पनवेल : बातमीदर नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने नवी मुंबईच्या विविध भागांतून अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींचा व एका अल्पवयीन मुलाचा एकाच दिवसात शोध घेण्याची कामगिरी केली, तसेच यातील अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्या तिघांना ताब्यात घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अपहरणाचे चार गुन्हे उघडकीस आणले. नवी मुंबईचे …
Read More »Yearly Archives: 2019
संस्कार भारतीच्या वतीने चित्रगुरूंचा सत्कार
पनवेल : बातमीदार रंग-रेषा व छटा या अविष्कारांची मुक्त उधळण पनवेलकरांनी नुकतीच अनुभवली. संस्कार भारती पनवेल समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त चित्रगुरूंचा सत्कार आणि त्यांची प्रात्यक्षिके अशा वेगळ्याच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल परिसरातील ज्येष्ठ चित्रकार नंदकुमार गोगटे, रामदास झोपे, राजेंद्र कांबळे, सुलभा जोशी, अनिल वाघमारे व श्री. बेहरे यांचा सत्कार …
Read More »उरण डेपोतून गणेशोत्सवासाठी ज्यादा बसेस
उरण : बातमीदार उरण एसटी आगारातून गौरीगणपतीसाठी सालाबादप्रमाणे यंदाही उरणवासीयांना कोकणात जाण्यासाठी ज्यादा बस सोडण्यात येणार आहेत. याबाबत आगारप्रमुख श्री. नाईकवाड यांची कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या पदाधिकार्यांनी भेट घेतली. संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गोपीनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे पदाधिकारी कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी, सहसचिव प्रमोद पाटोळे, सदस्य संतोष पवार, सचिव राकेश केळकर …
Read More »कराडी समाजाच्या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक ; अखिल कराडी समाजाच्या पाठपुराव्याला यश
उरण : बातमीदार मुंबई, नवी मुंबई, रायगड, कोकण आदी परिसरात कराडी समाज बहुसंख्येने वसलेला असून, शांतताप्रिय असलेल्या या कराडी समाजाच्या अनेक समस्या, मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.त्यापैकीच एक महत्त्वाची समस्या किंवा मागणी म्हणजे कराडी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न. कराडी समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात एक लाख 18 हजार एवढी असून या समाजाला महाराष्ट्रात …
Read More »जिल्हा परिषदेच्या शाळेला पालिकेची नोटीस; इमारतीचा वापर बंद करण्याचे आदेश
पनवेल : बातमीदर काळुंद्रे जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या धोकादायक असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पनवेल महापालिकेने जिल्हा परिषदेच्या मालकीची शाळा असल्याचे कारण दाखवित इमारत तत्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले. प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांनी संबंधित प्रशासनाला पत्र लिहून ही माहिती कळविली. पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषदेच्या 51 …
Read More »आरोग्य महाशिबिरासाठीच्या बैठकीत कमिट्यांचा आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 20) खांदा कॉलनीमधील सीकेटी महविद्यालयात आढावा बैठक झाली. या वेळी विविध कमिट्यांचा आढावा घेण्यात आला. या …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा ; भाजप कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती एकत्र लढणार आहे. त्यासाठी जागावाटप लवकरच होईल. त्यामुळे निवडणुकीबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका. विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 21) भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत केले. मुंबईमधील गोरेगाव येथे झालेल्या भाजप कार्यसमितीच्या बैठकीला पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय …
Read More »रत्नागिरीत 45 लाखांचे कोकेन जप्त; तिघांना अटक
रत्नागिरी : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी रत्नागिरी एमआयडीसीत छापा घालून सुमारे 45 लाखांचे 930 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यात एक कोस्टगार्ड कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी परिसरात कोकेनची विक्री होणार असल्याची खबर पोलिसांना लागली होती. त्यानुसार …
Read More »वीज कोसळून तिघे ठार
धुळे, ठाणे : प्रतिनिधी मुसळधार पावसात वीज कोसळून धुळ्यामध्ये दोन बालकांचा, तर ठाणे जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही ठिकाणी मिळून चार जण गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे. धुळे जिल्ह्यातील पाडळदे या गावात झाडावर वीज कोसळली. या वेळी झाडाखाली आसरा घेतला असलेला पंकज ज्ञानेश्वर राठोड (14) याचा जागीच …
Read More »खालापुरात अळंबीतून पाच जणांना विषबाधा
खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील आडोशी आदिवासीवाडीत अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच आदिवासींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रघुनाथ नथू वाघमारे (40), ठमी रघुनाथ वाघमारे (35), गणेश रघुनाथ वाघमारे (15), अंकुश रघुनाथ वाघमारे (9) व ललिता रघुनाथ वाघमारे (7) अशी विषबाधा झालेल्या आदिवासींची नावे आहेत. त्यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper