Breaking News

Yearly Archives: 2020

सरकारने एका जातीचा विचार केला, 85 टक्के जनतेचे काय?

प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल मुंबई : प्रतिनिधीएमपीएससी परीक्षांवर तोडगा काढता आला असता, मात्र ही परीक्षा रद्द करताना राज्य सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचे काय, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर …

Read More »

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर

महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजप महिला मोर्चाचे आंदोलन   पनवेल : रामप्रहर वृत्तमहाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करीत राज्य …

Read More »

आशावाद जपून

महाराष्ट्रातील कोरोनाचे थैमान तूर्तास काहिसे थंडावल्यासारखे दिसते आहे. सप्टेंबर महिन्यात केसेसमध्ये झालेली भयभीत करणारी वाढ गेल्या पंधरवडाभरात ओसरताना दिसल्याने सरकारी गोटातील संबंधितांनी नक्कीच सुटकेचा निःश्वास टाकला असेल. मात्र तरीही आगामी सणासुदीच्या काळात संसर्गामध्ये वाढ होण्याचा धोका लक्षात घेता अनलॅाकची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत आतापासूनच घोषणा करणे निश्चितच उतावीळपणाचे ठरेल. सप्टेंबर महिन्यात …

Read More »

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव पहिल्या स्थानावर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नावे या यादीमध्ये आहेत. स्टार प्रचारकांच्या …

Read More »

रायगड जिल्ह्यात 273 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 11) नव्या 273 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 336 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 184 व ग्रामीण 32) तालुक्यातील 216, पेण 16, खालापूर 10, अलिबाग आठ, रोहा व कर्जत प्रत्येकी सहा, महाड पाच, श्रीवर्धन दोन आणि …

Read More »

उरण येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

112 रक्तदात्यांनी केले रक्तदान उरण : वार्ताहर उरण तालुका ग्राहक सहकारी संस्था (मर्यादित) द्रोणागिरी बाजारतर्फे रविवारी (दि. 11) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत द्रोणागिरी बाजार, गानू सदन, पोलीस  लाईन समोर, उरण नागाव रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एनएमएमसी रक्तपेढी वाशी (नवी मुंबई) यांच्या सहकार्याने सदर शिबिर …

Read More »

बालग्रामच्या मुलांसाठी भिक्षाफेरीतून मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त रविवारी कोकण कट्टा ह्या विलेपार्ले या समाजसेवी ग्रुपने ग्राम संवर्धन सामजिक संस्थेतील बालग्रामच्या  अनाथ, गरीब, आदिवासी आणि गरजू मुलांसाठी माणुसकीची भिक्षाफेरीतून बाराशे किलो धान्य व दैनंदिन लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश मंचेकर, दिलीप पवार, मिलिंद पालेकर कोकण …

Read More »

महाराष्ट्रात मंदिरे, लोकल, जीम बंदच

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केले. मागच्या काही महिन्यांपासून लोकल, मंदिर आणि जीम सुरु करण्याची मागणी सातत्याने होत आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर लोकल सेवा सुरु होऊ शकते, अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. त्यामुळे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल काही निर्णय जाहीर करतात, याकडे …

Read More »

फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा

मुरुड : प्रतिनिधी सध्या फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्या अनुशंघाने अभयारण्यातील वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती वन कर्मचार्‍यांना देण्यासाठी डॉ. संतोष देवरुखकर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. या वेळी डॉ. देवरुखकर यांनी, विविध औषधी वनस्पतींची माहिती दिली. त्याचप्रमाणे कॅन्सरला दूर ठेवणार्‍या औषधी वनस्पती, तुटलेली हाडे जुळवण्यासाठी लागणार्‍या वनस्पतींची …

Read More »

गुजरातवरून विक्रीसाठी आलेला तब्बल 35 लाखांचा गुटखा जप्त

चौघांना अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गुजरातमधून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी नवी मुंबईत आला होता. मात्र, ट्रकमधून इतर दोन वाहनांमध्ये हा गुटखा भरला जात असतानाच अमली पदार्थ विरोधी पथकाने रबाळे एमआयडीसी येथे छापा टाकून कारवाई करीत 35 लाखांचा गुटखा, 14 लाख रुपये किमतीची तीन …

Read More »