Breaking News

Yearly Archives: 2019

सुटकेचा नि:श्वास

अरबी समुद्रातील चक्रीवादळांनी तुलनेने कमी हानी होते. परंतु तरीही या स्वरुपाची नैसर्गिक आपत्ती वारंवार येत असल्यामुळे त्यादृष्टीने सज्जता राखणे व काळानुरुप त्यात अधिकाधिक चांगले बदल करत राहणे जबाबदार प्रशासनाकडून अपेक्षितच आहे. भारताला लाभलेली 7600 किमीची मोठी किनारपट्टी लक्षात घेता हे आव्हान सोपे नाही. वायु चक्रीवादळाने दिशा बदलल्याची बातमी गुरुवारी दुपारपर्यंत …

Read More »

वादळी वार्यासह पावसाच्या हजेरीने मुरूडकर धास्तावले

मुरूड ः प्रतिनिधी कोकण किनारपट्टीवर दोन दिवस वादळ आणि सोसाट्याचा वारा धडकणार, हा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. मुरूड येथे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा व पाऊस सुरू झाला होता, मात्र थोडा वेळ बरसणार्‍या या पावसाने मुरूडकर चांगलेच धास्तावले. आधीच दोन दिवस सतत बत्ती गुल होत असल्याने मुरूडकर …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे काम 25 जूनपूर्वी पूर्ण करावे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश पनवेल ः प्रतिनिधी पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामुळे रखडल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे काम 25 जूनपूर्वी पूर्ण करून द्यावे, असे आदेश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 12) सुरू असलेल्या कामाची पाहणी केल्यावर कार्यकारी अभियंत्यांना दिले. …

Read More »

डुंगी गावाच्या पुनर्वसनावर शिक्कामोर्तब

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पालगत असलेल्या डुंगी गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. सिडको संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि. 7) पार पडलेल्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आल्याचे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. या निर्णयानुसार सदर गावातील स्थलांतर करणार्‍या बांधकामधारकांना विशेष पुनर्वसन आणि …

Read More »

चावणे ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच शेकापला जोरदार धक्का

कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश; पालकमंत्री आणि सिडको अध्यक्षांनी केले स्वागत पनवेल ः प्रतिनिधी चावणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 12) भाजपमध्ये जाहीर प्रवेश करीत शेकापला जोरदार दणका दिला आहे. चावणे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 23 जूनला आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील सवणे येथील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान देशमुख, चावणे येथील …

Read More »

नेरळ धरण झाले गाळमुक्त, माती व दगड बाहेर काढण्यात यश

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतमध्ये असलेल्या ब्रिटिशकालीन धरणातून तब्बल दहा वर्षानंतर गाळ काढण्यात येत आहे. या धरणातून आतापर्यंत किमान 900 ट्रक गाळ काढण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात दगडही बाहेर काढले आहेत. त्यामुळे धरणातील पाणी साठा अधिक होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, धरणातील गाळ काढताना त्या परिसरात तब्ब्ल दोन ठिकाणी गार्डन …

Read More »

रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस धोक्याचे

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस धोक्याचे आहेत. अरबी समुद्रात खोलवर निर्माण झालेले वायू चक्रीवादळ गुजरातकडे सरकले असले तरी कोकण किनारपट्टीवरील धोका कमी झालेला नाही. त्यामुळे रासगड जिल्हा प्रशासनाने समुद्रकिनार्‍या लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  बुधवारी (दि. 12) दुपारी 12 वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. पावसाबरोबर जोरदार वारे …

Read More »

उरण तालुक्यातील दमदार पावसाने बळीराजा सुखावला

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावल्याने मागील महिनाभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंडावा मिळाला असून, यंदा पावसाचे आगमन वेळेत झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तर झाडे-वेली आनंदाने डोलू लागल्या असून अनेक दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पशू-पक्षी आणि वन्य जीवांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्याच्या …

Read More »

‘रायगडसह महाराष्ट्रातील डोंगरी विकास कार्यक्रमासाठी 31 कोटीचा निधी’

मुंबई : प्रतिनिधी डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जुलै 2019 या चार महिन्यांतील खर्च भागविण्यासाठी 31 कोटी 35 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती देऊन ते म्हणाले, डोंगरी भागाच्या विकासासाठी सन …

Read More »

चौक येथे दाखले वाटप शिबिराचा विद्यार्थी व ज्येष्ठांना फायदा

रसायनी : प्रतिनिधी चौक येथील दगडी शाळेत विविध प्रकारचे दाखले वाटप झाले, अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आयोजित केलेल्या शिबिर सफल झाल्याचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी सांगितले. विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक यांना विविध प्रकारच्या दाखल्याची गरज असते, त्यासाठी त्यांना खालापूर तहसील कार्यालयात जावे लागते, त्यामुळे वेळ …

Read More »