Breaking News

Ramprahar News Team

माथेरान घाटात बर्निंग कारचा थरार, चालक प्रवाशी थोडक्यात बचावले

कर्जत – प्रतिनिधी      आज  माथेरान घाटात एका पर्यटक वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे.  या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी कार जळुन खाक झाली आहे. हुंडाई कंपनीची सी एन जी आय टेन ही कार असून या मध्ये दोन प्रवाशी प्रवास करत होते. ही आग कारचा पेट्रोल …

Read More »

सायबर कॅफेमध्येे काम करणार्‍या महिलेची गुगल पे वरून 99 हजार 999 रुपयांची फसवणूक

माणगांव : प्रतिनिधी सायबर कॅफेमध्येे काम करणार्‍या महिलेची गुगल पे या यूपीआय अ‍ॅपवरून 99 हजार 999 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6.44 वा. च्या सुमारास फिर्यादी पायल महादेव तांबे, व्यवसाय- सायबर कॅफेमध्ये नोकरी, रा. हातकेली, पो. होडगाव या कामावरून घरी जात …

Read More »

अलिबागवर तिसर्‍या डोळ्याची नजर; शहरात 120 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग शहरातील प्रत्येक भागावर यापुढे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे. शहरात 3 कोटी 50 लाख रुपये खर्चून 120 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून अलिबाग पोलीस शहरात घडणार्‍या गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणार आहेत. जिल्हा नियोजन समिती, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या …

Read More »

महिलेचा खून करून फिर्यादीस ठार मारण्याचा प्रयत्न करणारे दोघे गजाआड

उरण : प्रतिनिधी महिलेचा खून करुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 2 आरोपींना 24 तासांच्या आत न्हावाशेवा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. फिर्यादी सलोनी ओमन हेरेंज (38) धंदा गृहिणी, राह. रवींद्र घरत यांची चाळ, से.15, शेलघर, ता. पनवेल जि. रायगड, मुळ राह जलतांडा, धानामुंजी, जि. कुटी, राज्य झारखंड 8 …

Read More »

हिंदुत्वाचा गजर

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील शासकीय यंत्रणेतील त्यापूर्वीची ढिलाई मागे पडली असून खर्‍या अर्थाने जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे गतिमान सरकार कार्यरत असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. त्यामुळे फडणवीस-शिंदे सरकारच्या विरोधात अवघे बळ एकवटून, एकजुटीने उभे राहण्यासाठी धडपडणार्‍या महाविकास आघाडीसमोर …

Read More »

शिवकरमधील तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले; त्रिकूट गजाआड

पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यातील शिवकर येथे झालेल्या तरुणाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. चोरीसाठी आलेल्या आरोपींना या तरुणाने चोरी करताना पाहिल्यामुळे त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना गजाआड केले आहे. शिवकर येथील 19 वर्षीय विनोद पाटील याची पहाटेच्या सुमारास कुर्‍हाडीने हत्या केल्याची घटना घडली होती. …

Read More »

पनवेलच्या जाखमातेचा पालखी सोहळा उत्साहात

पनवेल ः वार्ताहर पनवेलचे ग्रामदैवत श्री जाखमाता देवीची पालखी परिक्रमा सालाबादप्रमाणे यंदाही शनिवारी (दि. 1) मोठ्या उत्साहात ढोलताशाच्या गजरात निघाली. या सोहळ्यात भाविकांनी सहभाग घेतला. पनवेलकरांचे आराध्यदैवत देवीचे मूळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद इतिहासात सापडते. नागरिकांची या देवीवर अपार श्रद्धा आहे. या देवीचा दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळा आयोजित करण्यात …

Read More »

विकास निधी खर्च करण्यात रायगड अव्वल

अलिबाग ः प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीमधील मंजूर वार्षिक निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा प्रशासनाने सलग दुसर्‍या वर्षी राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. रायगड जिल्ह्यासाठी सरत्या आर्थिक वर्षात 320 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत आपला 100 टक्के लक्ष्यांक पूर्ण केला. राज्य सरकारने 2022- 23 या आर्थिक …

Read More »

चौक विभागात विविध विकासकामांचे भूमिपूजन

आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती चौक ः प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या चौक विभागातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कामोठ्यात जोशी पॉलिक्लिनिकचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 8 येथे डॉ. भावेस कृष्णा जोशी, डॉ. अमिषा स्वप्निल जोशी, डॉ. नसरीन पठाण यांनी जोशी पॉलिक्लिनिक, तर प्रिक अ‍ॅण्ड केअर पॅथॉलॉजी कलेक्शन सेंटर डॉ. रामेश्वर गर्डे आणि डॉ. निकीता घरत यांनी सुरू केले आहे. या पॉलिक्लिनिक आणि पॅथॉलॉजी सेंटरचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …

Read More »