Breaking News

Ramadmin

घराघरावर भाजपचा झेंडा फडकवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

म्हसळा : प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी योजना, निर्णय, उपक्रम राबवून देशवासीयांचे जीवनमान सुकर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे जनता पुन्हा भाजपला निवडून देईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर भाजपचा झेंड फडकवावा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे गुरुवारी (दि. 14) पत्रकार परिषदेत …

Read More »

आदरांजली…! खारघर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना गुरुवारी भाजपतर्फे सिडको अध्यक्ष तथा पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Read More »

हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल -मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा येथे हल्ला करून दहशतवाद्यांनी मोठी चूक केली असून, त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल. या हल्ल्यामागच्या शक्ती आणि गुन्हेगारांना निश्चितच शिक्षा मिळेल. एकाही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही. त्यासाठी सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दिला आहे. …

Read More »

शिव-समर्थ स्मारक लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी

उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीटीच्या वतीने साकारल्या जात असलेल्या शिव-समर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी या तयारीची शुक्रवारी (दि. 16) पाहणी केली. पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत होते. जेएनपीटीने उरण तालुक्यातील …

Read More »

बेलपाड्यात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बेलपाडा येथे गव्हाण ग्रामपंचायत फंडाच्या माध्यमातून पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. बेलपाडा येथील हनुमान मंदिराच्या परिसरात होत असलेल्या या विकासकामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि पंचायत समिती सदस्य व भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 15) …

Read More »

महापुरुषांकडून लढण्याचे बळ मिळते

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उद्गार, वीर वाजेकर यांना विनम्र अभिवादन उरण : वार्ताहर उरणच्या आणि रायगडच्या विकासात वीर वाजेकरांनी दिलेले योगदान मोठे आहे. ते पाहता  त्यांना आपण विसरू शकत नाही. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून लढण्याचे बळ मिळते, असे उद्गार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी फुंडे …

Read More »

रायगडातही निषेध आणि श्रद्धांजली

दहशतवादी हल्ल्याचा भाजपने केला निषेध अलिबाग : प्रतिनिधी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा शुक्रवारी (दि. 15)  भाजपतर्फे निषेध करण्यात आला. या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहून पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. या वेळी भाजप नेते महेश मोहिते, …

Read More »

रस्ता सुरक्षा सप्ताहाची सांगता

पनवेल : बातमीदार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची सांगता नुकतीच कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात झाली. सप्ताहात सहभाग घेणार्‍या अनेक संस्था आणि व्यक्तींचा या वेळी सन्मान करण्यात आला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक पोलिसांच्या वतीने हेल्मेट रॅली, नेत्रचिकित्सा शिबिर, चित्रकला स्पर्धा, जनजागृती करण्यात आली. …

Read More »

चाकूचे वार करून मोबाईलची चोरी

पनवेल : बातमीदार ट्रेलरचालकावर चाकूचे वार करून अज्ञात इसमाने त्याचा मोबाईल लंपास केल्याची घटना पनवेल हायवेलगत असलेल्या जेडब्ल्यूआर या कंपनीच्या बाहेर घडली. शहर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्रिजेश सत्यनारायण यादव (वय 29) हे ओवळे येथे राहत असून, एमएच 46-एआर 9072 या ट्रेलरवर चालकाचे काम करतात. त्यांनी पनवेल हायवेलगत …

Read More »

मिलिंद खाडेला न्यायालयीन कोठडी

पनवेल : बातमीदार दोन लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडला गेलेला मनसेचा कामोठे उपशहराध्यक्ष मिलिंद खाडे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. खाडे याने जुई-कामोठे येथील जमीनमालक धर्मा जोशी यांनी विनापरवानगी वृक्ष छाटल्याचे निमित्त करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे धमकावून त्यांच्याकडे सहा लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर खंडणीविरोधी …

Read More »