उरण : वार्ताहर – कोरोना विषाणूपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 27) ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सुमारे सॅनिटायझर 750 व तीन हजार मास्क यांचे वाटप करण्यात आले. या वेळी दिघोडे ग्रामपंचायत सरपंच सोनिया मयूर घरत, उपसरपंच शारदा प्रल्हाद कासकर, माजी उपसरपंच …
Read More »Monthly Archives: March 2020
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने मोहोपाड्यातील खासगी दवाखाने खुले!
मोहोपाडा : प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसने जनता हतबल झाली असून राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. काही दिवस दवाखाने उघडे न ठेवता रसायनी परिसरातील काही डॉक्टरांकडून रुग्णांना ऑनलाइन, व्हिडीओ कॉलवर आजाराचे निदान केले जात होते. कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दवाखान्यातील डॉक्टरांना शासनाकडून कोणतीही सुरक्षितता न मिळाल्याने डॉक्टरांसमोर एक दिव्यच …
Read More »अवैधरीत्या दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल
माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रसार थांबविण्याकरिता जिल्हाधिकारी रायगड यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून देशी दारूच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपींवर शुक्रवारी (दि. 27) माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्यामसुंदर …
Read More »गोरोबा काका मित्र मंडळाकडून अल्पोपहार
नागोठणे : प्रतिनिधी आज संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. या महामारीतही आपले कर्तव्य बजावणारे नागोठणे पोलीस, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी तसेच गोरगरिबांना कुंभारआळीतील तरुणांनी स्थापन केलेल्या संत शिरोमणी गोरोबा काका मित्र मंडळाकडून शनिवारी (दि. 28) सकाळी अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य मोहन नागोठणेकर यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष रूपेश …
Read More »माणगावात नगरपंचायतीकडून स्वच्छतेवर भर
माणगाव ः प्रतिनिधी सरकार कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. त्या अनुषंगाने माणगाव नगर पंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या विषाणूची बाधा कोणाला होऊ नये यासाठी स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. नगर पंचायतीने नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी शुक्रवारपासून (दि. 27) नगर पंचायत हद्दीत सर्व भागात निर्जंतुकीकरण औषध …
Read More »सॅनिटायझर, हॅण्डवॉशसाठी निवेदन
पाली ः प्रतिनिधी कोरोनाचा धोका सतत वाढतच चालला आहे. त्यामुळे चिंचोटी ग्रामपंचायत हद्दीत येणार्या चिंचोटी, दिविपारंगी, फणसापूर, बापळे गावांतील प्रत्येक घरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सॅनिटायझर व हॅण्डवॉशचा पुरवठा तत्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भातील निवेदन सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश पाटील यांनी चिंचोटी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक धुमाळ यांच्याकडे दिले. या वेळी प्रमोद वाजंत्री, बाळकृष्ण पाटील …
Read More »कर्जत नगरपरिषदेची निर्जंतुकीकरण मोहीम
कर्जत ः प्रतिनिधी कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून कर्जत शहरात सोडियम हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्जत नगर परिषद क्षेत्रात अग्निशमन दलाच्या गाडीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या आदेशानुसार तसेच यांच्या देखरेखीखाली नगर परिषद कार्यालयाच्या परिसरातून …
Read More »मुरूड नगर परिषदेकडून जंतुनाशक फवारणी
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूड नगर परिषदेकडून संपूर्ण मुरूड शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. अग्निशमन गाडीच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला असणारी गटारे व घाणीच्या सर्व ठिकाणांवर सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. नगराध्यक्ष स्नेहा पाटील, मुख्याधिकारी अमित पंडित, विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर व सर्व नगरसेवकांच्या मागणीनुसार सदरची फवारणी मुरूड शहरात सुरू …
Read More »खोपोलीत निर्जंतुकीकरणासाठी औषधाचा मारा
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचा उपक्रम खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण खोपोली शहर निर्जंतुक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. खोपोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून हा उपक्रम शनिवारपासून (दि. 28) सुरू करण्यात आला. यात खोपोली नगरपालिकेकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. खोपोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम …
Read More »लहान मुलांमधील ताप
लहान मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो, परंतु अंगाला हात लावून जाणवत जरी असला तरी प्रत्यक्षपणे थर्मामीटरवर मोजणे गरजेचे आहे. हल्ली तर इलेक्ट्रॉनिक थर्मामीटरवर प्रत्यक्षात ताप अंकामध्ये दिसत असल्याने ताप मोजणे सोपे झाले आहे. मुलाला ताप असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता व किती आला होता, कोणते औषध दिले, …
Read More »