Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

राष्ट्रीय वक्तृत्व कार्यक्रमात ‘सीकेटी’ची प्रिया चौधरी चमकली

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रिया चौधरी हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत संसदेत उत्कृष्ट भाषण केले व आपल्या वक्तृत्व शैलीने छाप सोडली. तिने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे …

Read More »

पनवेल ग्रामीण भागात लागणार पाण्याचे मीटर

खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेल शहर व 29 गावांमध्ये लवकरच पाण्याचे मीटर लागणार आहेत. यासंदर्भात लवकरच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत निविदा काढण्यात येणार असून याकरिता सुमारे 18 कोटींचा खर्च येणार आहे. अमृत योजनेअंतर्गत या कामाला मंजुरीदेखील मिळाली आहे. पनवेल शहर व ग्रामीण भागात हे मीटर लागणार …

Read More »

पनवेलमध्ये स्वच्छता मोहिमेद्वारे स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022-23ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्या अंतर्गत पुतळे व उद्याने यांची स्वच्छता मोहिम महापालिकेच्या वतीने नुकतीच घेण्यात आली. स्वच्छता श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून ‘रिस्पेक्ट टू फ्रिडम फाईटर’ अर्थात स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण …

Read More »

‘समृद्धी’च्या फोटोग्राफीचा लक्ष्मण ठाकूर यांना मान

पनवेल : रामप्रहर वृत्त विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या महामार्गाची शासकीय फोटोग्राफी दै. रामप्रहरचे छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर व सहकार्‍यांनी केली आहे. लक्ष्मण ठाकूर हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे चार दिवस टीमसमवेत समृद्धी …

Read More »

पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत जितेंद्र पाटील यांना वाढता पाठिंबा

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात 17 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचाराचे पडघम वाजू लागले असून, पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र सदानंद पाटील हे लोकनियुक्त सरपंच पदासाठी श्री राम समर्थ आघाडीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तरुणांचे आशास्थान आणि स्थानिक पातळीवर मोठ्या उमेदीने कार्यरत असलेले जितेंद्र …

Read More »

कृतज्ञता सप्ताह सांगता समारंभाच्या तयारीचा आढावा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली पाहणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने ‘कृतज्ञता सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. हा सप्ताहा अंतर्गत संस्थेच्या सर्व शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या कृतज्ञता सप्ताहाचा सांगता समारंभ …

Read More »

पदपथावर अवैध धंदे, पार्किंगची समस्या

पनवेलमध्ये वाहतूक शाखेची कारवाई सातत्याने व्हावी; नागरिकांची मागणी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत पदपथावरील अवैधधंदे दुचाकी आणि  चारचाकी वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रस्त्यावरून चालताना त्रास होत आहे. एखादा अपघात झाल्यावरच त्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत. नवीन पनवेलमध्ये …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैज्ञानिक प्रज्ञेश म्हात्रे यांना परदेशातील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त वैज्ञानिक प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात संधी मिळाली असून त्यांच्या भरारीला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करून बळ दिले आहे. प्रज्ञेश म्हात्रे हे युनायटेड स्टेट अर्थात अमेरिकेत एअरोस्पेस इंजिनिअरिंग प्रोग्राम या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार आहेत. श्री. रामशेठ …

Read More »

मद्यपी बसचालकाचा विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ

उलवे नोडमधील धक्कादायक प्रकार पनवेल : वार्ताहर उलवे नोडमधील आयएमएस गु्रप ऑफ स्कूलचा चालक चक्क दारू पिऊन बस चालवत असल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 13) घडला. त्यामुळे बसमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यधुंद चालकाने विद्यार्थ्यांनी भरलेली बस ही उभ्या असलेल्या रिक्षेला ठोकली. त्या वेळी या बसचालकाला उभेही राहता येत …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा बैठकांवर भर

पनवेलमध्ये तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी घेतला आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली नितळस, नेरे, शिवकर आणि शिरढोण येथे मंगळवारी (दि. 13) आढावा बैठका झाल्या. या बैठकांना भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी …

Read More »