Breaking News

Yearly Archives: 2020

कोरोनावर मात केलेल्या डॉक्टर्स, परिचारिकेचे स्वागत

कर्जत ः बातमीदार कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका परिचारिकेने कोरोनावर मात करून ते  पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहेत. या वेळी त्यांचे आरोग्य कर्मचार्‍यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. कोरोना विषाणूने कर्जतमध्ये शिरकाव केल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टर, परिचारिकांनाही ग्रासले होते. काही दिवसांपूर्वीच पोलीस अधिकारी-कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा …

Read More »

रोहा बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने रोहा बाजारपेठ गेली नऊ दिवस बंद होती. नऊ दिवसांनंतर रोहा बाजारपेठ बुधवारी (दि. 1) उघडल्यानंतर बाजारात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता नागरिक बाजारात खरेदीसाठी वावरताना दिसत होते. बुधवारी रोहा बाजारपेठ पूर्णपणे उघडल्याने रोहेकरांची खरेदीसाठी एकच …

Read More »

श्री स्वामी समर्थ मठात संत तुकाराम, शिवछत्रपतींच्या स्मारकाची स्थापना

पनवेल : रामप्रहर वृत्त – आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठ माणघर ट्रस्टचे मालक संजू पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गूरु संत श्री तुकाराम महाराज स्मारकाची स्थापना करण्यात आली. या स्मारकाचे अनावरण भागवताचार्य हभप महेश महाराज साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. तुकोबाराय आणि शिवछत्रपती हे दोन स्वयंभू …

Read More »

तळोजात स्लॅब कोसळून अग्निशमन कर्मचारी जखमी

इमारतींची दूरवस्था; रहिवासी त्रस्त पनवेल : प्रतिनिधी – तळोजा एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांसाठी उभारलेल्या वसाहतीमधील इमारतींची दूरवस्था झाली असून, स्लॅब कोसळून मंगळवारी (दि. 30) एक कर्मचारी जखमी झाला. सुदैवाने अनर्थ टळला. तळोजा एमआयडीसीतील अग्निशमन केंद्राजवळ येथील कर्मचार्‍यांसाठी छोटी वसाहत उभारण्यात आली आहे. सध्या 17 कुटुंब तेथे राहत आहेत. मंगळवारी महेंद्र …

Read More »

मोहोपाडा हद्दीत नऊ रुग्ण आढळले

मोहोपाडा : प्रतिनिधी – वासांबे (मोहोपाडा) हद्दीत गेल्या 10 दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून बुधवारी (दि. 1) नव्याने नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. वासांबे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने मोहोपाडा दोन रुग्ण, नवीन पोसरी एक, आली आंबिवली एक, गणेशनगर तीन, चांभार्ली एक तर वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिवली एक असे …

Read More »

ग्राहकांची वीज बिले कमी करून सुधारित द्या!

उरण भाजपचे महावितरणला निवेदन उरण : वार्ताहर – भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 1) महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला नागरिकांना आलेले वीज बिल कमी करावे व सुधारित देयके नागरिकांना देण्यात यावीत या मागणीसाठी उरण भाजप कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. हे निवेदन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सूचनेप्रमाणे उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर …

Read More »

विद्यार्थ्यांनो.. शोधा, खेळा आणि शिका!

वांगणी हायस्कूलच्या शिक्षकाचा अभिनव उपक्रम नागोठणे : प्रतिनिधीकोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी घरी बसून कंटाळलेले असताना नागोठणे विभागातील वांगणी हायस्कूलचे विज्ञान शिक्षक  टिळक खाडे  यांनी इपीएल-एक्सप्लोर, प्ले अ‍ॅण्ड लर्न म्हणजेच शोधा, खेळा आणि शिका हा अभिनव उपक्रम राबवला आणि विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत करुन त्यांच्यामध्ये  वैज्ञानिक जाणीव …

Read More »

निष्क्रिय आघाडी सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली

विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर कडाडले महाड : प्रतिनिधीपीक कर्जमाफीत फसवणूक, 50 हजारांची प्रोत्साहन रक्कम नाही, बांधावर बियाणे-खत नाही. या महाआघाडी सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानभरपाईच्या वाटपाबाबत आढावा घेण्यासाठी ते महाड येथे आले होते. त्या …

Read More »

कोरोनाचे रायगडात थैमान; तब्बल 263 नवे रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 30) कोरोनाचे तब्बल 263 रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 127, पनवेल ग्रामीणमधील 54, अलिबाग तालुक्यातील 23, खालापूर तालुक्यातील 21, रोहा तालुक्यातील 16, उरण तालुक्यातील 12, महाड तालुक्यातील सहा कर्जत तालुक्यातील …

Read More »

कोरोनाचे रायगडात थैमान; तब्बल 263 नवे रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 30) कोरोनाचे तब्बल 263 रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 127, पनवेल ग्रामीणमधील 54, अलिबाग तालुक्यातील 23, खालापूर तालुक्यातील 21, रोहा तालुक्यातील 16, उरण तालुक्यातील 12, महाड तालुक्यातील सहा कर्जत तालुक्यातील …

Read More »