Breaking News

Ramadmin

शिव-समर्थ स्मारकाचा आज भव्यदिव्य उद्घाटन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त जेएनपीटीच्या वतीने दास्तान फाटा येथे साकारल्या जात असलेल्या शिव-समर्थ स्मारकाचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 17) सायंकाळी 5 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, राज्याचे अर्थमंत्री सुधीर …

Read More »

भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील यांची नियुक्ती

पनवेल : भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते

Read More »

जवानच शिक्षा ठरवतील पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

यवतमाळ : प्रतिनिधी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना कोणती शिक्षा दिली जाईल आणि शिक्षा कशी, कुठे, केव्हा दिली जाईल, हे आमचे जवानच ठरवतील, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना धैर्य तसेच आपल्या जवानांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे बोलत होते. महाराष्ट्र दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान …

Read More »

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन अलिबाग : जिमाका महाराष्ट्राला 720 किमीचा सागरी किनारा लाभला असतानाही आपण अन्य राज्यांच्या तुलनेत मत्स्य उत्पादनात मागे आहोत. मत्स्य उत्पादनातून मच्छीमार बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. रोजगारनिर्मितीला चालना देणारे क्षेत्र म्हणून शासन मासेमारी क्षेत्राकडे पाहते. त्यादृष्टीने अलिबाग येथील प्रशिक्षण केंद्र हे अधिकाधिक आदर्शवत ठरावे, …

Read More »

पुलवामा हल्ल्याप्रकरणी सात जण ताब्यात

श्रीनगर : पुलवामातील अनंतपुरा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी (दि. 16) सात जणांना ताब्यात घेतले. पुलवामा आणि अवंतीपुरा भागात ही कारवाई करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे 80 किलोग्रॅम आरडीएक्सचा वापर करण्यात आला आहे. आरडीएक्सचा साठा कारमध्ये भरून ही कार सीआरपीएफच्या बसवर (एचआर …

Read More »

पनवेलचे सुपुत्र सत्यवान पाटील सुखरूप

पनवेल : बातमीदार जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. या वेळी सोशल मीडियावर पनवेल तालुक्यातील केळवणे येथील एका जवानाला वीरमरण आले असल्याचे वृत्त व्हायरल झाले होते, मात्र सत्यवान पाटील हे सुखरूप असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी …

Read More »

विद्यार्थिनीवर अत्याचार; शिक्षकावर गुन्हा दाखल

उरण : रामप्रहर वृत्त न्हावे येथील टीएस रेहमान शाळेत आईशी असलेल्या मैत्रीच्या निमित्ताने पालकत्व स्वीकारलेल्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षक सतीशकुमार शर्मा यास अटक करून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्यातून दिली. टीएस रेहमान शाळेत हॉस्टेलही …

Read More »

‘पिल्लई’च्या विद्यार्थ्यांकडून गो-कार्ट कारची निर्मिती

रसायनी : प्रतिनिधी महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित येथील पिल्लई एचओसीमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मॅकॅनिकल आणि ऑटोमोबाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी गो-कार्ट या कमीत कमी वजनाच्या कारची निर्मिती केली आहे. ही कार बनविण्यासाठी दुचाकीचे इंजीन वापरण्यात आले आहे. पिल्लई महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांनी आर वन फाय या दुचाकीचे इंजीन वापरून वेगाने धावू शकणारी कार तयार …

Read More »

गव्हाण, फुंडे विद्यालयात शुभचिंतन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण-कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीचा शुभचिंतन व निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य व स्कूल कमिटी चेअरमन अरुणशेठ भगत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सर्व मुलांनी पास व्हावे, तसेच …

Read More »

पुलवामा हल्ल्याचा पनवेल परिसरात निषेध

पनवेल : वार्ताहर पुलवामा येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात जवानांना नाहक जीव गमवावा लागला. याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 16) पनवेल परिसरातील व्यापारी बंधूंनी निषेधात्मक फेरी काढून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत या घटनेचा निषेध केला व जवानांना श्रद्धांजली वाहिली. काही ठिकाणी सकाळच्या वेळी बंदसुद्धा पाळण्यात आला. पनवेल शहरात ज्वेलर्स असोसिएशनसह अनेक व्यापार्‍यांनी सकाळी …

Read More »