Breaking News

Monthly Archives: May 2019

रायगड जिल्ह्यात जय जय महाराष्ट्र माझा ; विविध जाती धर्माच्या लोकांनी सांस्कृतिक परंपरा जोपासली -पालकमंत्री चव्हाण अलिबागच्या पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण

अलिबाग :  जिमाका महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी (दि.1) सकाळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अलिबागमधील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण करण्यात आले.  या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी …

Read More »

लाच घेताना हवालदार जाळ्यात

पुणे ः प्रतिनिधी मोबाइल चोरी प्रकरणात कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून येरवडा पोलीस ठाण्यातील हवालदाराला रंगेहाथ पकडले. करीम मोहम्मद शरीफ शेख (47) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गेल्या आठवड्याभरात शहर पोलीस दलात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वेळा सापळा रचून कारवाई करीत …

Read More »

अकोल्याला मागे टाकत नागपूरचा पारा 46.3 वर

नागपूर ः प्रतिनिधी उपराजधानीने आतापर्यंत तापमानात आघाडीवर असलेल्या अकोला शहराला मागे टाकले असून पारा 1.5 अंश सेल्सिअसने वाढून 46.3 वर पोहोचला आहे. या मोसमातील ही उच्चांकी तापमानाची नोंद आहे. दरम्यान, हवामान खात्याने आणखी चार दिवस उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा दिल्याने नागपूरकरांना सूर्यनारायणाचा कोप झेलावाच लागणार आहे. उपराजधानीत विकासकामे …

Read More »

राष्ट्रपती पदकविजेत्या अग्निशमन अधिकार्याचा अपघातात मृत्यू

नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रपती पदकविजेते नाशिक महापालिका अग्निशमन दलाचे उपकेंद्रीय अधिकारी दीपक भटू गायकवाड (48) यांचा अमरावती येथे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते सुटी संपवून नागपूर येथे अग्निशमन विभागीय प्रशिक्षणाकरिता शिवशाही बसने हजर होत होते. बसला अमरावती येथे अपघात झाल्याने त्यात गायकवाड …

Read More »

महाराष्ट्र थोर राष्ट्रनेत्यांच्या विचारांचे राज्य; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; राज्य स्थापनेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न

जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक थोर राष्ट्रनेत्यांचा वारसा असून आपले राज्य हे या विचारांचा वारसा जपणारे राज्य आहे. त्यामुळेच राज्याने विविध क्षेत्रांत प्रगती करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री …

Read More »

जनहितालाच प्राधान्य हवे

देशात अद्याप मतदानाचे तीन टप्पे बाकी असल्याने यासंदर्भात आयोगाने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. खरे तर राज्यात काही भागांत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यानंतरच्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढतच गेले असून एव्हाना राज्याचा जवळपास एकतृतीयांश भाग दुष्काळग्रस्त जाहीर करावा लागेल की काय, अशी चिन्हे दिसू लागली …

Read More »

‘…म्हणूनच स्वातंत्र्यसैनिक मान्यतेला मुकलो’

क्रांतीवीर नानासाहेब पुरोहित यांच्यासोबत अनेक वर्षे समाजवादी पार्टीमध्ये सक्रीय कार्यकर्ता राहिलो.स्वातंत्र्यप्राप्तीसह मुरूड-जंजिरा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचा तालुका अध्यक्ष म्हणून देशाची आणि महाराष्ट्राची सेवा केली. मात्र, उमरठ येथील कार्यक्रमप्रसंगी तत्कालीन मंत्री वसंतराव नाईक यांच्या आग्रहाखातर समाजवादी पक्षातून काँग्रेस पक्षामध्ये गेलो आणि दादासाहेब तथा शं. बा. सावंत यांना आमदारपदी निवडून …

Read More »

नेरळजवळ तरुणाची आत्महत्या

कर्जत : बातमीदार मुंबईतील फिल्मसिटीमध्ये इव्हेंट मॅनेजर असलेल्या शोमित संतबहादूर सिंग या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नेरळ पोलिसांना सापडला असून, या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोमित संतबहादूर सिंग (वय 28, रा. जोगेश्वरी, मुळ  उत्तरप्रदेश) हा 13 एप्रिल रोजी घराबाहेर पडला होता, तो रात्री घरी परत …

Read More »

माथेरानमध्ये मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर

कर्जत : बातमीदार स्वर्गीय दयानंद डोईफोडे ऋणानुबंध मित्र परिवारा तर्फे मंगळवारी (दि. 30) माथेरानमधील अ‍ॅसेंम्बली हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नेत्र, दंत, रक्त आणि विविध आजारांची तपासणी करण्यात आली. या वेळी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी रक्तदान केले. मुंबईतील सर्वोदय हॉस्पिटलच्या रक्तपेढीने रक्तसंकलनाचे काम …

Read More »

रोह्यात मत्स्य संवर्धन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम

रोहे ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी शेती बरोबर शेतीपुरक व्यवसाय आत्मसात करावेत, असे आवाहन किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. मनोज तलाठी यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्रांच्या वतीने पुई कॉलनी येथे नाविन्यपुर्ण मत्ससंवर्धन तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »