मानवी आरोग्य, विकासासाठी कार्यक्रम राबवा : पंतप्रधान मोदी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजागतिक महामारी घोषित झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी 20 देशांची बैठक झाली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य देशांतील नेत्यांनी कोविड 19च्या या संकटावर मात करण्यासाठी एकजूट दाखवत मिळून काम करण्याचा संकल्प केला आहे. या बैठकीत पंतप्रधान …
Read More »Monthly Archives: March 2020
समतोल राखणे इष्ट
समाजमाध्यमांवरही लोक एकमेकांना गांभीर्य तसेच सकारात्मकता राखण्याचे सल्ले देत आहेत. एकंदरच कोरोनासंदर्भातील परिस्थितीचे नेमके स्वरूप स्पष्ट होण्यास आणखी दोन आठवडे जावे लागणार असल्याने तोवर सगळ्याच बाबतीत समतोल व सकारात्मकता राखणे इष्ट ठरणार आहे. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात पसरत चाललेल्या घातक साथीचे स्वरूप आता हलकेहलके स्पष्ट होऊ लागले आहे व देशातील …
Read More »सामाजिक कार्यकर्ते मयूर घरत यांची पोलिसांना मदत
उरण : वार्ताहर जीवावर उदार होऊन सुरक्षेचे कर्तव्य असताना नागरिकांना कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये, यासाठी जनजागृती करीत असतात अशा पोलिसांना सहकार्य करणे मदतीचा हात देणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी म्हणून उरण तालुक्यातील दिघोडे गावचे सामाजिक कार्यकर्ते मयूर घरत यांनी उरण पोलिसांना 70 मास्क व 70 …
Read More »नेरळच्या बाजाराचे सर्वत्र कौतुक
कर्जत : बातमीदार कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे, त्यात सोशल डिस्टन्स ठेवण्याचे सूचना राज्य सरकार करीत आहे. मात्र बाजार उघडला की गर्दी होत असून नेरळ येथे पोलिसांनी ग्रामपंचायतच्या मदतीने मैदानात बाजार भरवला आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्स ठेवून सुरू असलेल्या नेरळ गावातील मैदानातील बाजाराचे राज्याचे पोलीस …
Read More »गृहनिर्माण संस्थांनी सूचनांचे पालन करावेे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोचे आवाहन नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि संसर्गजन्य आजार प्रतिबंध अधिनियम 1897 अंतर्गत कार्यवाही करत 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. तसेच कलम 144 अंतर्गत संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. अनावश्यक गर्दी टाळून कोरोना …
Read More »गावातील रस्ते उघडण्याचे तहसीलदारांचे आवाहन
पनवेल : बातमीदार कोरोना विषाणूमुळे सर्वत्र काळजी घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने बाहेरील व्यक्ती आत येऊ नये व गावातील व्यक्ती बाहेर जाऊ नये यासाठी तालुक्यातील गावांमधील रस्ते बंद करण्यात येत आहेत. काही ठिकाणी रस्ते बंद देखील करण्यात आलेले आहेत. मात्र बंद रस्त्यांमुळे अत्यावश्यक सेवा सुविधा गावांमध्ये पोहोचू शकत नाहीत त्यामुळे …
Read More »दुधाच्या टेम्पोतून प्रवास करणार्यांवर कारवाई
पनवेल : प्रतिनिधी कळंबोली येथे महामार्गावर शुक्रवारी (दि. 27) सकाळी मॅकडोनोल्डसमोर सातारा जिल्ह्यात आपल्या गावाला जाण्यासाठी दुधाच्या टेम्पोतून बेकायदेशीरपणे प्रवास करीत असलेले 20 ते 25 जण आढळून आल्याने त्यांच्यासह चालकावर नवी मुंबई पोलीस आयुक्तांसमोर कारवाई करण्यात आली. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे रेल्वे बंद ठेवण्यात आली आहे. एसटी, खाजगी बसेस …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांनी औषध फवारणी
पनवेल : वार्ताहर गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी केली असल्याने नागरिकांना घरातच बसावे लागते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने तसेच या रोगाचा फैलाव पनवेल परिसरात होऊ नये या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी प्रभाग क्रमांक 18 मध्ये सर्व सोसायट्यांच्या आत …
Read More »अभिनेता राजा गोसावी यांचा जन्मदिन
राजा गोसावी-पूर्ण नाव-राजाराम शंकर गोसावी हे मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते होते. राजा गोसावींना विनोदाचा राजा म्हणत. मराठीचे ते डॅनी के होते. राजा गोसावी यांचे धाकटे बंधू बाळ गोसावी हेही नाट्यअभिनेते होते. नाट्यअभिनेत्री भारती गोसावी या बाळ गोसावी यांच्या पत्नी होत. आज त्यांचा जन्मदिन त्यानिमित्ताने जाणुया त्यांच्याविषयी. राजा गोसावी हे मास्टर विनायकांच्या …
Read More »उरणमध्ये पोलिसांकडून कांदेपोहे वाटप
उरण : वार्ताहर कोरोनाचा व्हायरल रोखण्यासाठी जिल्हा प्रश्सानाने उरण परिसरात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र बंद पाळण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या बाजूस बेघर असलेल्या, भुकेलेल्या पोटासाठी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने शुक्रवारी ओएनजीसी सीआयएसएफ कॉलोनी, समोरील सावित्रीबाई झोपडपट्टी, इंगलगेट समोरील झोपडपट्टी येथे राहणारे नागरिकांना व परिसरात नाष्टा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper