Breaking News

Ramadmin

रांचीतील क्रिकेट स्टेडियमवर झळकले महेंद्रसिंह धोनीचे नाव

रांचीतील क्रिकेट स्टेडियमवर झळकले महेंद्रसिंह धोनीचे नाव रांची : वृत्तसंस्था मागील अनेक वर्षे भारतीय क्रिकेटचा आयकॉन म्हणून ओळखल्या जाणार्‍या महेंद्रसिंह धोनीने भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांत मानाचे स्थान पटकाविले आहे. त्याने अविश्वसनीय कामगिरी करून झारखंड राज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर वेगळी ओळख दिली. त्याच्या या कीर्तीचा गौरव म्हणून झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने …

Read More »

धोतर नेसून फलंदाजी, संस्कृतमध्ये समालोचन; वाराणसीत क्रिकेट स्पर्धा

वाराणसी : वृत्तसंस्था आतापर्यंत आपण क्रिकेटचे सामने हे शर्ट-पँट अशा गणवेशात पाहिलेले आहेत, मात्र वाराणसीमध्ये वैदिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी चक्क धोतर आणि कुर्त्यात क्रिकेटचा सामना खेळला. संपुर्णानंद संस्कृत विद्यालयाने आपल्या 75व्या वर्धापन दिनानिमित्ताने या सामन्याचे आयोजन केले होते. या वेळी अनोखी वेशभूषा परिधान करून खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून दिले. इतकेच नव्हे; …

Read More »

विराट कोहली सर्वोत्तम क्रिकेटपटू -वासिम जाफर

मुंबई : प्रतिनिधी विदर्भाच्या संघाला सलग दुसर्‍यांदा रणजी करंडक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या वासिम जाफरने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हा सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचे जाफरने म्हटलेय. शेष भारताविरुद्ध सुरू असलेल्या इराणी करंडकाच्या सामन्यादरम्यान जाफर एका खाजगी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत …

Read More »

…तर विराट कोहलीने माझीही धुलाई केली असती! वॉर्नकडून ‘अनोखे’ कौतुक

सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. जर विराट कोहली आपल्या काळात फलंदाजीसाठी मैदानात उतरला असता; तर त्याने माझी सहज धुलाई केली असती, असे वॉर्नने म्हटले आहे. तो इंडिया टुडे वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. मी आतापर्यंत अनेकदा विराट कोहलीविरुद्ध गोलंदाजी …

Read More »

मणिपूरचा खेळाडू भारतीय संघात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मणिपूरमधील 18 वर्षीय खेळाडू रेक्स राजकुमार सिंह भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली आहे. भारतीय संघात स्थान मिळवणारा रेक्स हा मणिपूरचा पहिला खेळाडू आहे. तो जलदगती गोलंदाजी करतो. रेक्स सिंहने डिसेंबर 2018मध्ये 11 धावांच्या मोबदल्यात 10 बळी घेत भारतीय क्रीडा विश्वाचे लक्ष वेधले होते. रेक्सने कामगिरीच्या बळावर …

Read More »

भारतीय क्रिकेटपटूंकडूनही दहशतवादी हल्ल्याचा निषेध

मुंबई : प्रतिनिधी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर द्या, अशी मागणीही होते आहे. या हल्ल्याची फक्त राजकीय नेत्यांनीच नाही; तर खेळाडूंनीही कठोर शब्दांत निर्भत्सना केली आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही या भ्याड हल्ल्याचा ट्विटरच्या माध्मातून तीव्र निषेध केला आहे. जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी …

Read More »

शिक्षिका कविता मुंबईकर मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथील अनंत पांडुरंग भोईर विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या कविता विनायक मुंबईकर यांनी इतिहास एमए पार्ट टूच्या विभागामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. त्यांचा सत्कार व पदवी वितरण संचालक शेफाली पांडा यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी मुंबई विद्यापीठाचे अनेक …

Read More »

कला, संस्कृती महोत्सव रंगला

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष आणि रिद्धी रिंकल सामाजिक विकास मंडळ सुकापूर यांच्या वतीने कला, संस्कृती महोत्सव 2019चे आयोजन बुधवारी (दि. 13) करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या महोत्सवात हळदीकुंकू, खेळ रंगला …

Read More »

धार्मिक सभा उत्साहात

नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ येथील श्री शनिश्वर सेवा समितीच्या वतीने शनिमंदिरात महापूजा, भव्य रथोत्सव आणि धार्मिक सभेचे आयोजन मंदिराचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या सभेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. सर्व धार्मिक श्रद्धाळू शनिमंदिरात …

Read More »

सिडको गृहनिर्माण योजनेंतर्गत सोडत उत्साहात

नवी मुंबई : सिडको गृहनिर्माण योजना 2019मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या 1,100 सदनिकांसाठीची संगणकीय सोडत गुरुवारी सीबीडी-बेलापूर येथील सिडको भवनातील सभागृहात काढण्यात आली.

Read More »