पुलवामा हत्याकांड आणि त्यानंतर भारताने घेतलेला बदला यामुळे पाकिस्तानबरोबरचे संबंध चिघळले आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून काम करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापरही काळजीपूर्वक करा. शत्रूराष्ट्राला कोणत्याही प्रकारची माहिती पुरवू नका अन्यथा त्याचे विपरित परिणाम भोगावे लागतील. पुलवामा हत्याकांडाचा बदला घेतल्यानंतर भारताची विश्वातील प्रतिमा आणखी उजळली …
Read More »Monthly Archives: March 2019
अभिनंदन यांच्या आई-वडिलांचा अनोखा सन्मान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्यरात्रीनंतर जेव्हा चेन्नई-दिल्ली विमान दिल्लीतील धावपट्टीवर थांबले, तेव्हा सामान काढण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झालेली पाहायला मिळाली नाही. त्या वेळी सर्वांच्या नजरा एका जोडप्याकडे वळल्या होत्या. ते होते भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे आई-बाबा. या वेळी प्रवाशांनी उभे राहत टाळ्यांच्या कडडाटात निवृत्त …
Read More »मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम वंचित नागरिकांना विशेष संधी
मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी 2 व 3 मार्च रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध …
Read More »विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गासाठी 2,250 कोटींची तरतूद
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडी)च्या 147व्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रुपये 16 हजार 909.10 कोटींचा अर्थसंकल्प 2019-20 साठी मंजूर केला. या अर्थसंकल्पामध्ये विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गासाठी दोन हजार 250 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण अशी तरतूद …
Read More »पनवेलमध्ये दहावी परीक्षेला शांततेत प्रारंभ,12 हजार परीक्षार्थी
पनवेल : बातमीदार दहावीच्या परीक्षेला शुक्रवार (ता. 1) पासून पनवेलमध्ये प्रारंभ झाला पनवेल तालुक्यात दहावीची 17 परीक्षा केंद्र असून, एकूण 12 हजार 344 परीक्षार्थी आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने या परीक्षेसाठी पनवेल तालुक्याचे दोन विभाग करण्यात आले आहेत. पहिल्या विभागाचे मुख्यालय पनवेल असून दुसर्या विभागाचे मुख्यालय कळंबोली आहे. पनवेल विभागात …
Read More »सीकेटीत तीन दिन उत्साहात साजरे
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 26 फेब्रुवारी रोजी असलेली पुण्यतिथी, 27 फेबु्रवारी हा जागतिक मराठी गौरव दिन आणि 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन हे तीनही दिवस सीकेटी इंग्रजी माध्यमात एकत्रितपणे साजरे करण्यात आले. या प्रसंगी पनवेल कल्परल असोसिएशनच्या अध्यक्षा ज्योत्स्ना देऊस्कर यांना प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. …
Read More »मराठी भाषेत संवाद साधताना इंग्रजीचा वापर -भुंजे
पनवेल : प्रतिनिधी मराठी भाषेत संवाद साधताना आजकाल सर्रासपणे इंग्रजीचा वापर होत असल्याची खंत दिलीप भुंजे यांनी पनवेल येथील के.गो. लिमये सार्वजनिक वाचनालयात गुरुवारी मराठी भाषा गौरव दिनी व्यक्त केली. पनवेल येथील के.गो. लिमये सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे दिलीप भुंजे यांचे हस्ते …
Read More »उरण महाविद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रम
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयामध्ये कवी कुसूमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुप्रसिध्द कवी जितेंद्र लाड व लक्ष्मण माने उपस्थित होते. प्रथम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी “बहु असोत सुंदर” हे गीत सादर केले. मराठी भाषेचा इतिहास व कवितेचे वाचन संजय पन्ना, …
Read More »नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या पुढाकाराने कुष्ठरोग्यांसाठी शौचालय
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या प्रयत्नांमुळे प्रभाग 17 मधील मालधक्का झोपडपट्टीतील कुष्ठरोग्यांसाठी शौचालयाची उभारणी मनपाच्या वततीने करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष या झोपडपट्टीत अनेक कुष्ठरोग्यांची कुटुंबे वास्तव्य करून आहेत. त्यांना शौचालयासाठी गटारातून उघड्यावर जावे लागत होते. अॅड. वाघमारे यांनी त्याची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »बँकेच्या नावाने फसवणूक दीड लाखांची रोकड लंपास
पनवेल : बातमीदार एस.बी.आय.बँकेतून बोलत असल्याचे सांगून डेबीट कार्डची माहिती घेवून त्याद्वारे नवीन पनवेल येथील एका 80 वर्षीय इसमाच्या माझे बँक खात्यातील दीड लाख रुपये अज्ञात इसमाने काढून घेतले आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबाबमी सिथारामय्या व्यंकटरामय्या परूचुरी (वय-80वर्षे, सेवानिवृत्त) यांच्या एस.बी.आय बँक शाखा पनवेल …
Read More »