Breaking News

Ramadmin

उड्डाण महोत्सवात उरण महाविद्यालय प्रथम

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे घेण्यात आलेल्या उड्डाण महोत्सवात बाजी मारली आहे. या महाविद्यालयाने पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. मुंबईच्या सायन येथील गुरुनानक महाविद्यालयात झालेल्या पथनाट्य स्पर्धेत एकूण 22 महाविद्यालयांतील 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता, तसेच 35 …

Read More »

संतोष आंबवणे यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार

पनवेल : बातमीदार पनवेल महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने लोकशाही पंधरवडा 2019 राबविण्यात आला. यानिमित्त व्यापारी आणि उद्योगपती यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रांत नाव कमवत असलेल्या यशस्वी उद्योजकांचा या वेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात संतोष आंबवणे यांना यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार डॉ. कविता चौतमोल यांच्या …

Read More »

चिरनेर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

चिरनेर : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथील 1884मध्ये स्थापन झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा नववा स्नेहमेळावा रविवारी (दि. 17) रा.जि.प. केंद्रीय शाळेत होणार आहे. उरण पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या मेळाव्याचे उद्घाटक सरपंच चिर्लेकर यांच्या हस्ते संस्थापक वसंत भाऊ पाटील, अध्यक्ष दामोदर केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

संघर्ष प्रतिष्ठानकडून शिवजयंती सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असणार्‍या संघर्ष प्रतिष्ठानकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी (दि. 19) खांदा कॉलनी सेक्टर 13 येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या वेळी प्रतिष्ठानकडून लोकोपयोगी कार्यक्रम, तसेच लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धा होणार असल्याची माहिती निमंत्रक आणि प्रमुख सल्लागार डॉ. …

Read More »

बांगलादेशी नागरिक अटकेत

पनवेल : वार्ताहर मोठा खांदा परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या आणखी 11 घुसखोर बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेने अटक केली. यात चार महिला, सहा पुरुष, तसेच एका लहान मुलीचा समावेश आहे. हे सगळे बांगलादेशी नागरिक गेल्या वर्षभरापासून या भागात मोलमजुरी, घरकाम करून राहत असल्याचे तपासात आढळून आले …

Read More »

पेणच्या बालवीरांची सागरी चढाई

पेण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना व पेण तालुका हौशी जलतरण संघटनेच्या जलतरणपटूंनी मोरा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे 16 किलोमीटरचे सागरी अंतर वैयक्तिकरित्या यशस्वीपणे पूर्ण करून पेणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या जलतरण मोहिमेत पेण येथील तीन जलतरणपटू सहभागी झाले होते. सकाळी 6.15 वाजता …

Read More »

माथेरानमध्ये प्रत्येक बुधवारी पाणीकपात

कर्जत : बातमीदार पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये ऐन पर्यटन हंगामात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ठोस पाऊल उचलले आहे. आता प्रत्येक बुधवारी माथेरानकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. माथेरानची लोकसंख्या 4288 इतकी असून, वर्षागणिक येथे 10 ते 12 लाख पर्यटक येतात. त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकारणामार्फत पाणीपुरवठा केला …

Read More »

खोट्या कुलअखत्यारपत्राद्वारे जमीन हडप

कर्जत : बातमीदार हरवलेल्या व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्तीचे कुलअखत्यार पत्र तयार करून नेरळ नजीकच्या धामोते येथील जमीन हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी हरवलेल्या व्यक्तीच्या भावाने केलेल्या तक्रारीवरुन जमीन हडप केलेल्या पाच जणांच्या विरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू, मुंबई येथे राहणारे विल्यम बल्ताजार लोबो …

Read More »

गावांतच रहा! गावाकडे चला!!

पालकमंत्री रवींद्र रव्हाण यांची युवकांना साद; विकासकामांची आढावा बैठक श्रीवर्धन : प्रतिनिधी भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य माणसाच्या हिताचे असून, जनहिताची कामे गतीमान आणि प्रामाणिकपणे  करीत आहे. शासकिय योजनांचा लाभ  तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. जिल्ह्यातील युवकांनीही गावांतच रहा! गावाकडे चला!! या संकल्पनेला अनुसरून स्थलांतरित न होता आपल्याइथेच …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून वर्ल्ड कपसाठी संघनिवडीची चाचपणी

मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेकडे पाहत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जवळपास निश्चित असला तरी दोन जागांसाठी चुरशीची चढाओढ आहे. त्यादृष्टीनेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचे महत्त्व वाढले आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेन्टी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार …

Read More »