पनवेल ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी सन 2008पासून सर्वस्तरातून होत असताना एप्रिल 2021मध्ये दुसरे नाव समोर आल्याने ‘दिबां’च्या नावासाठी संघर्षाची ज्योत तयार करण्याचे काम जासई गाव आणि चळवळीतील समाजप्रिय कार्यकर्ता मेघनाथ म्हात्रे व सहकार्यांनी केले. मेघनाथ यांना काळाने आपल्यातून हिरावून …
Read More »विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी 9 ऑगस्टला मशाल मोर्चा; सर्वपक्षीय कृती समितीची आढावा बैठक
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »धडाकेबाज इलेव्हन संघ एनपीएलचा विजेता
पनवेल ः वार्ताहर नेरे प्रीमियर लीग (एनपीएल) 2021चा बक्षीस वितरण समारंभ नेरे हायस्कूल येथे नुकताच पार पडला. या वेळी धडाकेबाज इलेव्हन संघाला भव्य चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला जनसेवा संघ नेरेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री म्हसकर, दर्शन ठाकूर, योगेश तांबोळी, शंकर ठाकूर, …
Read More »सुधागड विद्यासंकुलतर्फे पूरग्रस्तांना वस्तू
उरण : वार्ताहर अतिवृष्टीमूळे कोकण किणारपट्टीवरील रायगड जिल्हातील महाड तालुक्यांतील सावित्री नदीला आलेल्या महापूरामूळे महाड शहर व आजुबाजूच्या गावांची मोठी वाताहत झाली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीचे भान ठेवून सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल परिवाराच्या वतीने महाड शहरातील वेताळवाडी, तांबडभवन तसेच महाड शहरालगतच्या आजूबाजूच्या गावातील 180 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू, …
Read More »भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय साहित्याची मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आला. या पूरग्रस्त भागामध्ये माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पाहणी केली. त्यानुसार येथील झालेले नुकसान पाहता भविष्यात या ठिकाणी आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. त्याअनुषंगाने पनवेल भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी आरोग्यविषयक …
Read More »एक हात मदतीचा… परिस्थिती सावरण्याचा!; महाडकरांना साहित्य वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त ’एक हात मदतीचा… परिस्थिती सावरण्याचा’ या उद्देशातून पनवेल येथील वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (व्हीडीआयपीएल)च्या वतीने महाड येथील पूरग्रस्तांना 700 चादर, 700 ब्लँकेट आणि 1400 टॉवेल आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख …
Read More »कै. मेघनाथ म्हात्रे यांची आज शोकसभा
उरण ः रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे सक्रिय कार्यकारणी सदस्य मेघनाथ अमृत म्हात्रे (जासई, ता. उरण) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालयात रविवारी (दि. 1 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली …
Read More »‘रोटरी‘चा पदग्रहण सोहळा उत्साहात
पनवेल : वार्ताहर रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा व डॉ. रमेश पटेल यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 31) रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा झाला. मावळते अध्यक्ष संजय झेमसे यांनी मागील वर्षभरात केलेले कार्य सांगून सर्व सदस्यांचे आभार मानले. त्यांनी रोटरी कॉलर नवीन अध्यक्ष विजय निगडे यांच्या …
Read More »महिला व बालकल्याण समितीतर्फे विधवा महिलांना अर्थसहाय्य करावे
सभापती मोनिका महानवर यांचे आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे पालिका हद्दीतील विधवा महिलांना अर्थसहाय्य करण्यात यावे, अशी मागणी समितीच्या सभापती मोनिका महानवर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देऊन केली आहे. महानवर यांनी निवेदनात म्हटले की, पनवेल महापालिकेतील सन 2020-21 या वर्षी ज्या …
Read More »संभाव्य तिसर्या लाटेला रोखण्यासाठी पनवेल पालिका सज्ज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय आरोग्य विभागाची आढावा बैठक पनवेल : वार्ताहर कोविडची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तज्ज्ञांनी कोविडची तिसरी लाट येण्याचे भाकित केले आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासन संभाव्य तिसर्या लाटेला रोखण्यासाठी सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper