Breaking News

Ramprahar News Team

पनवेल महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महापालिकेच्या वतीने मंगळवार 11 एप्रिल रोजी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा तीन गटात घेतल्या जाणार असून तिन्ही गटांसाठी विषय सारखेच असतील. निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात …

Read More »

कर्नाळाच्या हद्दीत लाकडाने भरलेला ट्रक उलटला

पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळाच्या हद्दीत आज पहाटे कोकणातून ठाणे येथे जाण्यासाठी निघालेला लाकडाने भरलेला ट्रक पनवेल बाजूकडे येत असताना पलटी झाल्याने प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कोकणातील खेड येथून ठाणे मुलुंड स्मशानभूमीसाठी लाकडे घेऊन जाणारा अशोक लेलँड ट्रक (एमएच 50 एन 1296) पनवेल बाजूकडे भरधाव …

Read More »

खोपोली नगर परिषदेचा स्वच्छोत्सव

शेकडो महिलांचा सहभाग; वेशभूषा आणि डोक्यावरील फेटा ठरला लक्षवेधक खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगर परिषद परिक्षेत्रातील महिलांच्या सहभागातून स्वच्छोत्सव 2023 अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वच्छोत्सवाचा शुभारंभ घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन आणि पुष्पमाला अर्पण करून करण्यात आला. या वेळी उपस्थित शेकडो महिलांनी हिरव्या रंगाचा …

Read More »

नवीन वर्ष दिलासादायक

केंद्र आणि राज्य शासनाचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. यामध्ये सर्वसामान्य लोकांचा विचार करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकूणच शासनाने सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर करीत सर्वसामान्यांच्या हृदयात घर केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यानंतर आता नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. भारत ही जगातील सर्वांत …

Read More »

माथेरानमधील पहिल्या महिला ई-रिक्षा चालक ठरल्या कविता बल्लाळ

कर्जत : प्रतिनिधी माथेरानमधील दहा तरुणांनी ई-रिक्षाचे सारथ्य करण्यासाठी रिक्षाचालक परवाना राज्य परिवहन विभागाकडून मिळविला आहे. त्यात माथेरानमधील कविता बल्लाळ या रिक्षाचालक परवाना मिळविणार्‍या पहिल्या महिला रिक्षाचालक बनल्या आहेत. माथेरानमध्ये वाहतुकीचे नवीन साधन म्हणून ई-रिक्षा सुरु होण्याची शक्यता आहे. हातरिक्षा मध्ये माणसांना बसवून त्या ओढण्याची अमानवी प्रथा बंद करावी आणि …

Read More »

वारदोली येथील मारहाण प्रकरणातील आरोपींना कानपूर येथून अटक

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील वारदोली येथे एका 54 वर्षीय व्यक्तीला दगडाने मारहाण करून त्याला लोखंडी पलंगाला बांधून ठेवल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

मुबलक पाण्यासाठी नियोजनाची गरज

रोहा तालुक्यात पाणी प्रश्न ऐरणीवर रोहे : प्रतिनिधी उन्हाळा आला की पाणीटंचाई या विषयावर चर्चा चालू होते, परंतु भविष्यातील पाणीटंचाई बाबत कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. मुबलक पाणीसाठा असताना तो जतन करणे, पाणी आडवणे व जिरवणे याबाबत खल होताना दिसत नाही. अशीच काहीशी परिस्थिती रोहा तालुक्यातील आहे. रोहा तालुक्यात उपलब्ध …

Read More »

पेणमध्ये रस्त्याच्या निधीसाठी ग्रामस्थांचे निवेदन

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ताडमाळ व तुरमाळ या आदिवासी वाड्यांना रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी 5 एप्रिलला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला असून याबाबत एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना निवेदन देण्यात आले. जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ताडमाळ, तुरमाळ, पहिरमाळ, गुतीचीवाडी, चाफेगणी या …

Read More »

विहिरींमध्ये जलपुनर्भरण करण्याची गरज

पोलादपूर तालुक्यात बोअरवेलचे प्रमाण गेल्या चार वर्षांमध्ये सातत्याने वाढत असताना जिल्ह्यातील सर्वाधिक भुजलाचे दूषित नमुनेही आढळून आले आहेत. सहा वर्षांपूर्वी पुण्यातील रासायनिक पृथ:करण प्रयोगशाळेने ग्रामीण रुग्णालयाबाहेर केलेल्या उत्खननादरम्यान तालुक्यातील भुजलाचा  गोपनीय अहवाल सादर केला होता. त्याकडे दुर्लक्ष करून पाणीटंचाई निवारणाच्या राजकीय प्रतिष्ठेपोटी बोअरवेलची संख्या वाढत गेली असल्याने ही दूषित पाणी …

Read More »

दिलदार, सर्वसमावेशक गिरीशभाऊ

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या गिरीशभाऊंच्या जाण्याचे पुणे पोरके झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आणि सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या निधनांनंतर सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त होत आहे. एका कंपनीतील कर्मचारी ते खासदार असा गिरीश …

Read More »