सचिन पायलट यांचा दावा नवी दिल्ली : वृत्तसंस्थाराजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षाच्या 25 आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जयपूरला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपमुख्यमंत्री पायलट म्हणाले की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्याजवळ 102 आमदारांचा पाठिंबा असल्याचा …
Read More »Monthly Archives: July 2020
उरणमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
बाजारपेठ बंद, रस्ते निर्मनुष्य, पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त उरण : वार्ताहरकोविड-19 विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी उरण तालुक्यात तीन दिवस लॉकडाऊन लागू झाला असून, आवश्यकतेनुसार त्याचा कालावधी वाढविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 13) पहिल्याच दिवशी शुकशुकाट पहावयास मिळाला. साथरोग अधिनियमन 1897च्या कलम 2 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन …
Read More »गुगल भारतात करणार 75 हजार कोटींची गुंतवणूक
नवी दिल्ली : वृत्तसंस्थागुगल भारतामध्ये डिजिटलायझेशनसाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाईल, असे पिचई यांनी स्पष्ट केले आहे. पिचई यांनी सोमवारी (दि. 13) सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून …
Read More »गलथानपणाला अटकाव कधी?
देशात रोजच्या रोज मोठ्या संख्येने नव्या कोरोनाबाधितांची भर पडताना दिसत आहे. पॉझिटिव्हिटीचा दरही वाढत असला तरी तो टार्गेटेड टेस्टिंगमुळे वाढत आहे असे कदाचित म्हणता येईल. मृत्यूदर मात्र कमी होत असल्याने परिस्थिती काही प्रमाणात निश्चितपणे नियंत्रणात आहे हेही स्पष्ट होते, परंतु औषधांचा बेसुमार काळाबाजार व अत्यवस्थ रुग्णांना आजही वेळेत उपचार उपलब्ध …
Read More »कोविड योद्ध्यांचा गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ’गुरुवंदना’ हा ऑनलाइन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाअंतर्गत पनवेल महापालिकेतील डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यकामगार, शिक्षक व नवी मुंबई झोन 2 उपयुक्तालयाचे पोलीस यांनी त्यांच्या कार्यातून समाजाला दिलेल्या धैर्य, संयम आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती या शिकवणीबाबत या कर्मगुरूंना मानपत्र देवून गौरविण्यात …
Read More »‘माझा मोरया’ गरजवंतांना देणार अवघ्या 101 रुपयांत गणेशमूर्ती
नवी मुंबई : बातमीदार पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सीवूडमधील पंकज सातपुते व रोहन पाटील यांनी गेल्या अनेकवर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विक्रीस ठेवल्या आहेत. कालानुरूप आता या व्यवसायाला ऑनलाइन स्वरूप आणताना उभा दोन तरुणांनी माझा मोरया अॅप विकसित केले असून त्याद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती तयार करताना कोरोनाच्या …
Read More »स्व. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी साजरी
पनवेल : जेबीएसपी संस्थेच्या एमएनएम विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात स्व. चांगू काना ठाकूर (पिताश्री) यांची सोमवारी (दि. 13) पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता नुटन आदींनी स्व. चांगू काना ठाकूर (पिताश्री) यांच्या प्रतिमेस अभिवादन करत आदरांजली अर्पण केली.
Read More »भाजप नेते विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
धाटाव : प्रतिनिधी नवनिर्वाचित भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहा तालुक्यात रायगड जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून गरिब व गरजूंना मेणबत्ती, मच्छर मोस्किटो, आयुर्वेदिक अर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या, सॅनिटायझर फवारणी व वृक्षारोपण करण्यात आले. रोहा तालुक्यातील धोंडखार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील …
Read More »‘कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा काळाबाजार रोखा’
पनवेल : रामप्रहर वृत्त कोविड 19 रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा काळाबाजार रोखण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी केली आहे. या संदर्भात पनवेल आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेवक चिपळेकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड 19 विषाणूंमुळे संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या तीव्र …
Read More »सुरक्षा रक्षकांची ऑनलाइन नोंदणी पारदर्शकच; रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा दावा
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पारदर्शकच असल्याचा दावा रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने केला आहे. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळास सुरक्षा रक्षकांची प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी मंडळाने मा. उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार शासनाने नियुक्त केलेल्या मे. सेराईज टेक सोल्युशन्स प्रा. लि. या …
Read More »