पनवेल : वार्ताहर जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा 2021मध्ये भारतासह महाराष्ट्र व नवी मुंबई पोलीस दलाचे नाव उंचावणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी उजबेकीस्तान येथील स्पर्धेत कांस्यपदक पटकाविल्याबद्दल त्यांचे पनवेलचे उपमहापौर व भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन विशेष सत्कार केला. या वेळी नगरसेवक विक्रांत …
Read More »कसळखंड येथे विविध विकासकामांचा शुभारंभ; नेत्रचिकित्सा, रक्तदान शिबिर; कोरोना लसीकरण
पनवेल : रामप्रहर वृत्त कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रप राबवत रविवारी (दि. 10) साजरा झाला. त्याअंतर्गत वाढदिवसानिमित्त आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीमधून करण्यात येणार्या विकासकामांचा शुभारंभ, तसेच रक्तदान व मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात होते. या विकासकामांचे भूमिपूजन उरणचे आमदार …
Read More »अर्चना ठाकूर यांना नवदुर्गा पुरस्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्तवीर वुमन फाऊंडेशनच्या अध्यक्ष अर्चना परेश ठाकूर यांना स्नेहकुंज आधारगृह, क्षितिज पर्व, संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था, जनाधर्मा आधारगृह आणि द्वारकादास शामकुमार यांच्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा पुरस्कार 2021ने सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अर्चना ठाकूर नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. …
Read More »उरण मतदारसंघात विकासाची गंगा आणणार; आमदार महेश बालदी यांचे चौकमध्ये आश्वासन
खालापूर, खोपोली ः प्रतिनिधीआज मी शिट्टी वाजवून आमदार झालो असलो, तरी पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाडून भारतीय जनता पक्षाचा आमदार असणार आहे. येत्या तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासाची गंगा आणणार आहे, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी रविवारी (दि. 10) चौक येथे दिले. उरण विधानसभा मतदारसंघातील …
Read More »टी-20 वर्ल्डकप विजेता संघ होणार मालामाल!; आयसीसीकडून बक्षिसाची रक्कम जाहीर
दुबई : वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकपला 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाली किती रुपयांचे बक्षीस मिळणार याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घोषणा केली आहे. विजेत्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स (12.2 कोटी), तर उपविजेत्या संघाला आठ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 6.1 कोटी रुपये मिळतील. याचबरोबर …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या दौर्यानंतर सिंधुदुर्गात शिवसेनेला झटका; कुडाळमधील तीन पं. स. सदस्य भाजपमध्ये
कुडाळ ः प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी चिपी विमानतळ उद्घाटन समारंभासाठी सिंधुदुर्गात आले. त्यानंतर रविवारी (दि. 10) भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला झटका दिला आहे. कुडाळ पंचायत समितीतील शिवसेनेच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती …
Read More »पंतप्रधान मोदी लोकशाही मानणारे नेते; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उलगडला जीवनप्रवास
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निरंकुश किंवा हुकूमशाही वृत्तीचे असल्याचे होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. पंतप्रधान मोदींशी आपला अनेक दशकांपासूनचा संपर्क आहे. तेे लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांच्यासारखा समजून आणि ऐकून घेणारा नेता आपण पाहिलेला नाही. पंतप्रधान मोदी छोट्यातील छोट्या व्यक्तीचेही धीराने ऐकतात, असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित …
Read More »टी-20 वर्ल्डमध्ये होणार डीआरएस वापर
दुबई ः वृत्तसंस्था 17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) डीआरएसचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. टी- 20 वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच डीआरएसचा उपयोग केला जाणार आहे. मागचा वर्ल्डकप 2016मध्ये झाला होता तेव्हा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डीआरएस प्रणाली उपलब्ध नव्हती, पण …
Read More »भारताच्या शिखा पांडेचा ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’
सिडनी ः वृत्तसंस्था महिला टी-20 मालिकेतील दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा चार गडी राखून पराभव झाला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0ने आघाडी घेतली आहे. असे असले तरी भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने टाकलेल्या चेंडूची जोरदार चर्चा आहे. शिखा पांडेने एलिसा हिली हिचा त्रिफळा उडवला. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार …
Read More »कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा; सर्वाधिक पदकांसह भारताचे वर्चस्व
लिमा ः वृत्तसंस्था कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताने सर्वाधिक 30 पदकांसह वर्चस्व प्राप्त केले. अनिश भानवाला, आदर्श सिंग आणि विजयवीर सिद्धू या त्रिकुटाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताने अव्वलस्थान पटकाविले. महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात भारतानेच तिन्ही पदकांवर नाव कोरले. मानवी सोनीने (105) सुवर्ण, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper