Breaking News

Yearly Archives: 2019

पालेखुर्दमधील युवक भाजपत

महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता दिवसेंदिवस पक्षप्रवेश करणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्याअंतर्गत शेकापचे पालेखुर्द येथील युवा नेते राकेश दुर्गे, निकेश दुर्गे, जयेश दुर्गे, प्रविण सुर्वे, सुराज माळी, चंद्रकांत वावरे यांनी शनिवारी जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते …

Read More »

महिलेचा विनयभंग करणार्‍यास अटक

पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर परिसरात 19 ऑक्टोबर रोजी रात्री एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील आरोपी हा अतिशय चाणाक्ष व हुशार असून एकांत ठिकाणावरून जाणार्‍या महिलेचा विनयभंग करून आरोपी पळून जात असे. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने आरोपीचा शोध पोलीस घेत होते. …

Read More »

बसस्थानके चोरीला

राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांब्यावर प्रवाशांना बस येईपर्यंत वाट पाहण्यासाठी निवारा शेडची उभारणी करण्यात आली. हे निवारा शेड विशेषतः शहरी भागात प्रथमतः उभारण्यात येऊन काही प्रमाणात ग्रामीण भागातही मार्गाच्या दुतर्फा उभारण्यात आले. या बस स्थानकांमध्ये प्रवाशांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून बचाव होत असतानाच त्यांच्या संपत्तीचेही रक्षण होत असते. काही …

Read More »

कुटुंबाचा आधारस्तंभ बनलेली उरणमधील नवदुर्गा

उरण ः रामप्रहर वृत्त उरणमधील कोप्रोली गावातील अश्विनी अजित पाटील या नवदुर्गेने पतीच्या निधनानंतर न डगमगता स्वकर्तृत्वाने उभारी घेतली आहे. पतीच्या निधनानंतरही या महिलेने जिद्द कायम ठेवत मेहनतीवर विश्वास ठेवला आहे. यामुळे ही महिला उरण तालुक्यातील मेहनत करणार्‍यांसाठी आशेचे उदाहरण बनली आहे. अश्विनी अजित पाटील यांचा दिवस पहाटे 3 वाजता …

Read More »

पनवेलमध्ये घुमला जागर मतदानाचा

पनवेल ः बातमीदार भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ऑक्टोबर रोजी पनवेल तालुक्यात विधानसभा निवडणूक मतदान जनजागृती अभियान …

Read More »

राजा! जागा राहा, रात्र वैर्याची आहे!!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत समन्वय, सामंजस्य, सौहार्द आणि सहकार्य या सूत्रांचा अवलंब करून या निवडणुकीत उत्तमरीत्या धुरा हाती घेतली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सहीने संयुक्त …

Read More »

महायुतीला महाजनादेश मिळेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 4) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरीत्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल. महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा ठाम विश्वास या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. युती होईल …

Read More »

भिंगारीतील शेकाप पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाने केलेली विकासकामे पाहता विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. तशाच प्रकारे भिंगारी विभागातील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 3) भाजपत जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे शाल देऊन स्वागत …

Read More »

आधी भूमिपुत्रांचे पैसे द्या, मगच मत मागा!

महेश बालदी यांचा घणाघात; जासईत शक्तिप्रदर्शन उरण : प्रतिनिधी, वार्ताहर स्वतःला भूमिपुत्रांचे कैवारी म्हणवून घेताना शेकापच्या विवेक पाटलांनी कर्नाळा बँकेत 400 कोटींचा घोटाळा करून गोरगरीब जनतेला कंगाल केले आहे. तुम्हाला भूमिपुत्र जनतेकडून मत हवे असेल, तर प्रथम त्यांचे पैसे परत करा; अन्यथा हीच जनता तुमची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा …

Read More »

नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्यावर अंत्यसंस्कार

पनवेल : वार्ताहर अपघाती निधन झालेल्या पनवेल महापालिकेच्या नगरसेविका आणि भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्यावर शुक्रवारी (दि. 4) मध्यरात्री दोनच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अमरधाम स्मशानभूमीत लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुग्धा लोंढे यांच्या अकाली मृत्यूचे वृत्त कळताच …

Read More »