उरण : वार्ताहर शाळा सुरू होण्यास अवघे थोडेच दिवस राहिल्याने उरण शहरातील बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. जूनच्या दुसर्या आठवड्यात शाळा सुरू होणार असल्याने शालेय साहित्य खरेदीला सुरुवात झाली आहे. बच्चे कंपनीला आकर्षित करील, असे विविध प्रकारचे शालेय साहित्य सध्या बाजारात उपलब्ध आहे. त्यात शिवा, मोटू-पतलू, …
Read More »Yearly Archives: 2019
विजेच्या पायाभूत सुविधांच्या कामांना महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करात सूट
मुंबई : प्रतिनिधी महापालिकांच्या क्षेत्रात वीज वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात येणार्या मूलभूत सुविधांच्या कामांना मालमत्ता करातून सूट देण्यास आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व त्यांच्या सहयोगी संस्था (फ्रँचायझी) तसेच महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी यांच्यामार्फत …
Read More »चौक येथे माजी सैनिकांचा सत्कार
रसायनी : प्रतिनिधी चौक येथील श्री गुरू साखरे महाराज प्रासादिक श्रीनाथ आश्रम यांच्या वतीने श्री मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोमवारी (दि. 10) झाला. या सप्ताहात सोमवारी कीर्तन केसरी पुरस्काराने सन्मानित व महाराष्ट्र भूषण श्री महंत आनंदजी महाराज खंडागळे यांच्या शुभ हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात …
Read More »कळंबोलीतील अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक ; वाहनांच्या गतीला चाप
पनवेल : बातमीदार कळंबोलीत अंतर्गत रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे बेभान दुचाकी चालवून सर्वांचे लक्ष वेधणार्या दुचाकीस्वारांना रोखणे कठीण झाले होते. कळंबोली विकास समिती सामाजिक संस्थेच्या वतीने आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात होती. अखेर समितीच्या मागणीला यश आले असून शनिवारपासून आवश्यक ठिकाणी गतिरोधक बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. कळंबोली वसाहतीत …
Read More »यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पनवेलमध्ये प्रवेश सुरू
पनवेल : वार्ताहर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश पनवेलमध्ये सुरू झाले असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र शासनाने 1989 मध्ये स्थापन केले असून विद्यापीठाला युनिव्हर्सिटी ग्रॅण्ड कमिशन (युजीसी) व डिस्टन्स एज्युकेशन ब्युरिया (डीईबी) भारत सरकार यांची …
Read More »गुणकारी जांभळे झाली महाग; तरीही मागणी वाढली
उरण : वार्ताहर उन्हाळा आला की थंडाव्यासाठी नागरिक अनेक उपाय योजतात. अंगाची लाही-लाही झाल्यावर थंडाव्यासाठी रानमेवा खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. उन्हाळ्यात उपलब्धता असणारा रानमेवा म्हणजे करवंदे, गुणकारी जांभळे, जाम, आंबे, अशा विविध प्रकारची रानमेवा खरेदी करताना नागरिक नाक्या-नाक्यावर दिसत आहेत. मधुमेही रुग्णांसाठी टपोरी, काळीभोर जांभळे म्हणजे पर्वणीच, जांभळे मधुमेही …
Read More »रसायनीच्या पायल भारद्वाजला आयएसए ग्लोबल अॅवॉर्ड
रसायनी : प्रतिनिधी चंदिगड येथील चित्रकारा विद्यापीठ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्कूल पारितोषिक समारंभामध्ये रसायनीची पायल भारद्वाज हिला आयएसए 2019 ग्लोबल अॅवॉर्ड विनरच्या वतीने सन्मानित करण्यात आले. आयएसएच्या या संमेलनामध्ये पाचशेपेक्षा जास्त विश्वसनीय स्कूल आणि एक हजारपेक्षा जास्त शिक्षणवादी आणि एज्युकेशनल स्टार्टअप यांनी सहभाग घेतला होता. या समारंभामध्ये पायल भारद्वाज हिने …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन
पनवेल : वार्ताहर आझाद ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था, खांदा कॉलनी ही विविध स्तरावर अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून वर्षभरातील विविध कार्यक्रमांचा लेखाजोखा म्हणून दरवर्षी स्मरणिका तयार केली जाते. या स्मरणिकेचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सल्लागार व प्रभाग समिती ब चे …
Read More »अॅड. चेतन जाधव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल आदी उपस्थित होते.
Read More »सिद्धेश्वर धरण झाले दुरुस्त
ग्रामपंचायतीने पाणीप्रश्न लावला मार्गी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावात ब्रिटिशकालीन छोटे धरण आहे. गळती लागल्याने या धरणाची दुरूस्ती करणे गरजेचे होते. सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने 14व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करून या धरणाची नुकतीच दुरुस्ती केली आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊन ग्रामस्थांसह मुक्या जनावरांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper