रामस्थांचे श्रध्दास्थान आहे. तलावाकाठी गावदेवीचे मंदिर आहे. मंदिराजवळील मोकळ्या जागेत तसेच गणपती विसर्जन घाटावर सायंकाळी मद्यप्राशन करणार्या तळीरामांचा वावर दिसून येत असून या ठिकाणी संध्याकाळच्या काळोखाचा फायदा घेत तळ्यावर तळीराम मद्यपान करताना दिसून येत आहेत. यामुळे येथून जाणार्या-येणार्या नागरिकांमध्ये विशेषतः महिला वर्गात …
Read More »भाजप नेते विक्रांत पाटील यांच्या कार्यालयाजवळ शिवजन्मोत्सव
पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन विक्रांत पाटील शिवजन्मोत्सव प्रभागातील नागरिकांच्या सोबत मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यानुसार यावर्षी खास किल्ले रायगड वरून शिवज्योत आणण्यात आली होती, तसेच साक्षात माता …
Read More »पनवेल महापालिकेचा शिलकी अर्थसंकल्प सादर; आरोग्याला प्राधान्य
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा सन 2023-24चा शिलकी अर्थसंकल्प मंगळवारी (दि. 21) सादर झाला असून 2291 कोटी 48 लाखांच्या या अर्थसंकल्पात पनवेलकरांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार माता बालसंगोपन केंद्र, 15 यूपीएससी, 50 बेडची दोन हॉस्पिटल व प्रत्येक प्रभागात फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेतर्फे इंग्रजी …
Read More »तळोजा येथे इमारतीमध्ये लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक
पनवेल : वार्ताहर तळोजा फेस-2 मधील केदार सोसायटीच्या 13व्या मजल्यावर आगीची घटना घडली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले. तळोजा फेज-2 मधील सेक्टर 21 मध्ये केदार गृहसंकुलातील एल – 8 इमारतीच्या 13व्या मजल्यावर भाड्याने वास्तव्य करीत असलेल्या अजय बिलोड यांच्या घरात आग लागली. या …
Read More »पनवेलमध्ये साडेतीन कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन विदेशींवर गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर तेलंगणा राज्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला पनवेलजवळील आदई गावात अमली पदार्थांचा साठा आढळला आहे. एका इमारतीमध्ये चार किलो 98 ग्रॅम वजनाचा व तीन कोटी 48 लाख रुपये किमतीचा मेथँक्युलोन हे ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केले असून या प्रकरणी बेन ओकोरोको व एका नायझेरियन महिलेच्या विरोधात …
Read More »दिव्यांग शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त सतीश हावरे दिव्यांग शाळेचा आठवा वार्षिक क्रीडा महोत्सव खारघरमध्ये झाला. या महोत्सवात सुमारे 40 दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध खेळांत सहभाग घेत प्रतिसाद दिला. या वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे, प्रवीण बेरा व विशाल उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना मेडल, सर्टिफिकेट व …
Read More »वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे गणेश पाटील बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील वाजे गु्रप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे गणेश किसन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. वाजे गु्रप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक सोमवारी (दि. 20) झाली. या निवडणुकीत गणेश किसन पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper