कोल्हापूर, सांगलीत आलेल्या जलप्रलयामुळे ‘जारे जारे पावसा’ अशी आळवणी तेथील लोकांना करावी लागली. एवढी पर्जन्यवृष्टी या दोन जिल्ह्यांत झाली. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भात यंदा पुराने हाहाकार माजवला, तर दुसरीकडे मराठवाड्याचा बहुतांश प्रदेश मात्र कोरडाच राहिला. इतकेच काय तर सांगली शहरासह काही भाग पाण्याखाली गेले असताना याच जिल्ह्यातील जत, आटपाडीसारख्या तालुक्यांमध्ये …
Read More »Monthly Archives: August 2019
चिदंबरम यांचा भ्रष्टाचार आणि हिंदू आतंकवाद
काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर राजकीय स्फोट झालेला नाही. महाराष्ट्राची पूरपरिस्थिती हळूहळू सावरत आहे. भूतपूर्व केंद्रीय वित्त आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांची आर्थिक भ्रष्टाचाराच्या संशयावरून चौकशी चालू आहे. या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी गेलो की त्यांचा संबंध राष्ट्रवादाशी येतो हे समजते.आपल्याकडे राष्ट्रवादावर शास्त्रीय पद्धतीने गंभीर चर्चा न करण्याची बौद्धिक शिस्त आहे. …
Read More »उत्साह, थरार अन् जल्लोष! गोपाळकाल्याचा सण रायगडात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त गोपाळकाल्याचा सण शनिवारी (दि. 24) रायगड जिल्ह्यात साजरा करण्यात आला. राज्यातील पूरपरिस्थितीमुळे काही दहीहंड्या रद्द झाल्या असल्या, तरी उर्वरित आयोजकांनी परंपरा जपत उत्सव साजरा केला. या वेळी गोविंदांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले. थरांवर थर लावून सलामी देत हंडी फोडल्यानंतर उपस्थित सर्वांनी एकच जल्लोष केला. रायगड …
Read More »म्हसळ्यात गोविंदाचा पडून दुर्दैवी मृत्यू
म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील खरसई येथे दहीहंडी उत्सवाला शनिवारी (दि. 24) गालबोट लागले. येथे पाचव्या थरावरून पडून एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्जुन लक्ष्मण खोत (23) असे त्याचे नाव आहे. अर्जुन खोत हा श्री समर्थ रामदास सेवा मंडळाचा गोविंदा होता. दहीहंडी फोडत असताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला. …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सिटी आयकॉन पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आवाज वृत्तवाहिनीच्या वतीने नवी मुंबई आवाज पनवेल-उरण अॅचिव्हर्स अॅवॉर्ड 2019चे आयोजन शुक्रवारी (दि. 23) करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सिटी आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या वतीने महापालिका …
Read More »वीजपुरवठा तोडल्याने मुरूड तालुक्यातील बीएसएनएलचा कारभार ठप्प
मुरूड : प्रतिनिधी पाच लाखाचे वीज बिल गेल्या सहा महिन्यांपासून न भरल्याने बीएसएनएलच्या मुरूड कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील घरगुती दूरध्वनी, भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा मागील चार दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांत संताप व्यक्त केला जात आहे. कधी काळी नामांकीत असलेली बीएसएनएल कंपनी अलीकडच्या काळात डबघाईस आली …
Read More »सरकारी जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार्या दलाल, अधिकार्यांवर कारवाई करा
अलिबाग : प्रतिनिधी इंटीग्रेटेड इंडस्ट्रियल टाऊनशिपसाठी प्रस्तावित असणार्या दिव (ता. रोहा) गावातील गट नं. 133 या सरकारी खाजण जमिनीला खोत दाखवून त्या जमिनी कुळांच्या नावे करून दलाल आणि गुंतवणूकदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न काही महसूल अधिकार्यांनी केला. या जमिनी हडप करण्याच्या कटात सामील असलेल्या दलाल व शासकीय अधिकार्यांवर कारवाई करा, अशी …
Read More »हेदवली शाळेत पर्यावरण स्नेहहंडी
कर्जत : बातमीदार पारंपरिक सण अतिशय उत्साहात विविध संस्कारक्षम उपक्रमांनी साजरे केले जाणे हे कर्जत तालुक्यातील हेदवली शाळेचे वैशिष्ट्य आहे. शनिवारी गोपाळकालाही शाळेत असाच उत्साहात साजरा झाला. शाळेतील दहीहंडीला स्नेहहंडी असे अर्थपूर्ण नाव देण्यात आले. विद्यार्थ्यांत परस्पर स्नेहाचे वातावरण वृद्धिंगत व्हावे या दृष्टीने एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आली. शालेय परिसरात …
Read More »महाड पोलादपूर तालुक्यांमध्ये दहीहंडी साजरी
महाड : प्रतिनिधी महाड आणि पोलादपुर तालुक्यांमध्ये शहर आणि ग्रामीण भागांमध्ये दहीहंडी उत्साहाने साजरी करण्यात आली. सार्वजनिक दहीहंडीप्रमाणे खाजगी दहीहंड्या देखील बांधण्यात येतात. शहरांमध्ये शिवसेना पुरस्कृत सर्वात उंच हडी बांधण्यांत आली असुन शिवाजी चौक मित्र मंडळाने दखील दहीहंडी फोडणार्या गोविंदा पथकांना आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत. या वर्षी पुरामुळे अनेकांचे …
Read More »रायगडात दहीहंडीचा थरार
पायरीची वाडी शाळेतील बालगोपाळांनी साजरी केली ‘प्रबोधनात्मक दहीहंडी’ पाली, बेणसे : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील राजिप शाळा पायरीची वाडीच्या बालगोपळांनी मुख्याध्यापक कुणाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आळस, अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धेची हंडी फोडत अनोख्या पद्धतीने ‘प्रबोधनात्मक दहीहंडी’ उत्सव साजरा केला. भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सवांना विषेश महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आजपर्यंत टिकून …
Read More »