कायमस्वरूपी कारवाई करण्याबाबत नागरिकांची मागणी पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे मार्गावर कळंबोली मॅकडोनाल्ड जवळ सध्या बेकायदा टपर्या दिवसेंदिवस थाटल्या जात आहेत. या बेकायदा पद्धतीत सुरू असलेल्या धंद्याला कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने ते राजरोसपणे या मार्गावरील फुटपाथवर चायनीज, अंडापाव, वडापाव, भजी, समोसे, थंडपेय, सिगारेट, गुटखा आदी पदार्थांची विक्री करत आहेत. या टपर्यांमुळे …
Read More »व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून सेक्सरॅकेट चालवणार्या दोघांना खारघरमधून अटक
पनवेल : वार्ताहर वेश्यागमनासाठी व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून सेक्सरकेट चालवणार्या महिला दलालासह दोघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खारघरमधून सापळा लावून अटक केली आहे. तसेच त्यांच्या तावडीतून दोन मुलींची सुटका केली आहे. खारघर परिसरातील दलाल समीर (फिरोज खान) तसेच त्याच्या दोन महिला सहकारी हे तिघेही ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारे वेश्यागमनासाठी मुलींचे …
Read More »नेरळमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
कर्जत ः प्रतिनिधी नेरळ शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नेरळसाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्चाची नवी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबवली जात आहे. या योजनेचे भूमिपूजन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रविवारी (दि. 23) करण्यात आले. नेरळ मोहचीवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या या …
Read More »सांगलीत विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती
सांगली ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील विसापूर राजमित्र रामचंद्र शामराव माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषी) ज्युनिअर या ठिकाणी विद्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन व मुख्याध्यापक एस. एम. मुलाणी यांचा सेवानिवृत्ती सत्कार असा संयुक्त समारंभ शनिवारी (दि. 22) झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, तर प्रमुख …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गव्हाण येथे स्वच्छता अभियान
भाजप नेते अरुणशेठ भगत, परेश ठाकूर यांनी केली पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्त कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक दिवंगत जनार्दन आत्माराम भगत यांची 35वी पुण्यतिथी येत्या 7 मे रोजी आहे. यानिमित्ताने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 30 एप्रिल आणि 1 व 2 मे रोजी पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत …
Read More »भाजप उत्तर रायगड महिला मोर्चाची आढावा बैठक उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड महिला मोर्चाची आढावा बैठक रविवारी (दि. 23) सेल्फी विथ लाभार्थी अभियानाच्या प्रदेश संयोजिका वर्षा भोसले आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला महिला मोर्चा उत्तर रायगड …
Read More »डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने प्रसारित बनावट पत्राप्रकरणी गुन्हा दाखल
अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक बनावट पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागावर या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने व्हायरल झालेल्या या बनावट …
Read More »दहशतवादी घडविणारी शाळा
सूर्य जणू आग ओकत असल्याने राज्यातील सर्व शाळांना उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे. दुसरीकडे पुण्यातील एक शाळा मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. दहशतवादी कृत्यांमुळे ब्ल्यू बेल्स शाळेवर गंडांतर आले आहे. दहशतवाद हा आपल्या देशात जुनाच रोग …
Read More »मी उरणकर जबाबदार उरणकर लघुपटाचे प्रदर्शन
उरण : वार्ताहर उरण नगर परिषद वतीने उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांच्या संकल्पनेतून उरण शहरातील वाहतूक कोंडीवर जनजागृती करणे करिता उरण नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून अगदी कमी खर्चात अप्रतिम अशा सामाजिक संदेश देणार्या शॉर्ट फिल्म (लघु पट) मी उरणकर जबाबदार उरणकर या लघुपटाची …
Read More »पनवेलमध्ये पाणीटंचाईचे नियोजन तयार
तालुक्याचा संभाव्य कृती आराखडा सादर पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्याचा 2022 ते 2023 पर्यंतचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पनवेलमध्ये पाणीटंचाई झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचे नियोजन करण्यात आले आहे. यात 49 गावे टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित आहेत. तर 32 गावांमध्ये विंधन विहिरींसाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper