पेण : प्रतिनिधी
पेणमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णंच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी (दि.17) 12 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली.
पेणमधील नव्याने वाढलेल्या 12 रुग्णांमध्ये चार गडब, दोन वडगाव, एक बेणसे येथील असून पाच रुग्ण हे पेण नगररिषद हद्दीतील आहेत. यामुळे बुधवारी पेणमधील एकूण रुग्ण संख्या 44 झाली असून यामधील 20 रुग्ण बरे झाले असून 24 रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.