उरण : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उरण नगर परिषदेमध्ये अधिकारी, कर्मचारी वर्गातर्फे दीड दिवसाचे साखरचौथ गणपती बसविण्यात आले होते. नगर परिषदेमधील दीड दिवसाच्या साखरचौथ गणपतीचे उरण शहरातील विमला तलावात मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले. या साखरचौथ गणपतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, वरिष्ठ लिपिक के. जी. जाधव, महेश लवटे, …
Read More »Yearly Archives: 2019
‘म्हणूनच पवारांकडून उमेदवारांची घोषणा’
परळी ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याच्या दौर्यावर असून, बुधवारी बीडमध्ये पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावरून राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. लोक पक्ष सोडून जातील या भीतीने शरद पवार यांनी उमेदवारांची घोषणा केली, असे म्हणत राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवरून …
Read More »पूर्ण कोकण भाजपमय करेेन
नारायण राणे यांचा विश्वास; सावंतवाडी येथे पत्रकारांसोबत संवाद सावंतवाडी : प्रतिनिधी मी जेव्हा शिवसेनेत होतो, तेव्हा जिल्हा शिवसेनामय होता. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जिल्हा काँग्रेसमय केला. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पूर्ण कोकण भाजपमय करणार असल्याचा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. त्या वेळी ते बोलत …
Read More »अंगणवाडीचे वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीमधील एकता अपार्टमेंट ओनर्स असो. येथे गेली 10 वर्षे अंगणवाडी सुरू आहे. त्या ठिकाणी गेल्या 9 महिन्यांपासून विद्युत पुरवठा नसल्याने तेथील अंगणवाडी सेविका व छोट्या मुलांना गैरसोयीचा सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भातील माहिती स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम व शुभांगी निर्मळे यांना मिळताच त्यांनी याबाबत …
Read More »शिवशाही रस्त्यातच पडली बंद; प्रवाशांचे पैसेही गेले आणि हालही झाले
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाळा खिंडीत प्रवाशांना घेऊन जाणारी पनवेल-महाड शिवशाही बस बुधवारी (दि. 18) अचानक बंद पडली. कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. प्रवाशांनी गच्च भरलेली वातानुकूलित शिवशाही (एम 3802) बस बुधवारी पनवेल आगारातून सुटली खरी, मात्र ती कर्नाळा खिंडीत अचानक बंद पडली, सुरुवातीला …
Read More »पनवेल महानगरपालिकेच्या ताफ्यात नव्या गाड्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत बुधवारी (दि. 18) नव्या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजन करून या नवीन गाड्यांचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव …
Read More »आयुष्यमान योजनेंतर्गत गोल्डन कार्डचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तक्का विभागातील भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 20च्या वतीने ‘आयुष्यमान भारत योजने’अंतर्गत गोल्डन कार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 19) करण्यात आले होते. यानिमित्त तक्का विभागातील महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत योजने अंतर्गत नागरिकांना गोल्डन …
Read More »गुजराती शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी विकासकामांचा धडाका पाहायला मिळत आहे. त्याअंतर्गत बापट वाडा येथील सिल्व्हर आपार्टमेंटच्या शेजारील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या आणि गुजराती शाळेच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ सभागृह नेते परेश ठाकूर आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 18) करण्यात आला. पनवेल येथील बापट पाडा येथील सिल्व्हर आपार्टमेंट …
Read More »मानघर ते आवळीचा मळा रस्त्याचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांतून विविध ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या अंतर्गत मानघर ते आवळीचा मळा या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. 19) या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात …
Read More »प्रो कबड्डी : ‘यू मुम्बा’ने ‘यूपी’ला रोखले
पुणे : प्रतिनिधी अभिषेक सिंग आणि अर्जुन देशवालच्या आक्रमक चढायांना सुरिंदरसिंग आणि फझल अत्राचलीच्या पकडींची साथ मिळाल्याने यू मुम्बा संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धा संघावर 39-36 अशी मात केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. पूर्वार्धात यूपी योद्धाच्या रिशांक देवाडिगा, श्रीकांत जाधव, सुरेंदर गिल यांनी आपला करिष्मा दाखवायला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper