Breaking News

Monthly Archives: February 2019

पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांची बदली

पनवेल ः वार्ताहर येथील तहसीलदार दीपक आकडे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली कल्याण येथे झाली आहे. जवळपास चार वर्षांपासून ते पनवेल येथे कार्यरत होते. आकडे यांनी अनेक नागरी प्रश्नांवर सन्मानजनक मार्ग काढल्याने त्यांची जनसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा आहे. त्यांची बदली कल्याण येथे झाली असून, त्यांच्या जागी अमित सानप हे तहसीलदार म्हणून …

Read More »

धुक्याची दाट चादर

पनवेल : निसर्गरम्य आपटा फाटा परिसरावर गुरुवारी पहाटे धुक्याची दाट चादर पसरली होती. यामुळे 50 ते 60 फुटांच्या अंतरावरचे दिसणेदेखील कठीण झाले. परिणामी वाहनांच्या लाईटनुसार अंदाज घेत चालक मार्गक्रमण करीत होते. त्याची लक्ष्मण ठाकूर यांनी टिपलेली सुंदर छबी.

Read More »

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक उद्घाटन

पनवेल : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेची शाखा आता मिडलक्लास सोसायटीजवळ सुरू झाली आहे. त्याचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, उद्योगपती राजू गुप्ते, कृष्णकांत गुप्ते, जयेश सोनाटा, संस्थापक नीलकांत ग्रुप, …

Read More »

ज्येष्ठांच्या समस्या सोडवू

नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची ग्वाही पनवेल : प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मी, नगरसेवक तेजस कांडपिळे आणि चारुशीला घरत सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून निश्चित सोडवू, अशी ग्वाही नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी दिली. ते नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिन आणि शिवजयंती …

Read More »

शिरवलीत ‘कमळ’ फुलणार

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा विश्वास पनवेल : रामप्रहर वृत्त विकासकामांच्या जोरावर शिरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे कमळ फुलणार, असा विश्वास पक्षाचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी गुरुवारी (दि. 20) व्यक्त केला. ते जाहीर सभेत बोलत होते. शिरवली ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत भाजपची सभा गुरुवारी झाली. या सभेस भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, …

Read More »

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी डॉ. शिरोडकर, अनिकेत, महात्मा गांधी यांनी महिलांमध्ये; तर देना बँक, महिंद्रा यांनी पुरुषांमध्ये शिवनेरी मंडळ आयोजित स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. दादर शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर बुधवारी (दि. 20) झालेल्या महिलांच्या उद्घाटनीय सामन्यात डॉ. शिरोडकरने चुरशीच्या लढतीत 41-33 अशी मात करीत ‘क’ …

Read More »

बीसीसीआय करणार पाक क्रिकेट संघावर बहिष्काराची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानावरही घेरण्याची तयारी सुरू केली आहे. पाक क्रिकेट संघाला वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यास बंदी घालावी किंवा भारताने तरी या स्पर्धेतून माघार घ्यावी, अशी मागणी करणारे पत्रच सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासक समितीने (सीओए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नावे …

Read More »

विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावर धोनी योग्य पर्याय : सुरेश रैना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरू होणारा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मध्यंतरीच्या काळात कर्णधार विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याबद्दल चर्चा सुरू होती, मात्र भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाच्या मते महेंद्रसिंह धोनी हा विश्वचषकासाठी …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी जडेजा संघात

मुंबई : प्रतिनिधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणार्‍या ट्वेन्टी-20 आणि वन डे मालिकेतून भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी मिळाली आहे. दोन ट्वेन्टी-20 आणि पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात हार्दिक पांड्याला स्थान देण्यात आले होते, मात्र पाठीच्या दुखण्याने …

Read More »

घणसोलीत रंगली कुस्तीची दंगल

नवी मुंबई : प्रतिनिधी घणसोलीत पहिल्यांदाच शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने सिम्प्लेक्स येथील मैदानावर कुस्त्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून 120 पुरुष व 10 महिलांनी सहभाग घेतला. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष गजानन काळे, पैलवान तेजस पाटील व अशोक पाटील यांच्या हस्ते झाले. तुडूंब भरलेल्या …

Read More »