Breaking News

Ramprahar News Team

देशाला फसवणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे -मोदी

नवी दिल्ली ः देशाची फसवणूक करणार्‍यांसाठी जगात कुठलीही जागा सुरक्षित असता कामा नये. कोणी कितीही ताकदवान असो. जर ती व्यक्ती राष्ट्रहीत आणि जनहीत यांच्यामध्ये येत असेल तर त्यावर कारवाई करताना केंद्रीय यंत्रणांनी मागे रहाता कामा नये, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मुख्य दक्षता आयोग …

Read More »

उरणमध्ये मॅरेथॉन स्पर्धा : विजेत्यांचा गौरव

उरण : प्रतिनिधी योगा विथ पूनम ग्रुपतर्फे द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी डाऊरनगर येथे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस प्रतिसाद लाभला. स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात महेश मुंजे प्रथम, अरबाज खान द्वितीय, अभय वर्मा तृतीय मुलींमध्ये स्नेहा जाधव प्रथम, साक्षी जाधव द्वितीय, तनिष्का बोरसे तृतीय, 12 वर्षाखालील गटात सार्थक गिरी प्रथम, …

Read More »

राज्य कबड्डी संघटनेचे मंथन शिबिर अलिबागला

मुंबई ः प्रतिनिधी देशात व राज्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याची चिन्ह दिसत असल्याने क्रीडा संघटनाही जागृत होण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच राज्य शासनाची क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत नियमावली जाहीर होणार आहे. या अनुषंगाने सर्व संलग्न कबड्डी जिल्हा असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनमध्ये समन्वय साधण्याच्या व विचारविनिमय करण्याच्या दृष्टीने मंथन …

Read More »

बांगलादेशकडून ओमानचा पराभव

अल अमिरात ः वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत बांगलादेशने ओमानला 26 धावांनी पराभूत करीत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. बांगलादेशने 20 षटकांत सर्वबाद 153 धावा केल्या होत्या, मात्र ओमानचा संघ 20 षटकांत नऊ गडी गमवून 127 धावा करू शकला. गट ‘ब’मध्ये स्कॉटलँड, ओमान, बांगलादेश आणि पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघ …

Read More »

राजू शेट्टींचा मविआ सरकारवर हल्लाबोल

कोल्हापूर ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सातार्‍याच्या पावसातील सभेची आठवण करून देत दिलेल्या शब्दांवरून निशाणा साधला तसेच दसर्‍याला शेतकर्‍यांचा शिमगा करणार्‍या सरकारच्या मंत्र्यांचा दिवाळीला काळे झेंडे घेऊन स्वागत करा, असे आवाहन शेतकर्‍यांना केले. …

Read More »

सावरकरांचा शाश्वत विचार कुणीच संपवू शकत नाही -देवेंद्र फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधी जो शाश्वत विचार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडला आहे तो कुणीच समाप्त करू शकत नाही. या देशाला, संस्कृतीला, मराठीला जे सावरकरांनी दिले आहे त्यासाठी मी सावरकरांसमोर नतमस्तक होतो, असे विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपकडून मुंबईच्या गिरगावातील मराठी कट्टा या कार्यक्रमात फडणवीस यांनी सावरकरांविषयीची …

Read More »

सचिन सावंतांचा नाराजीनामा; मुख्य पक्षप्रवेक्तापदावर संधी न मिळाल्याने हायकमांडला पत्र

मुंबई ः प्रतिनिधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. सचिन सावंत यांनी तर पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून हायकमांडला थेट पत्र लिहून प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. मागील 10 वर्षे सचिन सावंत यांनी पक्षाचे मीडिया इन्चार्ज म्हणून काम केले आहे, मात्र …

Read More »

राज्यात उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढवल्या; नियमावली जारी

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने दिवाळीच्या तोंडावर दुकाने, उपाहारगृहे, मॉल सुरू ठेवण्याची वेळ वाढविण्यात आली आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना मंगळवारी (दि. 19) जारी करण्यात आल्या. त्यानुसार राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत, तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. …

Read More »

भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर; ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर ः वृत्तसंस्था भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली. याच ठिकाणी मागील काही आठवड्यांपासून सुरू असणार्‍या चकमकींमध्ये नऊ भारतीय जवान शहीद झाले असल्याने ही कारवाई भारतासाठी मोठे यश मानले जात आहे. राजौरी सेक्टरमधील चकमकीत भारतीय …

Read More »

आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत डॉ. कौस्तुभ राडकरांंचा पराक्रम

पुणे ः प्रतिनिधी पुण्याचे डॉ. कौस्तुभ राडकर यांनी आपली 29वी आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. ही स्पर्धा 17 तासांत पूर्ण करायची असते. हे आव्हान डॉ. कौस्तुभ राडकर यांनी 13 तास 14 मिनिटे आणि 16 सेकंदांत पूर्ण केले. त्यामुळे त्यांना आयर्न मॅन किताब मिळाला आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले …

Read More »