Breaking News

Monthly Archives: July 2020

राजगृह तोडफोडप्रकरणी आरोपींना अटक करा

देवेंद्र फडणवीस यांची मागणी मुंबई : प्रतिनिधीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी (दि. 7) संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला असून, आरोपींना तत्काळ अटक केली जावी, अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट …

Read More »

माणगावात 10 नवे कोरोनाग्रस्त

माणगाव ः प्रतिनिधीजगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग माणगाव तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तालुक्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत पाच, निजामपुरात चार आणि पानसई गावात एक अशा 10 रुग्णांचा कोरोना अहवाल मंगळवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली आहे. तालुक्यातील एकूण 141 बाधित …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. 8) झालेल्या बैठकीत महत्त्वाचे चार निर्णय घेतले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मंजुरी देण्यात आली आहे. याबरोबरच कर्मचार्‍यांच्या हितासाठी पुढील तीन महिन्यांसाठी 24 टक्के कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत योगदान देण्यात आले …

Read More »

तरुणाईची शेतीकामांकडे ओढ

लागवडीखालील क्षेत्र वाढणार रोहे ः प्रतिनिधीरोहा तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने भात लावणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात शेतकर्‍यांची लावणीच्या कामाची लगबग सुरू असून या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. रोहा तालुक्यात गेल्या वर्षीपेक्षा लागवडीचे क्षेत्र यंदा 500 ते 800 हेक्टर वाढणार आहे. रोह्यात …

Read More »

चिंतानजनक! रायगडात आठ जणांचा मृत्यू; 273 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आठ जणांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 8) झाली असून, 273 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मृतांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील तीन, खालापूर व पेण प्रत्येकी दोन आणि उरण तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर नवे रुग्ण पनवेल मनपा हद्दीत 93, पनवेल ग्रामीण 31, पेण तालुक्यात 38, कर्जत 25, …

Read More »

जग आणखी बरेच बदलेल

कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात झाला आणि सगळीकडेच दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. काही ठिकाणी लॉकडाऊन हवा की नको याची प्रारंभी चर्चा झाली, परंतु लॉकडाऊन, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आदी उपायांना पर्याय नाही हे सार्‍यांच्याच अल्पावधीतच लक्षात आले. कोरोनामुळे आपले जगणे कमालीचे बदलले आहे आणि काही तज्ज्ञ निरीक्षकांच्या मते यातील काही …

Read More »

तळोजा येथे वृक्षारोपण

पनवेल : बातमीदार तळोजा 102 वाहिनी द्रुत कार्यबल यांच्याकडून रोडपाली वनक्षेत्र, पांडवगड, धामोळे गाव, भंडारली वनक्षेत्र याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. बटालियनद्वारे कडुनिंब, अर्जुन, पिंपळ, मोलश्री, अमलतास, गुलमोहर, अशोक, लोनजी फ्लोलिया यासारखे वृक्ष लावण्यात आले. वृक्षारोपणाच्या दरम्यान नागरिकांना समजावण्यात आले की वनमहोत्सव हे आपल्या भारत देशासाठी आवश्यक आहे. देशाची …

Read More »

बँक कर्मचारी, ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नियमांचे काटेकोर पालन करा

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर बँकिंग सेवा अत्यावश्यक सेवेत समावेश झाल्याने लॉकडाऊन काळातही पूर्णक्षमतेने कर्मचार्‍यांनी बँकांचे कामकाज सुरू ठेवले. त्यामुळे अनेक बँकांतील कर्मचारी आणि अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. बँक कर्मचारी-ग्राहक यांच्या सुरक्षेसाठी सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि प्रत्येक कर्मचारी अधिकार्‍याचा 50 लाखाचा विमा द्यावा तसेच बँकेत कर्मचार्‍यांची …

Read More »

काळसेकर पॉलिटेक्निकतर्फे करिअर मार्गदर्शन वेबिनार

पनवेल : रामप्रहर वृत्त अंजुमन-ए-इस्लाम या अग्रणी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या, एन. बी. ए. मानांकन प्राप्त अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेल द्वारा नुकतेच ऑनलाइन माध्यमातून दहावी, बारावी व आयटीआय विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व पदविका अभियांत्रिकीमधील संधी या विषयावर निशुल्क वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. कोविड प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करता, हा …

Read More »

भातलागवडीस सुरुवात; मजुरांची मात्र कमतरता

मोहोपाडा : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने भाताची रोपे तयार झाली आहेत, भातशेती लागवडीची कामे शेतकर्‍यांनी हाती घेतल्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. खालापूर तालुक्यातील बहुतांशी परीसरामध्ये भातशेती लावणीच्या कामांना गती आली आहे. मात्र भातलावणी करण्यासाठी मजूर यांची कमतरता आहेच. यावर्षी भातलागवडीचे प्रमाण अधिक आहे. शेतकरी विविध …

Read More »