श्रीवर्धन ़: प्रतिनिधी विधानसभेच्या श्रीवर्धन मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे 23 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत. विनोद रामचंद्र घोसाळकर (महायुती), आदिती सुनील तटकरे (काँग्रेस आघाडी), सुमन यशवंत सकपाळ (बहुजन समाज पक्ष), अकमल असलम कादीरी (इंडियन युनियन मुस्लिम लीग), रामभाऊ रामचंद्र मंचेकर (बहुजन मुक्ती पार्टी), संजय बाळकृष्ण गायकवाड …
Read More »Yearly Archives: 2019
निवडणुकीच्या तोंडावर गाव बैठकांवर जोर
पाली ः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. काही दिवसांपूर्वी आचारसंहितादेखील लागू झाली आहे. प्रचारासाठी फार थोडे दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभेसाठी प्रस्थापित आमदार व इच्छुक उमेदवार यांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली असून सर्वत्र गाव बैठकांवर अधिक भर दिला जात आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी गाव बैठकांना जास्त पसंती आहे. …
Read More »अनाजी पंतांचा कडेलोट करा -भाई शिंदे
खोपोलीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात खालापूर : प्रतिनिधी कर्जत, खालापूर विधानसभा मतदारसंघात मागील 15 वर्षे शिवसेना-भाजप युतीचा आमदार नाही. त्यामुळे येथील विकासकामे रखडली आहेत. कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी येथे महायुतीचा आमदार होणे गरजेचे आहे. येथील विरोधकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी आणि एकजुटीने …
Read More »सुरेश टोकरे, देवेंद्र साटम उमेदवारी अर्ज भरणार ही केवळ अफवाच
कर्जत : बातमीदार कर्जत मतदारसंघात अनेक मातब्बर नेते विधानसभा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना उमेदवार म्हणून रोज एका नव्या नावाची चर्चा दोन्ही तालुक्यांत सुरू होती. त्यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांची नावे आघाडीवर होती, मात्र उमेदवारी अर्ज …
Read More »रविशेठ पाटील यांनी घेतले निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद
पेण : प्रतिनिधी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा निवासस्थानी सहकुटुंब जाऊन पेण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी (दि. 4) पेण तालुक्यातील वाशी येथून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. आप्पासाहेबांची भेट ही मनाला शांती व समाधान देणारी ठरली असल्याचे रविशेठ पाटील यांनी सांगितले. …
Read More »कर्जतमध्ये 17 उमेदवारी अर्ज दाखल
कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 17 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 13 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. कर्जत विधानसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल झालेल्या प्रमुख उमेदवारांत आमदार सुरेश लाड, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे महेंद्र थोरवे, वंचित आघाडीचे अक्रम खान यांच्यासह …
Read More »भगव्या जल्लोषात महेंद्र थोरवेंनी भरला उमेदवारी अर्ज
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी कर्जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांनी शुक्रवारी (दि. 4) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. थोरवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कर्जातमध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते दाखल झाले होते. या वेळी ढोलताशांचा गजर, भगवे, निळे झेंडे यांनी वातावरण फुलले होते. कर्जत मतदारसंघ …
Read More »भाजप पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, एकनाथ भोपी व सहकार्यांनी देवीचे दर्शन घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जाहीर प्रचाराला दमदारपणे सुरुवात केली.
Read More »पक्षनेतृत्वाचे आदेश शिरसावंद्य
विनोद घोसाळकरांचे काम करणार -कृष्णा कोबनाक माणगाव : प्रतिनिधी पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील भाजप, सेना महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचे काम प्रामाणिकपणे करून त्यांना निवडून आणणार असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी श्रीवर्धन येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी …
Read More »पनवेल ः इफ्तीकर महमूद मस्ते यांनी भाजपत प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी वाय. टी. देशमुख उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper