बँकॉक ः वृत्तसंस्था आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या आशिष कुमारने शनिवारी (दि. 27) पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे बँकॉक येथे झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताने आठ पदकांची कमाई केली. जगातील 37 देशांच्या बॉक्सिंगपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांची …
Read More »Yearly Archives: 2019
अल्टिमेट खो-खो लीग लांबणीवर!
मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे अल्टिमेट खो-खो लीगचा पहिला हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आता खो-खो लीग वर्षाअखेरीस किंवा पुढील वर्षीच्या प्रारंभी सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. गोवा येथे होणार्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गेले दोन मुहूर्त मिळाले नव्हते; परंतु यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या …
Read More »जपान ओपन : साईप्रणीतचे आव्हान अखेर संपुष्टात
टोकियो : वृत्तसंस्था भारताच्या बी. साईप्रणीतला जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. याबरोबरच भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित जपानच्या केंतो मोमोताने बी. साईप्रणीतचे आव्हान 21-18, 21-12 असे परतवून लावले. ही लढत 45 मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत केंतो अग्रस्थानी असून, …
Read More »यू मुंबाची घरच्या मैदानावर विजयी सलामी ; पुणेरी पलटनवर 33-23 मात
मुंबई ः प्रतिनिधी यू मुंबाने होम लेगमध्ये पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली. यू मुंबाने पुणेरी पलटनवर 33-23 अशी सहज बाजी मारली. दुसर्या सत्रात दोन लोण खाल्ल्यानंतर पुण्याने पराभव मान्य केला. सुरिंदर सिंग आणि फझल अत्राचली यांच्या पकडींनी पहिले सत्र गाजविले. सुरुवातीच्या काही मिनिटांत 2-5 अशा पिछाडीवर पडलेल्या यू मुंबाने नंतर …
Read More »कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ’असाही’ एक विक्रम!
इंग्लंड ः वृत्तसंस्था इंग्लंड आणि आयर्लंडदरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ 85 धावांत, तर आयर्लंडचा संघ 38 धावांत बाद होण्याशिवाय आणखी एक अद्भुत विक्रम घडला. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसर्यांदाच हा विक्रम घडला आहे आणि त्याहून विशेष म्हणजे 1999पर्यंत कसोटी क्रिकेट सुरू झाल्यापासून तब्बल 122 वर्षे असा विक्रम …
Read More »नागोठण्यातील पूर ओसरला
28 तासांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत नागोठणे : प्रतिनिधी शहराच्या विविध भागात शनिवारी मध्यरात्रीनंतर भरलेले पुराचे पाणी तब्बल 30 तासाने म्हणजेच रविवारी सकाळी 9 वाजता पूर्णपणे ओसरून जनजीवन सुरळीत झाले आहे, मात्र शनिवारी सकाळच्या दरम्यान पुराचे पाणी वाढत आहे, हे निदर्शनास आल्यानंतर सकाळी 8 वाजता येथील विद्युत वितरण कंपनीकडून शहराचा विद्युत …
Read More »कुडपणचे राजेंद्र शेलार यांचा ओढ्यात बुडून मृत्यू
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबईतील मित्रांसोबत वर्षासहलीची मजा लुटण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील कुडपण बुद्रुक येथे आलेल्या राजेंद्र विश्राम शेलार याचा शनिवारी ओढासदृश नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा ओढ्यातील दगडांमध्ये अडकलेला त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात महाड येथील गिर्यारोहक आणि धाडसी तरुणांना यश आले. मूळचा कुडपण येथील राजेंद्र शेलार हा मुंबईतील सांताक्रूझ येथे …
Read More »झुगरेवाडीमध्ये आदिवासीचे घर कोसळले
कर्जत : बातमीदार तालुक्यातील झुगरेवाडीमधील शंकर गोमा झुगरे यांचे राहते घर शनिवारी वादळी वार्यात कोसळले. त्या वेळी शंकर झुगरे घरात झोपले होते, मात्र किमान तासभर गावातील लोकांना त्याबाबत काहीही माहिती नव्हती. शेवटी घराची कोसळलेली कौले उचलत असताना स्थानिकांना त्याबाबत माहिती झाली आणि झोपलेल्या झुगरे यांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्या घराच्या …
Read More »महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. सदस्यांची मदत
कर्जत : बातमीदार वांगणी-बदलापूर दरम्यान अडकून पडलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शनिवारी अनेकांचे हात पुढे आले होते. त्यात कर्जत पॅसेंजर असोसिएशनचे अनेक सदस्य या मोहिमेत सहभागी झाले होते. राजाभाऊ कोठारी यांनी आपल्या सहकार्यांसह मोहीम राबवून अनेकांना सुखरूप बाहेर काढले. वांगणी ते बदलापूर दरम्यान चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील …
Read More »दहिवली पुलावरून सलग 33 तास पाणी
45 वर्षांत प्रथमच इतके पाणी कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब रस्त्यावर उल्हास नदीवर असलेल्या दहिवली-मालेगाव या पुलाची शनिवार (दि. 27)च्या पावसाने बिकट स्थिती केली आहे. या पुलावरून सलग 33 तास पाणी गेले आहे. मागील 45 वर्षात प्रथमच एवढे तास पुलावरून पाणी गेले आहे, त्यामुळे पुलावरील डांबर वाहून गेले असून, नव्याने अधिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper