Breaking News

Monthly Archives: August 2019

आज उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त पुन्हा आणूया आपले सरकार, या शीर्षकाखाली रविवारी (दि. 25) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर भारतीय जनता पक्ष उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन होणार आहे. या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, …

Read More »

अरुणास्त! माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते जेटली यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे शनिवारी (दि. 24) निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. एम्स रुग्णालयात दुपारी 12च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे. गेल्या काही दिवसांपासून जेटली आजारी होते. श्वसनाचा त्रास …

Read More »

लोकसंख्यावाढ : राजकीय फोडणी नको

पंतप्रधानांनी लोकसंख्यावाढीबाबत नुकतीच चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे गेल्या दोन-चार दिवसांत हा विषय माध्यमांत चर्चेला आहे, मात्र त्याचवेळी या चर्चेचा सूर भलत्याच दिशेने भरकटत असल्याचेही जाणवत आहे. आपल्याकडे ही फार मोठी समस्या आहे. आकलन मर्यादित असेल, तर विषयाला हात न घालण्याचा पर्याय खुला असतो, मात्र ते पथ्य पाळले जात नाही. …

Read More »

कृष्णप्पाचा काला; एकाच सामन्यात आठ विकेट्स आणि 39 चेंडूंत शतक

बंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटक आणि राजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर कृष्णप्पा गौतम याने कर्नाटक प्रीमियर लीग 2019मध्ये धम्माल उडवून दिली आहे. शुक्रवारी (दि. 23) झालेल्या सामन्यात त्याने एकाच सामन्यात आठ विकेट्स घेताना 39 चेंडूंत वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही केला. बेल्लारी टस्कर्सकडून शिवमोगा लायन्सविरुद्ध खेळताना कृष्णप्पा गौतमने ही कमाल केली आहे. कृष्णप्पा गौतमची …

Read More »

डब्ल्यूबीटी : सिंधूची फायनलमध्ये धडक

नवी दिल्ली ः भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने शनिवारी (दि. 24) इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सिंधूने धडक मारली आहे. या सामन्यात सिंधूने चीनच्या चेन यू फेईवर 21-7, 21-14 अशी मात करीत सहज विजय मिळवला.

Read More »

विंडीजविरुद्ध कसोटीत ईशांत, जडेजा चमकले

गयाना : वृत्तसंस्था ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. दुसर्‍या दिवसाअखेर वेस्ट इंडिजने आठ गड्यांच्या मोबदल्यात 189 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात विंडीजचा संघ अद्याप 108 धावांनी पिछाडीवर आहे. दुसर्‍या दिवशी जडेजाने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत सन्माजनक धावसंख्या उभारून दिल्यानंतर ईशांत शर्माने पाच बळी …

Read More »

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे ज्युडो स्पर्धेत घवघवीत यश

खारघर : प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाने ज्युडो स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील सात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक आणि तीन विद्यार्थ्यांनी रौप्यपदक जिंकले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक अजिंक्य …

Read More »

खालापुरात एसटीला किरकोळ अपघात

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या एसटीच्या निमआराम बसला (एमएच-20, बीएल-3323) महामार्गावरील चौक गावाच्या हद्दीत शनिवारी (दि. 24)सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झाली नाही. एसटी बस शनिवारी सकाळी मुंबईहून पुण्याकडे जात होती. जुन्या महामार्गावरील चौक गावाजवळील रामानंद सागर फार्म हाऊससमोर एक मोटारसायकलस्वार अचानक समोर …

Read More »

श्रीगाव येथे गोपाळकाला उत्साहात साजरा

श्रीगाव : प्रतिनिधी गोविंदा आला रे आला, एक दोन तीन चार श्रीगावची पोरं हुश्शार, अशा गजरात शनिवारी (दि. 24) अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे गोपाळकाला उत्साहात साजरा झाला. त्यामध्ये लहान-थोरांसह महिलासुध्दा सहभागी झाल्या होत्या. या वेळी गावातील  एकूण 46 दहीहंड्या फोडण्यात आल्या. म्हसळा तालुक्यात 852 ठिकाणी गोपाळकाला म्हसळा :  प्रतिनिधी गोपाळकाला …

Read More »

पोशीरमध्ये दहीहंडीचा जल्लोष

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोशीरमध्ये दहीहंडी फोडण्याकरिता गोविंदा पथकांनी शनिवारी उत्साहात हजेरी लावली होती. या वेळी गावातील एकमेव बँड पथकाने आखाडा भागात संगीतमय सलामी दिली. त्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदात आणखी भर पडली. पोशीरमधील आखाडा (जांभूळपाडा), वरची आळी, खालची आळी, चाफा आळी आदी भागांत दहीहंडीचा उत्साह होता. गावातील लिये परिवाराच्या दहीहंडीबद्दल कुतूहल …

Read More »