नवीन पनवेल : सिडको ग्राऊंडवर फॉक्सीटेल इव्हेंट्सच्या वतीने 28 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत पनवेल मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका चारुशिला घरत, आयोजक सचिन नेटके आदी उपस्थित होते.
Read More »Monthly Archives: March 2020
भाजप खारघर मंडल सरचिटणीस सचिव कुणाल सांगानी यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, विपुल चौटालिया, प्रभाकर बांगर, नवनीत मारु, अविनाश कोळी आदींनी शुभेच्छा दिल्या.
Read More »मोठा खांदा येथील रक्तदान शिबिर उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष मोठा खांदा आणि पवन पुत्र महिला मंडळ यांच्या वतीने सलग तीन वेळा आमदार म्हणुन तसेच भाजपच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 1) मोठा खांदा येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे …
Read More »मोरा येथील रक्तदान व आरोग्य शिबिराला भरगोस प्रतिसाद
उरण : वार्ताहर मुंबईच्या भायखळा येथील मासिना हॉस्पिटल व उरण-मोरा भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवारी (दि. 1) मार्च न्यू इंग्लिश स्कूल येथे घेण्यात आले. त्यात 185 रुग्णांची तपासणी करून मोफत औषध देण्यात आली. मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरास …
Read More »‘त्या’ शेतकर्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भाजप उचलणार; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माहिती
अहमदनगर : प्रतिनिधी आत्महत्या केलेले शेतकरी मल्हारी बटुळे यांच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च भाजप करणार असल्याचे आश्वासन, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी केली असती, तर हा प्रसंग घडला नसता. कर्जमाफी न केल्यामुळेच बटुळे यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगत ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप प्रवीण दरेकर …
Read More »राष्ट्रवादी भाजपची खुन्नस काढतेय; शिवसेनेच्या खांद्यावर ठेवलीये बंदूक : चंद्रकांत पाटलांचा आरोप
शिर्डी : प्रतिनिधी भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते आहे. सध्याचे सरकार चालवणार्या राष्ट्रवादीला मात्र भाजपची खुन्नस काढायची आहे. राष्ट्रवादी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती खुन्नस काढत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी रविवारी (दि.1) दुपारी शिर्डीत साईदर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या …
Read More »वीर वाजेकर महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन समारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजश्री देशपांडे होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. यु. टी. घोरपडे होते. कार्यक्रमात प्रास्ताविक सायन्स असोसिएशनच्या प्रमुख प्रा. रुफा इनामदार, सुत्रसंचालन प्रा. निकिता …
Read More »त्या सत्तरीच्या ‘तरुणीं’ची धमाल : वृध्दाश्रमात आनंदोत्सव
पनवेल : प्रतिनिधी सैंया दिल में आना रे, आके फिर न जाना रे म्हणत सुंदर नृत्य करणार्या त्या सत्तरीच्या तरूणी पाहून समोर बसलेल्या त्यांच्याच वयाच्या तरूण आजोबांच्या हृदयात धडधडू लागले नाही तर नवलच. त्यांच्या चेहर्यावर तारुण्यातील आठवणी जागृत झाल्याचे दिसून येत होते. ’कोई लौटा दे मुझे मेरे बिते हुए दिन’ …
Read More »‘प्रायमा’तर्फे रसायनीत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
मोहोपाडा : प्रतिनिधी पाताळगंगा रसायनी डॉक्टर असोसिएशन (प्रायमा)यांच्या वतीने रसायनी गुळसूंदे तुंगारतन विद्यालयातील 250 हून अधिक विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रायमाच्या सर्व डॉक्टरांनी उपस्थित राहून मोफत आरोग्य सेवा देण्यात सहभाग नोंदवला. प्रायमाच्या अध्यक्षा डॉ. लेखा उचील ह्यांनी ह्या आणि अशा स्वरूपाचे …
Read More »पनवेल शहर पोेलिसांतर्फे के. वी. कन्या शाळेत कार्यशाळा
पनवेल : वार्ताहर पनवेल शहर पोलिसांनी महिला वर्गामध्ये तसेच अल्पवयीन मुलींमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विद्यार्थ्यांनीची कार्यशाळा घेतली होती. महिला पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे व महिला पोलीस नाईक विद्या भगत यांनी या शाळेत जावून विद्यार्थींनीची कार्यशाळा घेतली. या वेळी सुमारे 150 आसपास विद्यार्थीनी …
Read More »