पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारा पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंदरे रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे वाहनचालक तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद याकडे लक्ष देत नसल्याचा संतप्त नागरिकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर दुंदरे ग्रामपंचायतीने स्वतः पुढाकार घेत या रस्त्यातील खड्डे बुजविण्यास सुरुवात …
Read More »Yearly Archives: 2019
मिनीट्रेनच्या इंजिनात बिघाड
कर्जत : बातमीदार माथेरान-अमन लॉज शटलसेवा गुरुवारी (दि. 18) इंजीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रद्द करण्यात आली. त्यामुळे पर्यटकांचे हाल झाले. प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानची लाइफलाइन मिनीट्रेनची सेवा नेरळ-माथेरानदरम्यान पावसाळ्यात बंद असते. या काळात स्थानिकांसह पर्यटकांसाठी माथेरान-अमन लॉज शटलसेवा दररोज सुरू असते. गुरुवारी ही शटलसेवा नवीन इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळच्या पहिल्या …
Read More »खालापुरात कंपनीमध्ये तीन कामगार भाजले
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील डोणवत येथील कार्बन स्टील मार्ट प्रा. लि या कंपनीत तीन कामगार भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते, मात्र यामागचे कारण व्यवस्थापनाकडून अधिकृत माहिती समोर न आल्याने गुलदस्त्यात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोणवत येथील कार्बन स्टील मार्ट …
Read More »काँग्रेस, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त सब का साथ, सब का विकास, या न्यायाने देशाची प्रगती साधणार्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांचा ओघ कायम असून, खालापूर तालुक्यातील महड व हाळ येथील काँगे्रस, तसेच शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पक्षप्रवेशकर्त्यांचे …
Read More »‘रामप्रहर’च्या वर्धापन दिनानिमित्त
यांचीही लाभली उपस्थिती सुरदास गोवारी, कृष्णाशेठ पाटील, अमरिश मोकल, के. ए. म्हात्रे, अनेष ढवळे, पांडुरंग केणी, के. जी. म्हात्रे, हितेश शहा, लीना पाटील, गणेश सुरते (सरपंच कोळखे), प्रियंका पवार, दुर्गा सहानी, मोनाली गायकवाड, प्रतिभा भोईर, शांताराम पाटील, नागाव-उरण माजी सरपंच परीक्षित ठाकूर, उदय पाटील, वितरक राजेश पाटील, इ. ए. पाटील, …
Read More »सिडको सहव्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. नारनवरे
नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार गुरुवारी (दि. 18) सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे स्वीकारला. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी डॉ. नारनवरे पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. सन 2009च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या डॉ. नारनवरे यांनी यापूर्वी …
Read More »पत्रकारिता तोंडओळख कार्यशाळेचे आयोजन
मुंबई ः प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेतर्फे पत्रकारितेकडे ओढा असलेल्या बारावी, पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता विद्यानगरी कालिना येथील गरवारे व्यावसायिक शिक्षण संस्थेच्या प्रेक्षागारात एक विनाशुल्क पत्रकारिता तोंडओळख कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत संस्थेच्या पत्रकारिता वर्गाचे माजी विद्यार्थी आणि नामवंत पत्रकार मार्गदर्शन करतील. …
Read More »भाजप सोशल मीडिया सेल रायगड जिल्हा सदस्यपदी राजेंद्र कदम
खोपोली ः प्रतिनिधी रायगड जिल्हा सहसंयोजक व कर्जत विधानसभा संयोजक (अध्यक्ष) राहुल जाधव यांनी राजेंद्र कदम यांची भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल रायगड जिल्हा सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तसे नियुक्तिपत्र राजेंद्र कदम यांना खोपोली मंडळ अध्यक्ष श्रीकांत पुरी व खालापूर मंडळ अध्यक्ष बापू घारे यांच्या हस्ते भाजप खोपोली …
Read More »मायावतींच्या भावावर कारवाई; 400 कोटींचा प्लॉट जप्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बसपाप्रमुख मायावती यांचा भाऊ आणि बसपाचे उपाध्यक्ष आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुरुवारी (दि. 18) आयकर विभागाने मोठी कारवाई केली. आयकर विभागाने आनंद कुमार यांचा एक निनावी प्लॉट ताब्यात घेतला आहे. हा प्लॉट नोएडा येथे असून त्याची किंमत 400 कोटी आहे. आयकर विभागाने आज आनंद …
Read More »शिव छत्रपती पुरस्कार विजेते देवेंद्र चौगुले काळाच्या पडद्याआड
अलिबाग ः वार्ताहर महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे शिव छत्रपती पुरस्कार विजेते व तालुक्यातील सारळ माध्यमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक देवेंद्र चौगुले यांचे गुरुवारी (दि. 18) मुंबईत रुग्णालयात उपचारासमयी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper