Breaking News

Monthly Archives: May 2019

बांगरवाडीतील विहिरीत अज्ञात व्यक्तीने टाकले विषारी औषध

कर्जत : प्रतिनिधी खांडस ग्रामपंचायत हद्दीतील बांगरवाडीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असताना येथील विहिरीत शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ऐन पाणीटंचाईच्या काळात बांगरवाडी येथील विहिरीत विषारी औषध टाकल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहेत, तसेच औषध टाकणार्‍याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली …

Read More »

यंदा आंबा शौकिनांची निराशा

मुंबई ः प्रतिनिधी यंदा लहरी हवामानामुळे आणि आंब्यावर आलेल्या रोगामुळे सर्वच ठिकाणांच्या आंब्याचे पीक 50 टक्के घटले आहे. त्यामुळे यंदा बाजारात आंबा कमी आला. त्यात यावर्षीचा हंगामही लवकरच संपणार असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आंबा खवय्यांनी आताच आंब्याचा आस्वाद घ्यावा, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. हापूस आंब्याचा हंगाम हा व्यापार्‍यांसाठी मोठा आणि …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल ः प्रतिनिधी कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. 7) उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सकाळी 9.30 वाजता पुण्यतिथी कार्यक्रम व त्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने होणार्‍या या कार्यक्रमास समारंभ अध्यक्ष …

Read More »

दुष्काळग्रस्तांसाठी सरकार तिजोरी रिकामी करणार : महादेव जानकर

पंढरपूर ः प्रतिनिधी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत पैसा कमी पडू देणार नाही. प्रसंगी शेतकर्‍यांसाठी तिजोरी रिकामी करण्याचीही सरकारची तयारी आहे, असा दावा पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. दुष्काळी पाहणी दौर्‍याच्या निमित्ताने काल जानकर यांनी सांगोला तालुक्यातील विविध छावण्यांमध्ये जाऊन शेतकर्‍यांशी चर्चा केली. जनावरांना देण्यात येणार्‍या चार्‍यात …

Read More »

माझी 50 वर्षांची तपस्या सहज संपवणे अशक्य : मोदी

प्रतापगड ः वृत्तसंस्था मला पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्यासाठी माझ्या विरोधात काँग्रेस खोटा प्रचार करीत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रतापगडमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. समाजवादी पक्षाने युतीच्या नावाखाली मायावती यांच्या बसपाचा फायदा घेतल्याची गुगली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

ख्रिस्ती बांधवाचा ‘माय दे देऊस‘ उत्सव

रेवदंडा : प्रतिनिधी येथील आगरकोट किल्ला, कोर्लई किल्ला व कोर्लई गावातील अनेक वास्तू, चर्च आजही पोर्तुगीज काळाची साक्ष देत आहेत. रेवदंड्यातील ‘माय दे देऊस‘ हा चर्चसुध्दा त्या काळाचा साक्षीदार असून, या प्रार्थना स्थळात ख्रिस्ती बांधव श्रध्दा व भक्तीने विविध उत्सव साजरे करतात. प्रतिवर्षी 5 मे रोजी ‘माय दे देऊस‘ उत्सव …

Read More »

बोडणी येथील खुन्याला जन्मठेप

अलिबाग : प्रतिनिधी पैशाच्या वादावरून लोखंडी हातोड्याने सहकार्‍याला ठार मारणार्‍या आरोपीला अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेप तसेच पैसे चोरल्याप्रकरणी सात वर्षे सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. संजयकुमार भारतीप्रसाद मेस्त्री (वय 19) असे मृत इसमाचे नाव होते. तो मूळचा उत्तरप्रदेश येथील रविासी होता. सध्या बोडणी येथे कामानिमित्त …

Read More »

माणगांवात विदेशी दारुसाठा जप्त

माणगांव : प्रतिनिधी ड्रममध्ये विदेशी दारुचे बॉक्स लपवून ते अवैधरित्या विक्री करीता घेवून जात असलेल्या टेम्पोचा पाठलाग करुन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने विदेशी दारुसह सुमारे 7 लाख 12हजार 712 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघाजणांवर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटना शनिवारी …

Read More »

नागोठणेत पाच दिवसीय वर्षीतप पारणोत्सवास प्रारंभ

नागोठणे : प्रतिनिधी येथील जैन बंधुभगिनींनी केलेल्या साडेचौदा महिन्यांच्या उपवासाची सांगता मंगळवारी (दि. 7) अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होत आहे. या धार्मिक सोहळ्याचा प्रारंभ शुक्रवार (दि. 3) पासून झाला असून 6 मे रोजी चौदा महिन्यांचा उपवास केलेल्या तपस्वींची शोभा यात्रा काढण्यात येणार असून, मंगळवारी (दि. 7) सामूहिक वर्षीतप पारणोत्सवाच्या कार्यक्रमानंतर पाच दिवसांच्या …

Read More »

कर्जत येथे नगरसेवक चषक कॅरम स्पर्धा

कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने कर्जत शहरात नगरसेवक चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटांत ही स्पर्धा दोन दिवस चालणाऱ असून रायगड जिल्ह्यातील आघाडीचे 100 हून अधिक कॅरमपटू सहभागी झाले आहेत. कर्जत शहरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक बळवंत घुमरे यांनी नगरसेवक चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन कर्जत …

Read More »