Breaking News

Yearly Archives: 2019

धुळीत हरवला नागोठणे-वाकण मार्ग

Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी  मुंबई-गोवा महामार्गाच्या नागोठणे ते वाकण या तीन किलोमीटर अंतरात पावसाळ्यात चिखलातून वाट काढत जाणार्‍या वाहनांना आता रस्त्यावर होणार्‍या धुळीला सामोरे जाऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत संबंधित कामाच्या ठेकेदार कंपनीचे एक अधिकारी एस. एम. स्वामी यांना विचारले असता, या रस्त्यावर दररोज पाणी मारून रस्ता ओला ठेवण्याचा …

Read More »

लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

मुरूड : प्रतिनिधी नांदगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुरूड पोलिसांनी योगेश यशवंत तळेकर याला अटक करून मुरूड न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अंगणामध्ये काही लहान मुली खेळत असताना योगेश  तळेकर याने एका मुलीस जबरदस्तीने एकांतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, …

Read More »

जिल्ह्यातील कुपोषण कमी करायचे आहे -जिल्हाधिकारी

कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे. ते कमी करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे. कर्जतप्रमाणेच इतरत्रही कुपोषित बालकांसाठी उपचार केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे केले. जिल्हा नियोजन मंडळाने दिलेल्या निधीमधून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू …

Read More »

अलिबागमध्ये काँग्रेसकडून दोन उमेदवार

राजेंद्र ठाकूरांपाठोपाठ अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांचा अर्ज अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाकडून उमेवारी मिळवण्यावरून ठाकूर कुटुंबात सुरू असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर यांना उमेदवारी दिली.  शुक्रवारी (दि. 4) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी …

Read More »

ब्राह्मण सभा आयोजित भोंडला रंगला

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त ब्राह्मण सभा, नवीन पनवेल यांच्या वतीने भोंडला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल येथील आंध्र कला केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पनवेल परिसरातील महिला व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हादग्याची गाणी गात फेर घरून नृत्य करून महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. सूर्याचा हस्त नक्षत्रात …

Read More »

भेंडखळ येथे मोफत आरोग्य शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवतरुण नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ आणि डॉ. आर.एन. पाटील, सुरज हॉस्पिटल, सानपडा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. 2) म्हातार आळी, भेंडखळ येथे मोफत आरोग्य शिबिर झाले. श्री. नवतरुण नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यक्षम व समाजकार्याची आवड असलेले सदस्य अनिल ठाकूर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी …

Read More »

पुरस्कार स्वरूपात मिळालेल्या रोपाची विद्यार्थ्यांकडून लागवड

मोहोपाडाः वार्ताहर चौक येथील गुणगौरव व पुरस्कार सोहळ्यात मिळालेल्या रोपांची लागवड शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसोबत करून शिक्षकांनी पर्यावरणाचा जागर केला. दिलासा फाऊंडेशन दरवर्षी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा गुणीजन गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव करते. यंदाही 18 शिक्षकांना गौरविण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळाच्या जोडीने पुष्पगुच्छाच्या ऐवजी औषधी रोपांचे वाटप करण्याची प्रथा …

Read More »

आयडीबीआयमधील ठेवी सुरक्षित ; अफवांवर विश्वास ठेवू नका -अजयसिंह ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त जुने पनवेल येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत बँकेचा 56वा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला. स्थापना दिवसाचे औचित्य साधून ग्राहकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरासाठी युनिकेअर हेल्थ सेंटरचे सहकार्य लाभले. आयडीबीआय बँकेतील ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत. भारत सरकारने नुकतीची नऊ हजार 300 कोटींची …

Read More »

स्त्री शक्तीतर्फे मुद्रा लोन कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त स्त्री शक्ती फाऊंडेशन आणि घाटी मराठी संघटना महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती नवी मुंबई आयोजित मुद्रा लोन प्रत्यक्ष कार्यशाळा व मार्गदर्शन मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वर्षा भोसले, संचालिका  सीताराम रोकडे, सिडकोमा रघुवंशी, राहुल हनुवंते, खादी ग्रामोद्योग अधिकारी धनंजय गायकवाड, प्युअर करिअर संचालक …

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी 2020 या परीक्षेला प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याचा शुभारंभ विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला. रयत …

Read More »