Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सीकेटीच्या विद्यार्थ्यांचे गणित संबोध परीक्षेत सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत चांगू काना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमिक विद्यालयाने अत्यंत नेत्रदीपक यश प्राप्त केले. सीकेटीचे 38 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यामध्ये कौशल मनोज गोसावी (पाचवी), ऋतुजा नरेंद्र म्हात्रे (पाचवी), ऋत्विक शिवदास पाटील (पाचवी), प्रचिती संतोष घोलप (पाचवी), …

Read More »

कळंबोली सर्कलला जुगाराचा विळखा

कळंबोली : बातमीदार कळंबोली सर्कलच्या बाजूला असलेल्या कळंबोली वाहतूक पोलीस कार्यालयाच्या बाजूलाच जुगाराचा अड्डा रोज सकाळी 8 वाजल्यापासून मांडला जात आहे. या जुगार अड्ड्यावर माथाडी कामगार, तसेच अन्य कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. प्रथमदर्शनी जुगार खेळताना जिंकण्याचे आमिष दाखवून नंतर कंगाल करण्याचा अनोखा प्रकार केला जात आहे, मात्र …

Read More »

विकासपूर्व कामे अंतिम टप्प्यात, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याचा विश्वास

पनवेल : बातमीदार सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याच्या अगोदर करावयाची विकासपूर्व कामे अजून सुरूच आहेत. यात सर्वधिक महत्त्वाचे असलेले टेकडी सपाटीकरण, नदीचा प्रवाह बदलणे आणि दहा गावांचे स्थलांतर करून ती जागा मिळवून देणे ही कामे आता अंतिम टप्प्यात असून, या वर्षीच्या डिसेंबरअखेर …

Read More »

पायी दिंडीचे धाकटी पंढरीला प्रयाण

मोहोपाडा : वार्ताहर श्री विठ्ठल पायी कोकण दिंडी आयोजित स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य कांबेकर महाराज, सुखनिवासी गोमाजीबाबा गायकर, सुखनिवासी भगोजीबाबा, सुखनिवासी झिपरूबाबा, सुखनिवासी गणपतबाबा मुकादम, गुरुवर्य लक्ष्मण महाराज म्हसकर आणि गणेश सर यांच्या कृपाशीर्वादाने साजगाव येथे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. शिवव्याख्याते कीर्तनकार हभप संतोष महाराज सते यांच्या कुशल मार्गदर्शनाने भाताण …

Read More »

पोदी भागातील भुयारी मार्ग रखडला, महावितरणच्या टॉवरमुळे डिसेंबर 2017 पासून काम बंद

पनवेल : बातमीदार पनवेल रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पोदीवर जाण्यासाठी फाटकामधून जाणे, अजून तरी टळण्याची चिन्हे नाहीत. त्यासाठी अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे. महावितरणची वीजवाहिनी काढण्यास विलंब झाल्यामुळे हे काम रखडले आहे. नवीन पनवेल सेक्टर 15, 15 ए, 16, तसेच पोदी आणि विचुंबे गाव या भागात पनवेलकडून वाहने घेऊन …

Read More »

प्रवासी

एका कार्यक्रमासाठी झारखंडमध्ये जाण्याचा योग आला. देशातील मागासलेल्या बिहार राज्याचे विभाजन करून झारखंडची निर्मिती करण्यात आली. राजधानी रांचीमध्ये नवीन विधान भवन, मंत्रालय आणि शहराची उभारणी सुरू आहे. शहराच्या भोवती रिंग रोड आहे. आपल्या सारखाच पाऊस असूनही रस्ते चांगल्या अवस्थेत आहेत. रांची शहारामध्ये  शेअर रिक्षा जास्त चालतात. त्यांची हद्द ठरलेली  असते. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून तलवारबाज विद्यार्थ्यांचे कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे रविवारी (दि. 10) अभिनंदन केले. हरियाणा येथे नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील तलवारबाजी स्पर्धा चाचणी …

Read More »

इंदूबाई वाजेकर शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश

पनवेल : बातमीदार शैक्षणिक वर्ष 2019-2020मध्ये झालेल्या तलवारबाजी, खो-खो, कबड्डी, बॉक्सिंग, डॉजबॉल, तायक्वांडो, बॅडमिंटन अशा विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये इंदूबाई आ. वाजेकर शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. निमिशा धीरज थवई या विद्यार्थिनीने तलवारबाजी या खेळात सांघिक सुवर्णपदक व वैयक्तिक कांस्यपदक पटकावून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी ती पात्र झाली आहे. …

Read More »

‘त्या’ प्रेमीयुगुलावर खुनाचा गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर आपल्या पतीचा खून करून प्रेमीसह दोन वर्षांच्या मुलीला बरोबर घेऊन पनवेल येथे लपून राहण्यासाठी आलेल्या केरळ राज्यातील प्रेमीयुगुलाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, या दोघांपैकी महिलेची प्रकृती थोड्याफार प्रमाणात सुधारत आहे, तर तिचा प्रेमी अद्यापही धोक्याच्या क्षेत्रात असल्याची माहिती समजते. …

Read More »

रस्त्याच्या दुरुस्ती कामाला वेग; उपमहापौर विक्रांत पाटील यांचे प्रयत्न

पनवेल : वार्ताहर विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पनवेल महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांची डागडुजी, तसेच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. या अंतर्गत उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने व प्रत्यक्ष उभे राहून प्रभागातील महाराणा प्रताप रोड (परदेशी आळी) येथील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेगाने सुरुवात केली. येथील रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर दुसरा लेअर (डीबीएम) मारण्याचे …

Read More »