पनवेल : वार्ताहर बेकायदेशीररित्या दोन बैल कापून त्यांच्या मासांची विक्री करणार्या चौघांपैकी एकाला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व त्यांच्या पथकाने रिक्षासह पकडले असून इतर तिघांचा पनवेल शहर पोलीस शोध घेत आहेत. पनवेल शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीररित्या बैल कापून त्यांच्या मासांची विक्री केली जात असल्याच्या …
Read More »Yearly Archives: 2020
गुजरातवरून विक्रीसाठी आलेला तब्बल 35 लाखांचा गुटखा जप्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गुजरातमधून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी नवी मुंबईत आला होता. मात्र, ट्रकमधून इतर दोन वाहनांमध्ये हा गुटखा भरला जात असतानाच अमली पदार्थ विरोधी पथकाने रबाळे एमआयडीसी येथे छापा टाकून कारवाई करीत 35 लाखांचा गुटखा, 14 लाख रुपये किमतीची तीन वाहने असा 49 लाख 53 हजार रुपये …
Read More »राज्य सरकारच्या विरोधात आज आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रात महिलांवर होणार्या अत्याचाराबाबत राज्य सरकार निष्क्रिय व उदासिन आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सुचनेनूसार सोमवारी (दि. 12) आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणार्या अत्याचाराचे वाढते प्रमाण पाहता राज्यातील सरकार अत्याचार थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. महिलांची सुरक्षितता …
Read More »बर्निंग कारचा थरार
उरण : वार्ताहर उरण शहरातील कोटनाका येथील क्सिस बँकेच्या समोर पार्कींग करुन ठेवण्यात आलेली शिफ्ट डिझायर या चारचाकी गाडीला शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक पेट घेतला. भर बाजारपेठेतील वर्दळीच्या रस्त्यावरच अचानक पेटलेल्या गाडीमुळे रस्त्यावरील पादचार्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.आगीमुळे दुचाकींना धोका पोहचण्यापुर्वीच अग्नीशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानाने तत्काळ आग आटोक्यात …
Read More »नवी मुंबई पालिका करणार एचएफएनसी यंत्राची खरेदी
प्राणवायूची नितांत गरज असलेल्या रुग्णांना ठरणार संजीवनी पनवेल : बातमीदार कोरोनाबाधित रुग्णाला दुसर्या टप्प्यात प्राणवायूची गरज भासत असल्याचे आढळून आले आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमीत कमी व्हावा यासाठी पालिकेने आरोग्य यंत्रणेत अनेक बदल करण्याचे ठरविले असून यासाठी काही निष्णांत डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे. प्राणवायूची नितांत गरज असलेल्या कोरोनाबाधित …
Read More »रायगड जिल्ह्यात 294 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 10) नव्या 294 कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 413 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 165 व ग्रामीण 33) तालुक्यातील 198, अलिबाग 23, पेण 15, उरण 13, कर्जत 12, महाड 10, माणगाव नऊ, रोहा आठ, खालापूर …
Read More »मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
मुंबई ः प्रतिनिधीबंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल झाले असून, रविवार आणि सोमवारसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असेही आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले आहे.11 …
Read More »खंडाळा घाटात लागोपाठ तीन अपघात ; दोघांचा मृत्यू, एक जण जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी शनिवारी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात लागोपाठ तीन अपघात घडले. यात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे.पहिला अपघात पुण्याकडून मुंबईकडे जाणारा साखरेची पोती भरलेला ट्रक शनिवारी पहाटे खंडाळा घाटातील अंडा पॉईंट येथून जात असतांना तीव्र वळणावर अनियंत्रित होऊन उलटला. …
Read More »महिला अत्याचार आणि बंद मंदिरांविरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन
मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपतर्फे सोमवार (दि. 12) आणि मंगळवारी (दि. 13) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळी आंदोलनाच्या माध्यमातून निष्क्रिय आघाडी सरकारचा निषेध करण्यात येईल. पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश …
Read More »सामाजिक उपक्रमातून नवरात्र उत्सव साजरा करावा -सहायक पोलीस निरीक्षक रंगराव पवार
मुरुड : प्रतिनिधी येथील जनतेने गणपती उत्सवात मोठे सहकार्य करून पोलिसांना मदत केली होती. त्याच प्रमाणे येणारा नवरात्र उत्सव सामाजीक भान राखून समजुतदारपणे साजरा करावा, असे आवाहन मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी येथे केले. नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक तत्वाची माहिती जनतेला व्हावी, यासाठी मुरुड पोलीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper