महापालिकेतर्फे कोरोना चाचण्यांत वाढ पनवेल : प्रतिनिधी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आरटी-पीसीआर व अॅन्टीजन चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची प्रभावी अंमलबजावणी पनवेल पालिका कार्यक्षेत्रात केली जात आहे. गेल्या जुलै महिन्यामध्ये पालिकेने एक लाख आठ हजार 087 आरटी-पीसीआर व अॅन्टीजेन चाचण्या केल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे महापालिका कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर कमी झाला …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे ‘शंभरनंबरी’ यश
खारघर ः शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने सीबीएसई दहावीच्या निकालात 100 टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. स्कूलचे भाग्यश्री शरद सुरासे (99.80%), अर्णव मेश्राम (99.40%), जश मणियार (98.60%) आणि तेजस कदम (98.60%) हे चार विद्यार्थी गुणवत्ता …
Read More »गणेश उत्सव साधेपणाने करण्याचे पनवेल महापालिकेचे आवाहन
पनवेल : प्रतिनिधी कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. श्री. गणेशाची मुर्ती सार्वजनिक …
Read More »स्वत:सह परिवाराची काळजी घ्या
पनवेल पालिका आयुक्तांचे अधिकार्यांना आवाहन पनवेल : प्रतिनिधी महापालिकेच्या विविध विभागातील कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि .2) झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिकार्यांनी स्वत:ची व स्वत:च्या परिवाराची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापौर बंगल्याचे बांधकामाचे काम हाती घेण्याच्या दृष्टीने …
Read More »सव्वा दोन कोटींची वाहने हस्तगत
दोन जणांच्या मुसक्या आवळल्या पनवेल : वार्ताहर मोटार गाड्यांची फसवणुक व अपहार करणार्या दोन आरोपींच्या मुसक्या नेरूळ पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्या अटकेमुळे सात गुन्ह्यांची उकल करून 31 चार चाकी वाहने (किंमत दोन कोटी दहा लाख रुपये) हस्तगत करण्यात आली आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात वाहन फसवणुकीसंदर्भात गुन्हा नोंद (गुन्हा नोंद क्रं. …
Read More »नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून महाडकरांना मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनानुसार पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व जाणीव एक सामाजिक संस्थाचे संस्थापक नितीन जयराम पाटील यांच्याकडून महाड येथील पूरग्रस्तांना तांदूळ, दोन डाळी, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, अशी शिधासामुग्री देण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पनवेल नगरी यांच्या माध्यमातून ही …
Read More »‘इ स्टोर इंडिया’ची पूरग्रस्तांना मदत
पनवेल : प्रतिनिधी इ स्टोर इंडिया या सुपर बाजारच्या पनवेलच्या मालक व कार्यकर्त्या रेणुका पन्हाळे यांनी महाड येथील पूरग्रस्त बांधवाना मदतीचा हात दिला आहे. पनवेल शहरातील टपालनाका येथील मोमीनपाडामधील साई सारंग कॉ ऑप. हौ. सोसायटी या ठिकाणी सर्वांना सवलतीच्या दरात जीवनावश्यक साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता वेदिक आयुरकेअर कंपनीने इ-स्टोर इंडिया …
Read More »वडाळे तलावाच्या रस्त्यावर थर्मोप्लास्ट गतिरोधक
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर नव्याने सुशोभित करण्यात आलेल्या वडाळे तलावाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. नवीन पनवेलकडून जुन्या पनवेल आणि अमरधामकडे जाणारा हा रस्ता सुस्थितीत असल्याने वाहन चालक व बाईक स्वार वेगाने गाड्या चालवत असल्याची बाब काही सतर्क नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. …
Read More »भाजपच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील रहिवासी श्री देविदास जाधव हे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातून 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्काराचा कार्यक्रम भाजप कळंबोली आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक कमल कोठारी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भाजप कळंबोली शहर सरचिटणीस …
Read More »राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या योगिनी पाटीलला रौप्यपदक
पनवेल ः वार्ताहर पनवेलमधील दोन मुलींनी 25 जुलै ते 31 जुलैदरम्यान हरियाणाच्या सोनीपत येथे आयोजित चौथ्या बीएफआय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये योगिनी पाटील ही 52 किलो वजनी गटात खेळली व तिने रौप्यपदक जिंकले. योगिनीने प्राथमिक तसेच उपांत्य फेरीत मध्य प्रदेश, प. बंगाल आणि दिल्लीच्या बॉक्सर्सचा पराभव केला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper